सफरचंद हलवा – Marathi Recipe
आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य यांचे वर्धनसाठी सफरचंदात महत्त्वपुर्ण क्षार असतात. नियमित रोज एक तरी सफरचंद खावे. सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबान इलाज आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोहा सारखे उपयुक्त द्रव्ये असतात, याशिवाय यात ‘ब’ आणि ‘क जीवनसत्वेही असतात. सफरचंदामधील क्वरसिटीन पेशींना नुकसानापासून वाचवतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असल्यामुळ पचनशक्ती वाढण्यास मदत होते.सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते. सफरचंद बाजारात असल्यामुळे सफरचंद नीट बघून घ्या.
साहित्य – 2 सफरचंद,1 कप दूध,1 टेबलस्पून तुप,2 टेबलस्पून दुध पावडर,2 टेबलस्पुन साखर, 1 टिस्पुन वेलची पावडर, 2 टिस्पुन बदाम किस.
कृती -: सफरचंद स्वच्छ धुऊन घ्यावे. सफरचंदाची साले काढावीत. किसणीने किस करून घ्यावा. एका पातेल्यात तूप घालून त्यामध्ये सफरचंदाचा किस घालून परतून घ्यावा. पाणी आटेपर्यंत चांगला परतून घ्यावा. पाणी आटले की त्यामध्ये दूध घालावे. नंतर दहा मिनिटे चांगला शिजवून घ्यावे.नंतर त्यामध्ये साखर व दूध पावडर घालून व्यवस्थित मिक्स करावे.चांगला घट्टसर शिजू द्यावा. त्यावर बदामाचा कीस व वेलची पावडर घालावी.