साहित्य – ४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाट, १ बारीक चिरलेला कदा ,२ चमचे लाल मिरची पाऊडर किंवा ३-४ हिरव्या मिरच्या २ चमचे धणेपूड , मीठ चवीनुसार ,१ चमचा कसूरी मेथी ,१ चमचा ओवा , ३ चमचे कोथिंबीर.
पारीसाठी
पानी,तेल/ तूप घालून मीठाशिवाय भिजवलेली कणिक .
कृती -: १. उकडलेले बटाटे सोलून हातानेच कुस्ककरून घ्यावेत.
२.सारण ह्या शीर्षकाखाली असलेले सर्व साहित्य बटाट्यात मिसळून मिश्रण एकजीव करावे. मी शक्यतो बटाटे जास्त कुस्करत नाही. पुरणासारखे एकजीव केलेल्या सारणामुळे पराठा पीठूळ लागतो. ३. कणकेची अत्यंत छोटा तुकडा घेवून त्यास पोळी लाटतो त्या प्रमाणे पातळ लाटावे. ४. पोळीच्या मधोमध कणकेचा तुकडा घेतला त्याच्या दीडपट आकाराचा सारणाचा गोळा ठेवावा.५. सगळ्या बाजूने पारी बंद करावी. ज्या बाजूने पारी बंद केली ती बाजू पोळपाटावर येईल असे बघून पुन्हा पारी जितकी बारीक लाटता येईल तितकी लाटावी.७. तवा व्यवस्थित तापल्यावरच पराठा तव्यावर टाकावा. तव्याचे अचूक तापमान साधण्यासाठी आमच्याकडे त्याच तव्यावर आधी २-३ फुलके/ पोळी करण्याची पद्धत आहे.८. एका बाजूने पराठा थोडाफार शेकला की लगेच उलटावा. शेकलेल्या बाजूला चमच्याने तूप लावावे. तूप सगळीकडे नीट पसरले जाईल याची काळजी घ्यावी. ९. तूप नीट पसरले गेले की पुन्हा एकदा पराठा उलटावा व दुसर्या बाजूला नीट तूप लावावे.१०. पराठा मध्यम आचेवर खमंग भाजला जातो.
अधिक टिपा:
१. एक पराठा साधारण २-३ चमचे तूप पितो.
२. घरचे लोणी/ लोणचे/ पुदिना चटणी/ दही यापैकी एक गोष्ट सोबत हवीच.
३. कुठल्याही परठ्याचे सारण ओले असले तर पराठा लाटतांना त्रास होतो. पराठा चिकटतो किंवा फाटतो.