Paneer is an Indian cheese that is high in nutritive value. It is rich in calcium and protein and aids in many body processes. It also prevents tooth decay. If your kids develop a habit of eating paneer every day, they will not suffer from tooth decay. Paneer provides instant energy to the body, a bite of cheese can act as your energy bar too. Hence, paneer should be part of your daily diet especially if you are a vegetarian as it fulfills the protein need of the body. Paneer is a fresh cheese common in South Asian cuisines, especially in India, Pakistan, Sri Lanka, Nepal, and Bangladesh. It is non-melting farmer cheese that is acid set and is unaged.
पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala -Recipe in Marathi )
साहित्य -:१५० ग्रॅम पनीर, ३-४ टेबलस्पून बटर, २ मध्यम कांदे,बारीक चिरूलेले,२ चमचे आलं-लसूण पेस्ट,५-६ तळलेले काजू
३ टोमॅटो,१/२ टीस्पून गरम मसाला,१ १/४ टीस्पून धनेपूड,१ टीस्पून जिरे पूड,१ टीस्पून लाल तिखट (बेडगी),१ टीस्पून हळद,
१ टीस्पून कसुरी मेथी, चुरडून,१/४ कप जाडसर क्रीम,मीठ आणि साखर चवीप्रमाणे
कृती-: 1. पनीरचे चौकोनी तुकडे करून बटरवर मध्यम फ्राय करून घ्या.२. टोमॅटोची जाड प्युरी करून ठेवा.३. कढईत २ टेबलस्पून बटर गरम करा. त्यातच १ चमचा तेल घाला. मग आलं-लसूण पेस्ट घालून मिनिटभर परता.
नंतर कांदा घालून शिजेपर्यंत परता.४. कांदा शिजला कि, त्यात हळद,तिखट,गरम मसाला,धने-जिरे पूड आणि किंचित मीठ घालून छान वास सुटे पर्यंत परतून घ्या. गॅस बंद करा.५. हे सगळे मिश्रण आणि तळलेले काजू एकत्र करून मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्या. गरज वाटल्यासपाणी न घालता थोडीशी टोमॅटो प्युरी घालून वाटा.६. आता पुन्हा कढईत १ टेबलस्पून बटर गरम करा आणि वाटलेला कांदा आणि काजूची पेस्ट घालून २-३ मिनिटे परता.७. मग टोमॅटो प्युरी,मीठ आणि साखर घालून नीट मिक्स करा. झाकण ठेवून ८-१० मिनिटे ग्रेवी शिजवत ठेवा. कसुरी मेथी घाला आणि गॅस बंद करा.८. पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा.झाकण ठेवून ५-७ मिनिटांनी वरून क्रीम घाला आणि हलक्या हाताने एकत्र करा.९. वरून कोथिंबीर नी सजवा आणि पराठा किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.