नव्यायुगातील आयाम, स्वेच्छामरण | Dimentions of New world and Desire of Death
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Suicide is not a matter of right or happiness. Suicide is just a tendency of suicide due to depression and depression. Such phenomena occur as actual fallout optimism, directional state, and non-progressive awakening. Read This Marathi article on Dimentions of New world and Desire of Death.

Dimentions of New world and Desire of Death
कोणत्याही समस्येवर आत्महत्या करणे हि योग्यता किंवा सुखाची बाब नव्हे. केवळ विमनस्कता, नैराश्य क्लेश यामुळे केलेली आत्महत्या हि एक प्रवृत्ती ठरत आहे. वास्तविक नष्ट झालेला आशावाद, दिशाहीन अवस्था योग्यवेळी न होऊ शकलेले प्रबोधन याची परिणीती म्हणून अशा काही घटना घडत असतात. आत्महत्या करणाऱयांना जात,वय,लिंग यांचे बंधन नसते. त्यांचे अंतिम विचारांचे उत्तर म्हणजे आत्महत्या,परंतु हे समर्थनीय नाही हेच त्यांच्या लक्षात येत नाही. आणि हे समर्थनीय ठरत नाही. भारतीय कायद्यात स्वतःचा अथवा इतरांचा जीव घेण्यास अनुमती नाही.मात्र जे आत्महत्या करण्यात सफल होतात, अथवा ज्यांचा प्रयत्न विफल होतो या दोन्ही घटना कायद्याच्या  नजरेत फरक दर्शवितात. ज्याचा प्रयत्न अपयशी होतो, तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरतो. अगदी मरणासन्न अवस्थेत फक्त श्वास चालू असलेल्या स्थितीत मरण देणे हे कायद्याला मान्य नाही.ज्याच्या आत्महत्येच्या माध्यमातून जीव जातो  तो कायद्याच्या कचाटातून सुटतो.आणि जे वाचतात त्यांना मात्र शिक्षा होते, म्हणजे शिक्षा भोगायची नसेल तर आत्महत्या विफल होऊ द्यायची नाही. असा अर्थ कायद्याचा आहे हे म्हणावे लागेल. आत्म हत्येचा प्रयत्न करणे हा भारतीय दंड संहितेच्या ३०९ या कलमानव्ये दंडनीय अपराध आहे. सन १९७१ मध्ये विधी वियोगाने ४२ व्या अहवालात  हे कलम रद्द करण्याची शिफारस केली होती, त्याप्रमाणे १९७८ मध्ये राज्यसभेत हा कायदा मंजूर करण्यात आला. मात्र लोक सभेत हा कायदा मंजूर करण्यात आला नाही. नको असलेले आयुष्य संपुष्टात आणणे हा जगण्याचा मूलभूत हक्क आहे. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आहे.परंतु संपूर्ण्पणे निष्क्रिय झालेल्या  एखाद्या व्यक्तीच्या द्या मरणाचा संबंध राज्यघटनेतील तरतुदीत नाही. तर नैतिकता धार्मिक आधार  आणि वैद्यकशास्त्र यांच्याशी संबंधित  असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.  दयामरणाच्या परवानगी बाबत निर्णय हा आवश्यकच होता  हि भूमिका केंद्र सरकारची असते, हि भूमिका त्यांनी स्पष्ट करावी हे गरजेचे आहे. असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होतेचआणि या बाबत संसदेत व्यापक अशी चर्चा झाली.

निष्क्रिय व्यक्तीचे द्या मरण हा आत्महत्येचा प्रकार असून कायद्याने तो गुन्हाच आहे  असे मत केंद्र सरकारची भूमिका मांडणाऱ्या  अटर्नी जनरलनी द्या मरणाला  कायदेशीर दर्जा  दिल्यास त्याचा गैर वापर होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती,  अशाच एका प्रकरणात २०११ मध्ये  दिलेल्या निकालातील  मतामुळे या कायद्याबाबत अधिक स्पष्टता येण्याची गरज होतीच. असे सर्वोच्च  न्यायालयाच्या  खंडपीठाने  अधोरेखित केले होते. वास्तविक प्रत्येक व्यक्तीच्या  आयुष्याची  सुरवात आणि शेवट  चान्गल्या प्रकारे व्हावा  हा विचार कोणीही टाळू शकत नाही  परंतु हे कुणाच्याच हातात नाही असे असताना  इच्छामरणाचा विषय पुन्हा पुन्हा चर्चेत येतो.  परंतु कायदा व सुव्यवस्था हा विषय  राज्याचा असल्याने त्याचे मत मागणे अति आवश्यक असते.  त्यानुसार विधी आयोगाच्या  २१० व्या अहवालात  ३०९ हे कलम रद्द  करण्याची शिफारस झाली.  त्या नुसार १५० वर्षे अस्तित्वात  असणारा हा गुन्हा  भारतीय दंड संहिते मधून काढून टाकण्याचे केंद्र सरकारने ठरविले, त्यासाठी आवश्यक  दुरुस्तीचे विधेयक संसदेत मंजूर करणे आवश्यकच होते परंतु काही राज्यातून याला विरोध तो दर्शविलाच.

आत्महत्या म्हणजे स्वतःच आयुष्य  संपविणे या नुसार इच्छामरण हा दुसरा प्रकार विचारार्थ पुढे येत आहे.  इच्छा मरण पत्करणारा आपली हि इच्छा बोलून दाखवीत असतो. त्यासाठी अघोरी उपायांचा  विचार करत्रा येणार नाही.  निसर्गाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे. तो दुसर्या कोणालाही हिरावून घेता येत नाही.  परंतु एखाद्याला जीवन संपविण्याची  मानसिकता निर्माण झाली तर ती हत्या ठरेल या पार्श्ववभूमीवर स्वतःचे जीवन संपविण्यासाठी  परवानगी द्यायची काय हाही प्रश्न समोर येत असे. परंतु एखाद्या व्यक्तीचे जगणेच  मरणागत झाले असेल त्याच्या न संपणार्या यातना सहनशीलतेच्या पलीकडच्या असतील तर त्या यातना त्याला कितपत द्यायच्या ? परंतु मरणासन्न जगणार्या  व्यक्तींना ज्या यातना होतात याचा विचार होणे फार गरजेचेच होते.  म्हणूनच समाजातील सर्व स्तरातील  तज्ञ मंडळी, कायदे पंडित यांच्या व्यापक, विचारातून इच्छा मरणाचा प्रश्न सोडविण्याचा नितांत गरज होती. अलीकडे  इच्छामरणाचं मार्ग काही प्रमाणात प्रशस्त झाला असला तरी  यात प्रॅक्टिकली विचार करता अंनत अडचणी येणार हेही सिद्धच आहे  परंतु ज्यांच्या साठी मरणाने केली सुटका, परंतु जगण्याने अति छळले होते, अशी स्थिती राहणार नाही. त्त्यांच्यासाठी इच्छामरणाचा ठराव हा योग्यतेचा होय.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: