प्रत्यक्षात लागणारा वेळ: १० मिनिटे
साहित्य – लाल टमाटे ३ मध्यम, कांदा : १ मध्यम,मिर्ची : एखाद दुसरी लहानशी तिखटपणा व आवडीनुसार कमीजास्त, कोथिंबीर : थोडीशी,लसूण : ३-४ पाकळ्या,जिरं,मीठ ,उक्कूसं कच्चं शेंगदाण्याचं तेल
कृती -: माझ्या झाडावरचे ३ टमाटे मला गेले २-४ दिवस खुणावत होते. प्लस काहीतरी चटपटीत बनवायचं होतं. मग म्हट्लं बर्याच दिवसांत न बनवलेलं भरीत बनवावं
तर,टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा ,टमाट्याची साल सुटायला आली की गॅस बंद करा ,दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर
चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. माझी स्पेशल शेफ’स नाईफ पाहून ठेवा,जिरं भाजून जाड कुटून घ्या.सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. (फोटोत सोयिस्कर भांडे नाही.)चव पाहून मीठ घालून मिक्स करा. वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता.ऊपरसे गार्निशके लिये थोडी कोथिंबीर डाला. फास्टात तयार झालेलं चटपटीत टमाट्याचं भरीत ‘दाखवायच्या’ भांड्यात काढून फोटो काढा,पोळी/फुलक्यासोबत मस्त लागतं.