साहित्य – एक पावभर (२५० ग्रॅम) लाल भोपळा , दोन लहान बटाटे , एक वाटीभर दही , अर्धी ते पाउण वाटी भाजलेल्या शेंदाण्यांचं जरा दाणेदार पोताचं कूट , मीठ, साखर चवीनुसार , ३-४ हिरव्या मिरच्या , अर्धा इंच आलं , तेल , जिरे , थोडी कोथिंबीर.
कृती -: याकरता शक्यतो, काळ्या पाठीचा आणि चांगला केशरी रंगावरचा भोपळा घ्यावा. साल सोलून काढून टाकावी आणि मध्यम आकारात चिरून घ्यावा.बटाट्यांची सालं काढून तेही भोपळ्याच्या आकारांत चिरून घ्यावे. जरा मोठ्या पातेल्यांत भोपळा आणि बटाटा बुडेल इतकं पाणी घेऊन ते उकळू द्यावं. एक उकळी फुटली की मग यात चिरून ठेवलेला बटाटा घालावा. मिनिटभरानं तर मग भोपळाही त्याच उकडहंडीत सोडावा.एकीकडे आलं बारीक किसून तर हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत आणि कोथींबीर बारीक चिरून तयार ठेवावी. भोपळा, बटटा शिजला की, त्यातलं पाणी काढून टाकावं आणि गार करत ठेवावं.जरा गार झाले की यांत मीठ, साखर, कोथिंबीर, दही, आलं आणि दाण्याचा कूट घालावा. आता एका कढल्यात तेल जिर्याची फोडणी करून/ जिरं फुलवावं आणि यात मिरच्या घालून जरा होऊ द्याव्यात. ही चळचळीत
फोडणी भरीतावर ओतावी आणि नीट कालवून घ्यावं. सुरेख चवीचं भरीत तयार आहे. एका माणसाला एका वेळेला अन दोन लोकांना बाकी
फराळाबरोबर पुरेल.
अधिक टिपा:
दह्याला आल्याचा स्वाद फार मस्त लागतो सो ते वग़ळू नका.
मिरच्या तिखटपणानुसार कमी जास्त करता येतील.
बटाटा उगीच वापरलाय असं वाटू शकेल पण त्यामुळे भरीत जरा मिळून येतं असं मला वाटतं.
ऑफिशिअली ब्याड वर्ड आणि कर्ड वापरलेलं आहे.