क्षयरोगा
हा रोग प्राचीन काळापासून जगातील अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. भारतीय वैद्यकात त्याचा उल्लेख राजयक्ष्मा किंवा क्षय असा आढळतो. क्षय हा शब्द झीज या अर्थाने वापरला जात असल्यानेव इतर दीर्घकालिक आजारांमध्येही शरीराची झीज होत असल्यानेत्याची व्याप्ती आजच्यापेक्षा अधिक असावी. तरीही फुप्फुसाच्या क्षय-रोगास कफक्षय या नावाने ओळखले जात असावे. ग्रीक वैद्यकातही ॲरिस्टॉटलच्या काळापासून हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्यास होत असल्याचे माहीत होते. इंग्रजीत कन्झम्पशन हा शब्द क्षय या अर्थाने वापरला जातो.क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. एका शिंकेमध्ये सु. ४०,००० सूक्ष्मथेंब बाहेर पडतात व प्रत्येक सूक्ष्म थेंब क्षयरोग पसरवू शकतो. हवेत पसरलेल्या या थेंबात हे सूक्ष्मजंतू अनेक तास जिवंत राहू शकतात. निरोगी व्यक्तीचा अशा सूक्ष्मजंतूंशी श्वसन मार्गे वारंवार संपर्क आल्यामुळेरोगसंसर्ग होतो. संसर्ग झालेल्या जवळपास ९०% रुग्णांमध्ये लक्षणेदिसत नाहीत. क्षयग्रस्त मातेकडून तिच्या भ्रूणास किंवा जन्म झाल्यानंतर अर्भकास संसर्ग होण्याची शक्यता असते. या सूक्ष्मजंतूंची दुसरी एक प्रजातीमा. बोव्हीस या नावाने ओळखली जाते. तिचा संसर्ग दुभत्या जनावरांकडून पाश्चरीकरण न केलेल्या दुधामुळे माणसास होऊ शकतो. क्षयरोगास कारणीभूत असलेला जीवाणू मायक्रोबॅक्टेरीयम ट्यूबरक्लोसीस हा आपला खरा शत्रू. याविरुद्धचा लढा 1960 पासून सुरु आहे. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम व नंतर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सातत्त्याने निदान व उपचाराचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला जात असूनही आतापर्यंत मानवाला अंतिम विजय प्राप्त झालेला नाही. 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार भारतामध्ये 1990 साली रुग्णसंख्या दर (प्रिव्हालन्स) हा एक लाख लोकसंख्येत 583 होता. तो आज घडीस 250 पेक्षा कमी झाला आहे, म्हणजे 50 टक्केपेक्षा जास्त रुग्ण कमी झाले आहेत, ही चांगली बाब आहे.
परंतु अजूनही नियंत्रण खूप दूर आहे. याचे कारण आपल्यासारखाच आपला शत्रुदेखील हुशार आणि शक्तीशाली आहे. आज आपण बघुया ह्या मायक्रोबॅक्टेरीयमचे दुर्गुण, ज्यामुळे आपला लढा लांबत आहे.
क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंचा श्वसन मार्गावाटे फुप्फुसांत शिरकाव झाल्यावर शरीराची प्रतिकार यंत्रणा त्यांचा नाश करते परंतु तसे न झाल्यास, म्हणजे प्रतिकार कमी पडल्यास किंवा संसर्ग मोठा असल्यास, संसर्गाच्या ठिकाणी म्हणजे फुप्फुसाच्या एखाद्या भागात श्वेत कोशिका आणि तंतुमय ऊतक यांच्या मदतीने तो बंदिस्त केला जातो. अशा बंदिस्त स्थितीत हे सूक्ष्मजंतू दीर्घ काळ सुप्तावस्थेत राहू शकतात. शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाल्यास [उदा., उतारवय, रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग (एड्स), कुपोषण, दीर्घ काळ स्टेरॉइड औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर] ते परत सक्रिय होतात व आसपासच्या ऊतकांचा नाश करू लागतात किंवा रक्तातून शरीरभर पसरून अनेक ठिकाणी वाढू लागतात.
फुप्फुसाच्या क्षयरोगात अशक्तपणा, वजन घटणे व खोकला या लक्षणांपासून प्रारंभ होतो. तसेच रात्रीच्या वेळी अतिशय घामयेतो. रोगाची तीव्रता वाढू लागल्यावर प्रामुख्याने सकाळी उठल्यावर खोकल्याबरोबर कफ पडू लागतो. कधीकधी त्यात रक्ताचा अंश आढळू लागतो. बारीक ताप येतो. फुप्फुसावरणाचा शोथ होऊन वक्षपोकळीमध्ये पाणी साठल्यास [→ परिफुप्फुसशोथ] किंवा हवेचा शिरकाव झाल्यास फुप्फुसावर दडपण येऊन धाप लागते. लहान मुलांत नवीनच रोग संसर्ग झाला असल्यास मानेतील लसीका ग्रंथींना सूज येते आणि एक विशिष्ट प्रकारचा आवाज करणारा खोकला येऊ लागतो [→ गंडमाळा].फुप्फुसेतर ठिकाणच्या विकारातील लक्षणे विविध प्रकारची असतात, उदा., मेंदूच्या आवरणातील क्षयरोगात [→ मस्तिष्कावरणशोथ] प्रारंभी डोकेदुखी, मान अखडणे, ताप, मळमळणे, झापड येणे व नंतर शुद्ध हरपणे, आकडीसारखे अपस्माराचे झटके उदरपोकळीतील इंद्रियांच्या विकारात पोटात दुखणे, एखाद्या ठिकाणी अर्बुदाप्रमाणे गाठ जाणवणे, पचनात बिघाड सांध्यांमधील विकारात ⇨ संधिवातासारखी लक्षणे मणक्याच्या विकारात तीव्र वेदना आणि मणका ठिसूळ होऊन भंग पावल्यामुळे मेरुरज्जूवर दाब येऊन पक्षाघात किंवा फक्त पायाच्या संवेदना व हालचालींवरअनिष्ट परिणाम स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या जननेंद्रियातील विकारामुळेसूज, गाठ जाणवणे व वंध्यत्व. सर्व शरीरात पसरलेल्या ‘मिलियरी’ क्षयरोगात शरीरभर सर्व ऊतकांमध्ये डाळीच्या आकाराच्या क्षयविकृतींची वाढ होते. या प्रकारात लक्षणे फारच संदिग्ध असतात, परंतु लवकरच ती झपाट्याने वाढून गंभीर होतात व प्राणघातक ठरू शकतात.
क्षयरोगाचा प्रतिबंध : क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू निसर्गात फक्त रोग झालेल्या माणसांच्या किंवा जनावरांच्या शरीरातच वाढू शकतात, हीगोष्ट रोगाचा प्रतिबंध करताना विशेष लक्षात ठेवून रोगप्रतिबंधक उपायकेले पाहिजेत. त्या दृष्टीने रोग जनावरात झालेला असेल, तर परीक्षणपद्धतीद्वारा निदान करून अशी जनावरे त्यांच्यामुळे इतरांना रोग होऊनये म्हणून नष्ट करणे हिताचे आहे. पाश्चात्त्य देशांत परीक्षा करून रोगसिद्ध झाल्यावर तशी जनावरे नष्ट करतात परंतु भारतातील असे पशूनष्ट करण्याच्या बाबतीत पुष्कळ अडचणी आहेत. भावनाप्रधान लोकांनात्या पटणाऱ्या नाहीत. तरीही एकंदर पशुधनाच्या हिताच्या दृष्टीने क्षयरोगाचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी रोगी जनावरे नष्ट करणे आवश्यक आहे, हेसहज लक्षात येण्यासारखे आहे. रोगजंतूंना प्राण्यांच्या शरीरात वाढ करण्यासारखी अनुुकूल परिस्थिती प्राप्त झाली नाही, तर ते संपूर्ण नष्ट होतील. कारण त्यांना वाढण्यासाठी निसर्गात इतरत्र कोठेही वाव नसतो. रोगप्रतिबंधक लस रोग्यांच्या सान्निध्यात राहणाऱ्या प्राण्यांना टोचली, तर त्यांना क्षयरोगाची बाधा होणार नाही. मानव व पशुपक्षी यांच्यात उपयोगी क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस तयार करण्यात आली आहे. ही लस गायी-म्हशींत रोग उत्पन्न करणाऱ्या उपजातीच्या क्षयरोग सूक्ष्मजंतूपासून तयार करतात. लशीतील रोगजंतू जिवंत असतात, परंतु निष्क्रिय केलेले असतात.
रोगी गुरांच्या सान्निध्यात राहणाऱ्या किंवा रोगाचा विशेष उपद्रव होणाऱ्या जागी बांधलेल्या गुरांनाही लस टोचून बऱ्याच प्रमाणात रोगप्रति-बंधक क्षमता निर्माण करावी लागते. कारण एकदा क्षयरोगाचा प्रादुर्भाव झाला की, ही लस विशेष उपयोगी पडत नाही. गोठ्यातील स्वच्छता व साफसफाई रोगप्रतिबंधासाठी विशेष उपयोगी पडते. उघड्यावर मोकळ्या हवेत व डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या गुरांना क्षयरोग क्वचितच होतो. उलटपक्षी दाटीदाटीने बांधलेल्या जनावरांत तो विशेष आढळून येतो. रोगप्रतिबंधक उपाय करताना प्रत्येक जनावराला शास्त्रीय दृष्ट्या आवश्यक असलेली जागा, गोठ्यातील खेळती हवा व स्वच्छता याचे महत्त्व सहज लक्षात येईल. गोठे जंतुघ्न द्रावणाने दर आठ दिवसांनी धुणे आणि गव्हाणी, चारा-दाणा–पाणी ह्यांची भांडी स्वच्छ ठेवणे, शक्यतो शुद्ध पिण्याचे पाणी देणे यांवर विशेष लक्ष ठेवणे रोगप्रतिबंध कार्यात विशेष महत्त्वाचे ठरते. रोगप्रति-बंधक परीक्षण पद्धतीने दर सहा महिन्यांनी गुरे तपासून घेतात व रोगनिदान होताच रोगी गुरे कळपातून अलग करतात. शिवाय दूध व जनावराचे इतर स्राव प्रयोगशाळेत तपासून पाहतात. विशेषतः दुधामार्फत अर्भकांना क्षयरोगहोण्याची शक्यता असल्यामुळे दुग्धालयातील जनावरे क्षयरोगापासून मुक्त आहेत, याची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, डेन्मार्क, ग्रेट ब्रिटन वगैरे प्रगत देशांत रोगमुक्त कळप नोंदविले जातात व अशा दाखला मिळालेल्या कळपातील दुधाचा वापर निश्चितपणे केला जातो.
क्षयरोग झाल्यानंतर उपचार करणे, हे जनावरांच्या बाबतीत विशेषफायद्याचे नाही. कारण दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या क्षयरोगाचे निदान होण्याच्यापूर्वीच किती तरी दिवस आधी रोगजंतू शरीरात ठाण मांडून बसलेलेअसतात व आपले कार्य करीतच असतात. दुसरे असे की, कितीही काळजी घेतली तरी रोग्यांच्या संसर्गाने रोग इतर जनावरांत पसरण्याचा धोकाराहतोच. शिवाय क्षयरोग मानवांनाही होण्याची भीती असते. आर्थिकदृष्ट्या रोगी जनावर परवडण्यासारखे नसते व मानवतेच्या दृष्टिकोनातूनपाहिले, तरी उपचार फायदेशीर नसल्यामुळे जनावराचे होत असलेले हाल पाहणे कोणालाही आवडणार नाही. पाश्चात्त्य देशांत रोगाच्या भावनेचे निदान होताच जनावरांना कत्तलखान्यात पाठवितात व तज्ञ पशुचिकित्सकांकडून परीक्षा करून दूषित मांस व इतर अवयव नष्ट करून इतर मांस वगैरे उपयोगात आणतात परंतु भारतात प्रत्येक ठिकाणी अनेक कारणांमुळेतेही शक्य नसते. अशा वेळी (शास्त्रीय पद्धतीने) वेदना होऊ न देतापशूंना नष्ट करणे व रोगजंतूचा नाश करणे एवढाच उपाय शिल्लक राहतो.
उपचार
आज आपल्या जवळ क्षयरोगाच्या उपचारासाठी जवळपास 15 प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. परंतु यातील फक्त 5 औषधेच हे खऱ्याअर्थाने कार्यक्षम आहेत. जसे आय.एन.एच., रिफॅमपीसीन, पायरीझीनामाईड, स्ट्रेप्टोमायसिन व इथेम्बुटॉल. या औषधी जर एकाच वेळी म्हणजे उदा. 4 गोळ्या किंवा 4 गोळ्या व इंजेक्शन दिवसातून एकदाच सोबत घेतल्या तरच त्याचा चांगला परिणाम मिळतो. टीबीची औषधे सकाळ, दुपार, संध्याकाळ याप्रमाणे इतर आजारांच्या औषधी सारखी घेतली तर परिणामकारक राहत नाही. जिवाणू मरत नाही. औषधी अनियमित, किंवा 6-8 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी घेतली की, क्षयरोगाचे जंतू स्वत:मध्ये बदल करुन घेतात व नंतर पुन्हा वाढतात. मात्र यावेळीच वरील 5 औषधींना ते दाद देत नाही, यालाच एमडीआरटीबी (मल्टी ड्रग रेसिस्टेंट टीबी) असे म्हणतात. सर्व जीवाणू विभाजन गुणाकर पद्धतीने वाढतात. इतर जीवाणू हे लवकर 15 मिनिटात एकाचे दोन उदा. ई कोली विभाजन पद्धतीने वाढतात. पण क्षयरोगाचे जीवाणू 18 तासानंतर विभाजन पद्धतीने वाढत असल्यामुळे याचा उपचार देखील 6 ते 8 महिने घ्यावा लागतो.
क्षयरोगाच्या जंतुच्या अनेक विविध जाती असून त्यामध्ये बदल होतात. सध्या भारतामध्ये असलेल्या जीवाणूचे पूर्वज हे 40 हजार वर्ष आधीचे आहे असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. हा मायक्रोबॅक्टेरीयम ट्युबरल बॅसीला उपजतच शक्तीशाली आहे. सुप्त अवस्थेतही कितीही वर्ष मानवाच्या शरीरात तो राहु शकतो. रुग्णाने औषधे सुरु केल्याबरोबर तो स्वत:मध्ये बदल घडवू लागतो, अनियमित औषध झाल्याबरोबर तो एमडीआर हे नवे रुप धारण करतो. अशा या शक्तीशाली आणि हुशार शत्रुसोबत लढण्याचे शस्त्र म्हणजे आरएनटीसीपी या सुधारित राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करणे. खासगी डॉक्टरांनी देखील आरएनटीसीपी प्रमाणेच उपचार करणे व प्रत्येक क्षयरुग्णाची माहिती शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.