साहित्य – बटर – २०० ग्रॅम , बिटर चॉकलेट (७०% कोको असलेलं)- २०० ग्रॅम , बदामाची पावडर – २०० ग्रॅम , साखर – २०० ग्रॅम व्हॅनिला फ्लेवरची साखर – एक सॅशे (१५ ग्रॅम) बेकींग पावडर – अर्धा , सॅशे (७ ग्रॅम) , अंडी – ४ , चिमुटभर मीठ.
कृती -: एका भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं, ते उकळलं, की दुसर्या एका छोट्या भांड्यात चॉकलेटचे छोटे तुकडे करुन ते भांडं त्या मोठ्या भांड्यात तरंगत ठेवायचं. अशाप्रकारच्या इन्डायरेक्ट हिटने चॉकलेट वितळलं, की ते चॉकलेट, बदाम पावडर, साखर, रुम टेम्परेचरवर असलेलं मऊ बटर आणि बाकी घटक एकत्र करुन केकबीटरने ३ मिनिट बीट करायचं. केकमोल्डमध्ये हे सगळं मिश्रण घालून प्री हिटेड ओव्हन मध्ये केक १६०° वर ४० मि. बेक करायचा.
अधिक टिपा:
१. चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करता येईल
२. केकमध्ये बदामाचे छोटे काप चवीसाठी टाकता येतील.
३. मोल्डला बटरचा एक कोट करुन घ्यायचा- केक चिकटू नये म्हणून.
४. आवडत असल्यास जास्तीचं चॉकलेट आणून ते वरिल कृतीत दिल्याप्रमाणेच वितळवून त्याचं कोटींग केक करुन झाल्यानंतर थंड झाल्यावर केकभोवती करता येईल. त्याने अजूनच छान लागतो केक आणि अर्थात दिसतोही.
५. ड्रायफ्रूट्सची सजावट करायची असल्यास ती कोटींग केल्या केल्या पटकन करावी. चॉकलेट फारच पटकन पुन्हा घट्ट होतं.