गोड गोड शिरा रव्याचे लाडू, उपमा आपण आनंदाने खातो. तसंच रवा इडली, आप्पे या सारखे पदार्थही आपल्या नाश्त्यामध्ये खाण्यात येतात. रव्यामध्ये प्रोटीन, कर्बोहायड्रेट, फायबर असे पौषक तत्व आहेत. तसेच कॅल्शियम, लोह, मॅगेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि झिंक असते. यामध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन ए आणि डी देखील आढळते.फायबर जास्त असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यास मदत होते.रव्याचे सेवन केल्याने अनिमियासारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत करते.रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास रवा उपयोगी आहे. सध्या आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हे अत्यंत गरजेचे आहे. 5.रव्याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत करते.रव्यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असतात. त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत होते.
सत्यनारायण प्रसादाचा शिरा -Recipe in Marathi )
साहित्य -:१ वाटी रवा,१ वाटी साखर,१ वाटी तूप ,२ वाटी दूध,२ केळी,१ सफरचंद,केशर,वेलची जायफळ पावडर
सुकामेवा ( बदाम, काजू, चारोळी, मनुके )
कृती-: 1)गॅस चालू करा आणि कढई गरम करून घ्या. कढई गरम झाल्यावर तूप टाका.
2) तूप गरम झाल्यावर त्यात रवा घाला ५ मिनिटे रवा चांगला हलवून घ्या आणि नीट भाजा.
3) ५ मिनिटांनी सगळा सुकामेवा घाला त्याच बरोबर चिरलेले केळे सफरचंद घाला आणि दूध पण घालून घ्या.
4) परत २-३ मिनिटे शिजवून घ्या.
5) त्यानंतर साखर , वेलची जायफळ पावडर घाला आणि ५ मिनिटे शिजवून घ्यावे.
6) ५ मिनिटांनी पुन्हा एकदा हलवून घ्यावे आणि त्यात मनुके टाका.
7) पुन्हा २-३ मिनिटे झाकून ठेवा.
8) आता आपला प्रसादी साठी शिरा तयार आहे.