Maharashtrian Pooranpoli -पुरणपोळी – Recipe in Marathi




Like
Like Love Haha Wow Sad Angry

पुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा सणाच्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. त्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात.पुरणपोळी तूप, ताक, दुध, गुळवणी किवा कटाची आमटी ह्या सोबत खातात. तसेच, पुरणपोळीसोबत मिरचीचे लोणचेही चवीला खातात. कर्नाटक मध्ये पुरणपोळी बटाटा आणि वांगी या भाजीसोबतही खाल्ली जाते.

 Maharashtrian Pooranpoli -पुरणपोळी -Recipe in Marathi )


१० मध्यम पोळ्या
वेळ: २५ मिनिटे (पुरण आणि भिजवलेले पीठ तयार असल्यास)

साहित्य -:१ कप चणाडाळ,१ कप किसलेला गूळ,एक कप मैदा,१/२ कप गव्हाचे पिठ,७ ते ८ टेस्पून तेल,१ टिस्पून वेलचीपूड, कोरडे तांदुळाचे                  पीठ

कृती-: १) चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावे. डाळ शिजली कि त्यातील पाणी
निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.२) डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावे.
त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले मिश्रण
पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात १ चमचा वेलचीपूड घालावी.
३) मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे.
४) मैदा आणि कणिक मिक्स करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे. आणि सैलसर
मळून घ्यावे. भिजवलेले पिठ २ तास मुरू द्यावे.
५) पुरणाचे दिड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा
व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
६) पोळपाटावर थोडी तांदुळाची पिठी घेउन हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.
साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी. या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात.
थंड पोळ्या दूधाबरोबर छान लागतात.

टीप:
१) वेलचीऐवजी जायफळपूड वापरू शकतो. त्याचा स्वादही चांगला येतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा