मुतखडा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

किडनी स्टोन म्हणजे काय?
किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, हिंदीत पथरी तर वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो. किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने मूत्रमार्गात अडथळा येतो.

लक्षणे
किडनीच्या भागात सूज, सूत्रता, दाब, ताठरता असणे, पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या कापल्यागत तीव्र वेदना असणे, मूत्रमार्गात तसेच मूत्राशयात आग होणे, लघवीला जळजळ होणे. प्राथमिक अवस्थेत पोटात खूप त्रास व लघवीमध्ये रक्त तसेच जेलीयुक्त घटक पडतात. गंभीर अवस्थेत गडद रंगाची, गढूळ व मंदप्रवाही लघवी असते.
किडनी स्टोन तयार होण्याचा धोका असणारे
८०% रुग्ण पुरुष असतात. वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणारे रुग्ण २० ते ४९ वर्षांच्या व्यक्ती कुटुंबातील लोकांना मुतखडा होण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना युरिक अ‍ॅसिडपासून मुतखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते. गर्भारपणात प्रोजेस्टेरॉन नावाचे स्राव वाढल्याने लघवीचा वेग कमी होतो, त्याने खडे तयार होतात. गर्भारपणात कॅल्शियम मूत्रात उत्सर्जित होण्याने मुतखडे तयार होण्याचे प्रमाण वाढते. लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मुतखडा तयार करण्याऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो. पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते. मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे त्यामुळे नायडस(??) तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते.
तपासणी
एखाद्या आजाराचे निदान कळण्यासाठी तपासण्या गरजेच्या असतात. आर.एफ.टी. ही तपासणी किडनीची कार्यक्षमता पाहण्यासाठी रक्ताद्वारे केली जाते. मूत्रातील जंतुसंसर्ग बघण्यासाठी लघवीची तपासणी केली जाते. किडनी स्टोनचा आकार, स्थान तसेच किडनीच्या रचनेतील बदल पाहाण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी करणे महत्त्वाचे आहे. तसेच गरजेनुसार एक्सरे, आय.व्ही.पी. सिटीस्कॅन, रिनल बायॉप्सी इत्यादी.पोटाची सोनोग्राफी केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान समजते. पोटाच्या क्ष-किरण तपासणीमध्ये मुतखड्याचे आकारमान व घनता जाणता येते. मूत्रमार्गाची एंडोस्कोपी ही तपासणी केल्यास मुतखड्याबद्दल अधिक तपशील समजून येतात.
किडनीमध्ये इन्फेक्शन
या इन्फेक्शनला पायलोनेफ्रायटिस असे म्हणतात. हे इन्फेक्शन किडनी स्टोन मूळे होऊ शकते. यात लघवी किडनीच्या बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो आणि लघवी पुन्हा किडनीत जमा होते. यामुळे किडनीमध्ये इन्फेक्शनचा धोका वाढतो. तसे तर किडनी व मूत्रमार्गाचे इन्फेक्शन व मूत्रमार्गाचे इन्फेक्शन इ-कोलाई आणि अन्य बॅक्टेरियामुळे होते. इ-कोलाई इन्फेक्शन दूषित पाणी आणि अन्नापासून होते.
किडनी स्टोन आणि होमिओपॅथीहोमिओपॅथीत किडनीस्टोन या आजारावर प्रतिबंधात्मक व प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. कोणतेही तज्ज्ञ व होमिओपॅथ आपल्याकडे आलेल्या रूग्णाचं व्यक्तित्व व आजाराची लक्षणे खोलात जाणून घेतल्याशिवाय उपचार करत नाही. सर्वासाठी एकच औषध, असे होमिओपॅथीमध्ये नसते. आजार किंवा विकार मुळातून बरे करायचे असतील तर वेगवेगळया व्यक्तींना त्यांच्या सवयी, आहार, स्वभाव त्यानुसार वेगळेच उपचार करावे लागतात. शरीरांतर्गंत असणारी वेगवेगळी जैव रसायने आणि त्याच्या रूग्णाच्या शरीर मन स्वास्थावर परिणाम हे दोन्ही सांभाळले जाते. अशा रितीने शस्त्रक्रियेविना दुष्परिणामही हाेतात. प्रतिबंधात्मक व प्रभावी किडनी स्टोनवरील होमिआेपॅथिक औषधोपचार अनेक रुग्णांना फायदेशीर ठरत आहेत. ज्यावेळी थायरॉईड रोगाचे लवकर निदान होते, तेव्हा लक्षणे दिसायला लागायच्या आधी ही समस्या नियंत्रणात ठेवता येते. थायरॉईड रोग ही आयुष्यभराची स्थिती असते. काळजीपूर्वक नियोजन केल्यास, थायरॉईड रोग असलेले लोक आरोग्यदायी, सामान्य जीवन जगू शकतात.
किडनी स्टोन होणे टाळण्यासाठी
१) पाणी जास्त प्यावे
२) लघवीला शक्यतो रोखू नये
आजार व औषधोपचार
आजार व औषधोपचारआजारावर मात करण्यासाठी, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी, तो पुन्हा न होऊ देण्यासाठी, त्यातून पुढे गुंतागुंत निर्माण न होऊ देण्यासाठी योग्यवेळी योग्य ते निदान व औषधोपचार अतिशय महत्त्वाचे असतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे गरजेचे आयुर्वेदानुसार, मुतखड्यामुळे होणारी पोटदुखी थांबण्यासाठी,तातडीचा घरघुती उपाय म्हणून अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पिण्याने १५ मिनिटात त्यामुळे उद्भवणारी पोटदुखी थांबते. सराटे (काटेगोखरू) याचा काढा तूप टाकून दिल्यास, मुतखडा पडून जाण्यास व वेदना कमी होण्यास मदत होते.कुरडू नावाच्या वनस्पतीची अथवा वायवर्ण्याची साल याचा स्वरस अथवा काढा यावर उत्तम आहे. कडुलिंबाच्या पाल्याची राख दोन पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडतो. जर खडा लहान असेल व जास्त जुना नसेलतर मेंदी चे साल बारीक वाटून चूर्ण करावे. हे चूर्ण सकाळी अर्धा चमचा पाण्याबरोबर नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी बरोबर निघून जातो.
Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा