पुदिन्याच्या हिरव्यागार आणि स्वादिष्ट चटणीसोबत भजीचा आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडते. पुदिना चटणी (Pudina), कोशिंबीर, भजी किंवा एखाद्या पेयाची चव वाढवण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो.स्मरणशक्ती वाढते,यकृत निरोगी राहण्यासाठी,वजन कमी करण्यासाठी लाभदायक,मुरुम कमी करण्यासाठी,वेदनाशामक श्वसनासंबंधीचे रोग,तोंडाला येणारा दुर्गंध पुदिन्यातील औषधी गुणधर्म दम्याच्या रुग्णांसाठी अतिशय लाभदायक असल्याचे म्हटले जाते. धूळ, माती, अन्य गोष्टींपासून अॅलर्जी असणाऱ्यांनी पुदिन्याचा अर्क किंवा स्वयंपाकामध्ये पुदिन्याचा समावेशकेल्यास त्यांना भरपूर फायदे मिळतील.
प्रत्यक्षात लागणारा वेळ: ५ मिनिटे
साहित्य – १/२ कप पुदीना पाने,१/२ कप कोथिंबीर,१/४ कप बारीक चिरलेला कांदा,२ लसूण पाकळ्या (ऐच्छिक),२ हिरव्या मिरच्या १/२ टिस्पून जिरे,१/२ टिस्पून लिंबाचा रस,चवीपुरते मिठ,१/४ टिस्पून साखर
कृती -: सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. गरज वाटल्यास २ ते ३ टेस्पून पाणी घालून वाटून घ्यावे.हि चविष्ट चटणी व्हेज. सॅंडविच, मटार खस्ता कचोरी, सोया कटलेट्स, मेथीच्या देठाची भजी, ब्रेड रोल, मटार बटाटा करंजी, पट्टी समोसा, ढोकळा आणि इतर मधल्या वेळच्या पदार्थांसोबत छानच लागते.