बेक्ड चिकन लॉलीपॉप – Non Veg Recipes Marathi
साहित्य – चिकन लॉलीपॉपसाठी चिकन विंग्ज किंवा कच्चे लॉलीपॉप, व्हिनेगर, लाल तिखट, काळी मिरीपूड, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, दही, कॉर्नफ्लोअर, गव्हाचे पीठ, तांदूळाचे पीठ, तेल.
कृती -: एका भांड्यात तुम्ही निवडलेले लॉलीपॉप घ्या. तुम्ही घेतलेल्या प्रमाणानुसारच त्यामध्ये तुम्ही मसाले आणि इतर साहित्य घाला.लॉलीपॉपमध्ये मीठ, व्हिनेगर, लाल तिखट, काळी मिरी पूड, गरम मसाला, आलं-लसूण दही घाला. हे सगळे मिश्रण एकत्र करा.लॉलीपॉप छान मॅरिनेट होऊ द्या. किमान 30 मिनिटे तरी ठेवा.मायक्रोवेव्ह 350 डिग्रीवर साधारण दोन मिनिटे प्री हिट होऊ द्या. साधारण 15 मिनिटे 350 वर लॉलीपॉप बेक होऊ द्या.जर तुम्हाला थोडा ग्रील्ड लुक हवा असेल तर तुम्ही अजून 5 मिनिटांसाठी ठेवा.
टिप: जर तुम्हाला चिकन खूप टेंडर हवे असेल तर पुन्हा ग्रील्ड करायला जाऊ नका.