अळूवडी

Like
Like Love Haha Wow Sad Angry
अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी फारशी लोकप्रिय नसते. परंतु, या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.

साहित्य – ८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन), बेसन २ वाट्या, अर्धा वाटी तांदळाचे पिठ चिंचेचा कोळ, गुळ, मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या), मिठ, आल लसुण पेस्ट, कांदा चिरुन भाजुन, सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन, १ चमचा तिळ, अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला, तळ्यासाठी तेल.
कृती -: वरील जिन्नसातील अळूची पाने आणि तेल वगळून सगळे बेसनमध्ये सगळे मिसळून घट्ट मिश्रण करावे.नंतर पाट किंवा मोठे ताट घेउन त्यावर अळूचे पान उलटे ठेउन त्यावर पिठाचे मिश्रण सारवायचे. मग दुसरे पान उलटेच पण विरुद्ध दिशेन लावायचे आणि त्यावर मिश्रण सारवायचे. (अगदी शेण सारवतात तसेच :हाहा:) मग अशीच उलटी पाने एकमेकांच्या विरुद्ध लावायची एका लोड साठी मोठी असतील तर ५-६ आणि छोटी असतील तर ७-८ पाने लावायची. मग लावलेल्या चारी पानांच्या कडेची बाजु थोडी आत मोडून त्याचे लोड करायचे (चटई गुंडाळतात तशी :स्मित:) आता उकडीच्या भांड्यात वाफेवर हे लोड ठेउन २० ते ३० मिनीटे हे लोड वाफवुन घ्यावेत. थोडा धिर धरा मग थंड झाल्यावर लोडच्या सुरीने वड्या पाडा (हे तुम्ही सुचवा कश्यासारख्या ते). तवा चांगला तापवुन त्यावर थोडे तेल पसरवुन त्यात अळूवड्या मंद गॅसवर खरपुस तळा. तो.पा.सु. टाईपतानाच.

अधिक टिपा: आल लसुण पेस्ट तसेच कांदा खोबर न टाकताही प्लेन करता येतात. पण ह्यातील खोबर खाताना खुसखुशीतलागत. करुन बघाच.कांदा खोबर्‍याची पेस्ट आजिबात करु नका चांगली नाही लागत तसाच चिरलेला तळून कांदा आणि किसुन भाजलेले खोबरे थोडे कुस्करुन टाका. तळताना आवडत असल्याच मोहरीची फोडणी आणि वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर टाकु शकता. गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही थोडा थोडा टाकला तरी चांगला लागतो.अशीच अळूवडी अळूची पाने चिरुनही करता येते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories