व्यसन
बऱ्याचदा समाजात व्यसनावर वैद्यकीय उपचार, औषधे, समुपदेशन व पुनर्वसन उपलब्ध असतात. ह्याची जनजागृती नाही. उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम, हे खरे असले तरी व्यसनाधीन व्यक्तीला उपचाराद्वारे बरे करणे हाच एक उपलब्ध मार्ग आहे. शालेय जीवनापासून मूल्य शिक्षणाद्वारे व्यसनापासून दूर ठेवणे हा एक उपाय आहे. युवक-युवतींना ‘राष्ट्रीय सेवा योजना’ सारख्या माध्यमांतून ‘साहित्य’, ‘कला’, ‘संगीत’ इ. छंदाची जोपासना करुन व्यसनांचा प्रतिबंध करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. कुटुंब, समाज हे एक विद्यापीठच आहे, म्हणून भावी पिढीवर सुसंस्कार करण्यासाठी व्यसनविरहित समाजाची जडणघडण करणे आवश्यक आहे. यासाठी संत साहित्य, अध्यात्म या मार्गाने आदर्श समाज घडू शकतो. व्यसनाधीनतेवर व्यसन मुक्तीसाठी ‘कॉग्निटिव्ह’ बिहेवियरल’ थेरपी”, ‘ग्रुप थेरपी’ समुपदेशन गरजेनुसार औषधे , प्रशिक्षित मानसोपचार तज्ञांचा सल्ला व उपचार आवश्यक असतात. कुटुंबाची फरपट टाळण्यासाठी पुनर्वसन अत्यावश्यक असते. म्हणूनच म्हटले आहे की – व्यसन म्हणजे जिवंत मरण ,व्यसन सोडा फुलेल जीवन…
समाजमाध्यमे व पथनाट्यातून जनजागृती करुन निर्व्यसनी नागरिक व देश उभा राहील. व्यसनामुळे होणारी कुटुंबाची धुळधाण टाळता येईल.नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात व्यसनाधीनतेचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या २०% आढळले. व्यसनावरील उपचार करताना ‘कुटुंब शिक्षण’ हा महत्त्वाचा भाग आहे. आजतागायत ‘अल्कोहोलिक अनॉनिमस’ चे व्यसन मुक्तीचे व पुनर्वसनाचे कार्य चांगले आढळले आहे.
एकदा मजा म्हणून मद्यपान/धूम्रपान केले की त्याचे सवयीत व नंतर व्यसनात रुपांतर होते. म्हणून पहिल्या व्यसनाच्या अनुभवाला पायबंद घालणे जरुरीचे आहे. व्यसनाधीनतेचे शरीरावर, मनावर जसे दुष्परिणाम होतात तसेच आर्थिक व सामाजिक स्वास्थ्यही बिघडते. मद्यपान करुन वाहने चालविल्याने रस्त्यावरील अपघाताचे व मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. आजकाल संसर्गजन्य आजारातून होणा-या मृत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. व्यसनाधीन व्यक्ती व्यसनाची तलफ झाल्यावर स्वत:कडे पैसे नसल्यास कर्ज काढून /चोरी करुन व्यसन करतो, हे सामाजिक अनारोग्यास कारणीभूत ठरते. म्हणून व्यसनास प्रतिबंध व व्यसनाधीन झाल्यास उपचार व पुनर्वसन हेच या समस्येचे उत्तर आहे.उत्साही, कार्यक्षम युवा पिढी निर्व्यसनी राहिल्यास भारत विकसित होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून कोणत्याही व्यसनापासून दूर राहू ही आरोग्य प्रतिज्ञा आचरणात आणण्याचा निश्चय प्रत्येक जण करुया. दारुऐवजी दूध पिऊन, कोणतीही पार्टी/मंगल कार्य साजरे करु या. व्यसन करुन स्वत:च स्वत:साठी खड्डा खोदण्यापेक्षा ती आर्थिक बचत भावी पिढीच्या शिक्षण, व्यवसाय –उद्योग यासाठी उपयुक्त ठरेल.
स्वत:बरोबर मित्र-नातेवाईक, शेजारी यांनाही व्यसनापासून परावृत्त करु हीच खरी आरोग्य चळवळ व समाजकार्य ठरेल. ‘मी व्यसन करणार नाही व इतरांना करु देणार नाही’ हा मंत्र संपूर्ण समाजाला प्रगतीपथावर नेईल. हा आरोग्य संकल्प २०१८ सिध्दीस नेऊ.’एकच प्याला’ घेतल्यानंतर मद्यपानाची सवय व नंतर व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम व्यक्ती, कुटुंब व समाजाला भोगावे लागतात. पौगंडावस्थेत समवयस्कांच्या दबावामुळे (Peer pressure) प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पनांना बळी पडल्यामुळे (पीअर प्रेशर) चित्रपटातील नायकांचे अंधानुकरण म्हणूनही युवक मद्यपानाच्या व धूम्रपानाच्या व्यसनाच्या आहारी जातात. मद्यपान व्यसनामुळे यकृतदाह, लिव्हर व सिरॉसिसचा धोका उद्भवतो. दारु (अल्कोहोल) मुळे दरवर्षी ३३,००,००० व्यक्तींचे मृत्यू होतात. २२ % खुनी हल्ले व २२% टक्के अत्महत्येची नोंद झाली आहे असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. धूम्रपानामुळे श्वसनाचे आजार, कर्करोग उद्भवतात. ड्रग्जच्या व्यसनामुळे आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम दिसून आले आहेत. ग्रामीण भागातही तंबाखू, मिसरी, बीडी यांचे व्यसन मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. या व्यक्तींना मुख कर्करोग उद्भवण्याचे प्रमाण जास्त आहे. व्यसनाधीन व्यक्तिमध्ये नैराश्यासारखे मनोविकार आढळतात. तसेच या रुग्णात सायकासीस, पत्नीच्या चारित्र्यावर संशय आढळतो.
बऱ्याचदा समाजात व्यसनावर वैद्यकीय उपचार, औषधे, समुपदेशन व पुनर्वसन उपलब्ध असतात. ह्याची जनजागृती नाही. उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम, हे खरे असले तरी व्यसनाधीन व्यक्तीला उपचाराद्वारे बरे करणे हाच एक उपलब्ध मार्ग आहे. शालेय जीवनापासून मूल्य शिक्षणाद्वारे व्यसनापासून दूर ठेवणे हा एक उपाय आहे. युवक-युवतींना ‘राष्ट्रीय सेवा योजना’ सारख्या माध्यमांतून ‘साहित्य’, ‘कला’, ‘संगीत’ इ. छंदाची जोपासना करुन व्यसनांचा प्रतिबंध करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. कुटुंब, समाज हे एक विद्यापीठच आहे, म्हणून भावी पिढीवर सुसंस्कार करण्यासाठी व्यसनविरहित समाजाची जडणघडण करणे आवश्यक आहे. यासाठी संत साहित्य, अध्यात्म या मार्गाने आदर्श समाज घडू शकतो. व्यसनाधीनतेवर व्यसन मुक्तीसाठी ‘कॉग्निटिव्ह’ बिहेवियरल’ थेरपी”, ‘ग्रुप थेरपी’ समुपदेशन गरजेनुसार औषधे , प्रशिक्षित मानसोपचार तज्ञांचा सल्ला व उपचार आवश्यक असतात. कुटुंबाची फरपट टाळण्यासाठी पुनर्वसन अत्यावश्यक असते. म्हणूनच म्हटले आहे की –व्यसन म्हणजे जिवंत मरण ,व्यसन सोडा फुलेल जीवन…
समाजमाध्यमे व पथनाट्यातून जनजागृती करुन निर्व्यसनी नागरिक व देश उभा राहील. व्यसनामुळे होणारी कुटुंबाची धुळधाण टाळता येईल.नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात व्यसनाधीनतेचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या २०% आढळले. व्यसनावरील उपचार करताना ‘कुटुंब शिक्षण’ हा महत्त्वाचा भाग आहे. आजतागायत ‘अल्कोहोलिक अनॉनिमस’ चे व्यसन मुक्तीचे व पुनर्वसनाचे कार्य चांगले आढळले आहे.
एकदा मजा म्हणून मद्यपान/धूम्रपान केले की त्याचे सवयीत व नंतर व्यसनात रुपांतर होते. म्हणून पहिल्या व्यसनाच्या अनुभवाला पायबंद घालणे जरुरीचे आहे. व्यसनाधीनतेचे शरीरावर, मनावर जसे दुष्परिणाम होतात तसेच आर्थिक व सामाजिक स्वास्थ्यही बिघडते. मद्यपान करुन वाहने चालविल्याने रस्त्यावरील अपघाताचे व मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. आजकाल संसर्गजन्य आजारातून होणा-या मृत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. व्यसनाधीन व्यक्ती व्यसनाची तलफ झाल्यावर स्वत:कडे पैसे नसल्यास कर्ज काढून /चोरी करुन व्यसन करतो, हे सामाजिक अनारोग्यास कारणीभूत ठरते. म्हणून व्यसनास प्रतिबंध व व्यसनाधीन झाल्यास उपचार व पुनर्वसन हेच या समस्येचे उत्तर आहे.
उत्साही, कार्यक्षम युवा पिढी निर्व्यसनी राहिल्यास भारत विकसित होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून कोणत्याही व्यसनापासून दूर राहू ही आरोग्य प्रतिज्ञा आचरणात आणण्याचा निश्चय प्रत्येक जण करुया. दारुऐवजी दूध पिऊन, कोणतीही पार्टी/मंगल कार्य साजरे करु या. व्यसन करुन स्वत:च स्वत:साठी खड्डा खोदण्यापेक्षा ती आर्थिक बचत भावी पिढीच्या शिक्षण, व्यवसाय –उद्योग यासाठी उपयुक्त ठरेल.स्वत:बरोबर मित्र-नातेवाईक, शेजारी यांनाही व्यसनापासून परावृत्त करु हीच खरी आरोग्य चळवळ व समाजकार्य ठरेल. ‘मी व्यसन करणार नाही व इतरांना करु देणार नाही’ हा मंत्र संपूर्ण समाजाला प्रगतीपथावर नेईल. हा आरोग्य संकल्प २०१८ सिध्दीस नेऊ.