नुकतेच एक आर्टिकल वाचत असताना एक मनाला भावेल असे आर्टिकल मी वाचले. त्या आर्टिकल मध्ये एका सामान्य व्यक्तीचे जीवन आणि त्यात असणारे बदल तसेच जीवनातील रिलेशन (संबंध) यांचे महत्व पटवून देणारा हा आर्टिकल. आपण नक्की हा आर्टिकल वाचावा म्हणून मराठी अनलिमिटेड च्या माध्यमातून हा शेयर करीत आहे. या आर्टिकल चे नाव होते ” १ BHK फ्लॅट ” मी याचा अंत करीत याला म्हणतो ” २ BHK फ्लॅट आणि अंत “.
भारतीय अभियंत्याचे विचार मन हेलावून टाकणारे वास्तव…
माझ्या आई वडिलांचे स्वप्न होते कि, मी अभियांत्रीकिची पदवी प्राप्त करून शूरांची आणि संधीची भूमी असलेल्या अमेरिकेतील एखाद्या बहुराष्र्टीय कंपनीत नोकरीला लागावे. जेव्हा मी अमेरिकेत आलो तेव्हा ते स्वप्न जवळपास पूर्ण होत आले होते. आता शेवटी मला जिथे हवे होते तिथे मी पोहोचलो होतो. मी असे ठरवले होते कि, मी या देशात पाच वर्षे राहीन. त्या काळात मी भारतात स्थिरस्थावर होण्याच्या दृष्टीने पुरेसा पैसा मिळवेन.
माझे वडील सरकारी नोकरीत होते. निवृत्तींनंतरची त्यांची संपत्ती म्हणजे त्यांचा एक बेडरूम चा नीटनेटका फ्लॅट. मला त्यांच्या पेक्षा जास्त कमवायचे होते. मला सतत घरची आठवण येऊ लागली. एकाकी वाटू लागले, स्वस्तातील इंटरनॅशनल फोन कार्ड वापरून आठवड्यातून एकदा मी घरी फोन करायचो. दोन वर्षे गेली. मॅकडोनाल्डचे बर्गर व पिझ्झा खाण्यात आणि डिस्को मध्ये, आणखी दोन वर्षे परकीय चलनाचे दर पाहण्यात गेली. जेव्हा रुपयाची घसरण व्हायची तेव्हा मला आनंद व्हायचा.
शेवटी मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आई वडिलांना सांगितले कि, मला फक्त दहा दिवसांची सुट्टी आहे आणि त्या दहा दिवसांतच सगळे काही झाले पाहिजे, मी स्वस्तातील विमानाची तिकीट काढली. मी अतिशय आनंदी होतो. भारतात परत जायचे, आईवडिलांना, काही नातेवाईकांना आणि मित्रांना भेटवस्तू द्यायच्या असे मी ठरवले होते, मी सगळ्यांनांच मिस करत होतो. आता खूप गप्पा मारायच्या.
घरी पोहोचल्यावर आलेल्या सगळ्या स्थळांचे फोटो मी पाहिले. वेळ कमी असल्यामुळे त्यातील एकीची मला निवड करायची होती. मुलीचे आई वडीलहि समजूतदार होते. दोन-तीन दिवसातच माझे लग्न झाले. जास्त सुट्टी न्हवतीच. लग्नानंतर आईवडिलांना काही पैसे दिले. शेजार्यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती केली व आम्ही दोघे अमेरिकेला पोहोचलो.
पहिले दोन महिने पत्नीला हा देश आवडला ती आनंदात होती. मात्र हळूहळू तिला एकाकी वाटू लागले. कधी कधी ती आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा भारतात फोन करू लागली, आमची बचत कमी व्हायला लागली. दोन वर्षांनी आम्हाला मुले झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. मी जेव्हा जेव्हा भारतात आईवडिलानां फोन करायचो तेव्हा तेव्हा ते नातवंडांना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे. त्यांना नातवंडांना पाहायचे होते.
दरवर्षी मी सहकुटुंब भारतात जायचे ठरवायचो पण पैशाची अडचण असायची आणि जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा. वर्षामागून वर्षे गेली. भारतात जाऊन यायचे माझे स्वप्न लांबत चालले होते. मग एके दिवशी मला संदेश मिळाला, माझे वडील गंभीर आजारी होते. मी खूप प्रयत्न केला पण मला सुट्टी मिळू शकली नाही आणि मी भारतात जाऊ शकलो नाही. आई देखील आजारी पडली होती. मग अचानक समजले कि, दोघांचेही निधन झाले. आई वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला आणि विधी करण्यासाठी मी तिथे उपस्थित न्हवतो. सोसायटीतील लोकांनी सगळे विधी केले. नातवंडांचे तोंड न पाहताच माझे आईवडील या जगातून निघून गेले होते.
आणखी तीन चार वर्षांनी मुलांचा नकार असताना आम्ही भारतात जाऊन स्थिरस्थावर होण्याचे ठरवले पत्नी आनंदित झाली. आम्ही भारतात आलो आणि राहण्यासाठी योग्य घर पाहू लागलो. पण माझ्याकडे मर्यादित पैसे शिल्लक असल्याने नवीन घर घेता आले नाही. मी परत अमेरिकेला आलो. मुले भारतात राहण्यास तयार नसल्याने आम्ही चौघेही परत अमेरिकेला आलो. मुले मोठे झाली, मुलीने अमेरिकी मुलाशी लग्न केले आणि माझा मुलगा अमेरिकेत आनंदात राहतो. मी ठरवले कि, आता पुरे झाले आणि सगळा गाशा गुंडाळून भारतात आलो, चांगल्या सोसायटीत दोन बेडरूमचा फ्लॅट घेण्याइतपत पैसे माझ्याकडे होते. त्यानुसार मी चांगला फ्लॅट घेतला.
आता मी साठ वर्षांचा आहे. आणि मी फक्त जवळच्या मंदिरात जाण्यासाठीच फ्लॅटच्या बाहेर पाऊल टाकतो. माझ्या पत्नीचे निधन झाले आणि ती स्वर्गलोकीच्या यात्रेला निघून गेली.
कधी कधी मला वाटते हे सगळे कशासाठी आहे? याचे मोल ते काय?
माझे वडील भारतात राहत होते तेव्हा त्यांच्या नावावरही एके फ्लॅट होता. माझ्याकडे त्यापेक्षा जास्त काही नाही, फक्त एक बेडरूम जास्त आहे. त्या एका बेडरूम साठी मी माझे आईवडील गमावले. मुलांना सोडून आलो, पत्नी गेली. खिडकीतून बाहेर पाहतांना मला माझे बालपण आठवते आणि त्या सुंदर आठवणी मनात फेर धरतात. अधूनमधून मुलांचा अमेरिकेतून फोन येते. ते माझ्या प्रकृतीची चौकशी करतात. अजून त्यांना माझी आठवण येते यातच समाधान आहे.
आता जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा पुन्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील. देव त्यांचे भले करो. अर्थातच या व्यक्तीने आयुष्यात इतके अमूल्य दिवस आणि आठवणी होरवापडून फक्त एक बेडरूम जास्त मिळवली. आपण संवांनीच वेळेला आणि जीवनातील रिलेशन ला खूप महत्व द्यावे .
पुन्हा प्रश्न कायमच आहे. हे सगळे कशासाठी आणि काय किंमत मोजून?
मी अजूनही उत्तर शोधतोय !
जवळच्या आप्तस्वकीयांसमवेत आयुष्य घालवा. आनंदाचे क्षण जगा. पैसा माणसाला आनंद देऊ शकत नाही. आईवडील, मुले यांचा सहवास नक्कीच आनंद आणि प्रेम देणारा असतो. विचार करा केवळ आणखी एका बेडरूमसाठी? जगण्याचे मोल त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यासाठी आयुष्य पणाला लावू नका.
अर्थातच या व्यक्तीने आयुष्यात इतके अमूल्य दिवस आणि आठवणी होरवापडून फक्त एक बेडरूम जास्त मिळवली. आपण संवांनीच वेळेला आणि जीवनातील रिलेशन ला खूप महत्व द्यावे .
6 Comments. Leave new
Heart 💕 touching article
Dhanyawad for sharing your feedback on marathi unlimited.
जितना जीवन में काम का महत्व है उतनाही रिलेशन का। अपने माँ बाप को नाभूलिए.
Dhanyawad for sharing your feedback on marathi unlimited.
Jiwanat apan kamala tasel relations la suddha mahatw dile pahije. Work is workship mhananarya lokanna kama shiway kahich disat nahi. paisa and kam hech tyanchya jiwanche dheya asate.
Apan swathala kuthe tari sawarle pahije. kama wyatirikt jag khup khup mothe ahe.
Dhanyawad for sharing your feedback on marathi unlimited.