साहित्य – 200 ग्रॅम नूडल्स,1 टेबलस्पून तेल,5-6 कप पाण , 1/2 कप शिमला मिरची , 1/2 कप गाजर , 2.5 चमचे टोमॅटो केचअप , 1/2 कप कोबी , 2.5 चमचे सोया सॉस , 2.5 चमचे रेड चिली सॉस , चवीनुसार मीठ , 1 चमचे व्हिनेगर , 1/2 चमचा मिरे पावडर.
कृती -: 1.नूडल्स उकळण्यासाठी, एका मोठ्या पातेल्यात, 5-6 कप पाणी आणि एक टेबलस्पून तेल घाला. ते उकळण्यास सुरवात झाली की त्यात नूडल्स घाला व चांगल्या शिजवून घ्या. सुमारे 4-5 मिनिटे लागू शकतात. व कोबी, गाजर, शिमला मिरची उभे पातळ काप चिरून घ्यावे.2.सर्व पाणी काढून टाकावे, शिजवण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी, नूडल्स वर थंड पाणी ओता. नूडल्स चाळणीत काढून बाजूला ठेवा 3.वेज हक्का नूडल्स करण्यासाठी: कढईत तेल गरम करावे. आता गाजर आणि शिमला मिरची घाला. 2-3 मिनिटे हाई फ्लेम वर सौंटे करा.आता कोबी घाला आणि 1 मिनिट सौटे करा. भाज्या कुरकुरीत आणि थोडी कच्ची असावी, संपूर्ण शिजवलेले नसावेत. त्यात व्हिनेगर घालून घ्या. त्यात नूडल्स घालून घ्या. व मिक्स करून घ्या.4.आता आच कमी करून त्यात मीठ आणि मिरे पावडर घालून घ्या. सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचअप घालून घ्या, थोडे मीठ घाला आणि एकजीव करा.5.5 मिनिटे वाफ देऊन गरम गरम सर्व्ह करा.