जगात पैशाची समस्यां नसून, त्याबाबत आसक्ती ची भावना हीच खरी समस्यां. जीवनात पैशाची अत्यन्त गरज आहे. त्यासाठी पैसा अवश्य यावा परंतु आपल्याला सत्य प्राप्त करण्यात सहाय्यभूत ठरावा. पैश्या विषयी आसक्ती निर्माण होते तेव्हा आपण योग्य, नवे सृजनात्मक विचार करायचे विसरून जातो. स्वतःची पैसा कमविण्याची योग्यता वाढवणारे नेहमी निश्चित असतात. पैशाची गरज भासते तेव्हा त्यांना नवनवीन कल्पना शोधण्याची क्षमता त्यांना माहिती असते. कारण समस्यां पैशाची नसून कल्पनेची आहे हे ते जाणतात. पैशासाठी विचार करण्याचे प्रशिक्षण मिळावे, आपल्यातील आळस दूर करणे हे महत्वाचे. स्कारात्मक निर्णय घेण्याची योग्यता असावी. नोकरीच केली पाहिजे असे काहीही नाही शून्यातून जग निर्माण करणारे जे असतात. त्यांच्या जवळ तरी कुठे दौलत असते. त्यांच्या जवळ असते ते कार्य प्रणाली, कलाकौशल्य, निर्णय घेण्याची क्षमता,मेहनत,एकाग्रता मुख्यत्वे वेळेचं महत्व. फार संधी साधू, शिस्तबद्ध असतात तेव्हा ते शून्यातून प्रगती पंथ गाठतात. त्यांचा हेवा वाटावा परंतु त्याच्या बद्दल जळण भावना नसावी.
आपण आपल्या नशिबाला दोष न देता न रडता संधी ओळखायला शिका. मेहनतीचा पैसा असतो त्याच्या जवळ सत्याच्या मार्गानेच पैसे येतो, तोच समाधानी असतो. तो पैसा पुरेपूर व भरपूर असतो. आपल्यातील आळस दूर करणे हे महत्वाचे. स्कारात्मक निर्णय घेण्याची योग्यता असावी. नोकरीच केली पाहिजे असे काहीही नाही शून्यातून जग निर्माण करणारे जे असतात. त्यांच्या जवळ तरी कुठे दौलत असते. त्यांच्या जवळ असते ते कार्य प्रणाली, कलाकौशल्य, निर्णय घेण्याची क्षमता,मेहनत,एकाग्रता मुख्यत्वे वेळेचं महत्व. फार संधी साधू, शिस्तबद्ध असतात तेव्हा ते शून्यातून प्रगती पंथ गाठतात. त्यांचा हेवा वाटावा परंतु त्याच्या बद्दल जळण भावना नसावी.
पैसा हे वरदान आहे त्याला अभिशाप बनवू नका.
पैशा सोबतच नियोजन हे अवश्य आहे. आपल्याला देवाण घेवाण सहज व्हावी.पैसा जास्त असो व कमी त्याबद्दल नियोजन असणे अति आवश्यक आहे. हि एक विस्मय जनक व्यवस्था आहे. पैशा सोबत अहंकार येऊ देऊ नका आल्यास तो शाप बनू शकतो. त्या शापाची फार मोठी किंमत मोजावी लागते.
कुणाचा हि घेवाणीचा पैसा बुडवू नका, ज्या कालावधीत देणे जमत नसल्यास प्रथम पुढे होऊन सांगा नम्र होऊन वेळ मागा. मात्र पैसा परतफेड करा. कर्जदारापासून पळ काढू नका. मेहनतपूर्वक काम करून कर्ज फेडावी. ते फेडल्या नंतर आपण हि मददतीची चा विश्वास द्यावा.
पैशा जीवनात अवश्य वाढवावा पण त्यानं आपल्याला सत्यापासून दूर नेता कामा नये.
क्षमता वाढवा,त्यातून मौल्यवान दौलत प्राप्त करा. पैसे कमवताना प्रेमाचं गाठोडं,ध्यानाची दौलत, वेळेची समृद्धी, निर्भयतेच धन आणि आरोग्याच्या मोहरा मिळविण्याचे रहस्य, हे जाणून घ्यायला पाहिजे. तसेच नियोजन योग्य असेल तर पैसा भरपूर आहे.
पैसा हि ईशवराची रचनात्मक योजना आहे. त्यानुसारच हा मायेचा खेळ मनुष्य खेळत असतो. बचत करण्याची थोडी तरी सवय करून घ्यावी. बचत हि संपत्तीची विशेषता आहे. समजदार अशी श्रीमंत लोक नेहमीच काळजी पूर्वक बचत करीत असतात. बचत करणे हे फार काही कठीण नाही तरी बचत केलेला पैसा सांभाळून त्याची वृद्धी करणे हे सर्वानाच जमत नाही.
पैशाबद्दल आदर असावा, आसक्ती नको. पैशा प्रति प्रेम असावे, मोह नको. पैशा प्रति समज असावी,अज्ञान नको. पैशा प्रती मनन असावं, चिंता नको. पैसा हि वस्तू असावी, ईशवर नको. पैशाची जोपासना करा. त्याला जादूची पेटी बनवा,नकारात्मक विचाराने पैसा कमी होतो. बचत किंवा बाजूला ठेवलेला पैसा त्याचा विनियोग करा, योग्य कामात गुंतवा म्हणजे तो वाढत राहील. फसवणूक करणाऱ्या योजनांना पारखून घ्या. बँक तज्ञा कडून चौकशी करून घ्या.