अध्यात्मिक आरती संग्रह | संत ज्ञानदेवांची | एकनाथांची | रामदासांची | नामदेवांची | तुकारामांची




saint in maharashtra

संतमंडळी महाआरती

आरती संत मंडळी , हाती घेऊनि पुष्पांजळी |

ओवाळीन पंचप्राणें, यांचे चरण न्याहाळी ||धृ ||

मच्छेन्द्र गोरक्ष गैनी निवृत्तीनाथ |

ज्ञानदेव नामदेव खेचर विसोबा संत |

सोपान चांगदेव | गोरा जगमित्र भक्त |

कबीर आणि पाठकनामा | चोखा परसा भागवत ||१||

भानुदास कृष्णदास | वडवळसिद्ध नागनाथ |

बहिरपीसा मुकुंदराज | केशवस्वामी सूरदास |

रंगनाथ वामनस्वामी | जनजसवंतदास ||२||

एकनाथ रामदास | यांचा हरीपदीं वास |

गुरुकृपा संपादली | स्वामी जनार्दन त्यास |

मीराबाई मुक्ताबाई | बहिणाबाई उदास |

सोनार नरहरी हा | माळी सावतादास ||३||

रोहिदास संताबाई | जणी राजाई गोणाई |

जोगा परमानंद साल्या | शेख महंमद भाई |

निंबराज बोधराजा | माथा तयांचे पायी |

कुर्मदास शिवदास | मलुकदास कामाबाई ||४||

नारा म्हांदा गोंदा विठा | प्रेमळ दामाजीपंत |

तुकोबा गणेशनाथ | सेना नरसीमहंत |

तुलसीदास कसंबया | पवार संतोबाभक्त |

महिपती तुम्हांपाशी | चरणसेवा मागत ||५||

 


संत ज्ञानदेवांची आरती १

आरती ज्ञानराजा | महाकैवल्य तेजा |

सेविती साधुसंत | मेनू वेधला माझा आरती||धृ ||

लोपले ज्ञानजगी | हित नेणती कोणी |

अवतार पांढुरंग | नाम ठेविले ज्ञानी ||१||

कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी |

नारद तुंबरही | साम गायन करी ||२||

प्रगट गुह्य बोले | विश्व् ब्रम्हाची केले |

रामा जनार्दनीं | पायी टकची ठेलें || ३|| .आरती ||


संत ज्ञानदेवांची आरती २

जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा | जिवा शिवा आदी परब्रम्ह ठेवा ||धृ ||

इंद्रायणीचे तटीं धरिला रहिवास | विश्व् तारावया लक्ष्मीनिवास |

ज्ञानेश्वररूपे धरिला निजवेष | वर्मजाणे त्या सद्गुरू उपदेश ||१||

कृष्ण एकादशी कार्तिकमासी | पंढरीनाथ आपण सनकादिकेंसी |

यात्रेलागिं येति स्वानन्दराशी| दर्शन घडे तया निजमुक्ती देसी ||२||

महिषी पुत्र केला वाचक वेदाचा | प्रतिष्ठांनी गर्व हरिला विप्राचा |

विशेष अर्थ केला भगवतगीतेचा | अजाण वृक्ष पिंपळ शोभे कनकाचा ||३||

संकळसिद्ध गणांमाजी तुं श्रेष्ठ | ज्ञानदेव अनुभवी ज्ञानावरिष्ठ |

अनुताप ज्याचा विश्व् घनदाट | मुक्तेश्वरी न धरे प्रेमाचा लोट ||४||

 


संत एकनाथांची आरती

आरती एकनाथा महाराजा समर्था |

त्रिभुवनी तूंचि थोर जगतगुरु जगन्नाथा || धृ||

एकनाथ हे सार वेदशास्त्राचें गुज |

संसार दुःख नाशे महामंत्राचें बीज ||१||

एकनाथ नाम घेतां सुख वाटलें चित्ता |

अंनत गोपाळदास | धणी न पुरे गाता ||२||

 


संत रामदासांची आरती

आरती रामदासा | भक्त विरक्ती ईशा |

उगवला ज्ञान सूर्य | उजळोनि प्रकाशा ||धृ||

साक्षात शिवांचा अवतार मारूती|

कलिमाजी तेचि जाली रामदासाची मूर्ती ||१||

विषयी दशकांचा दासबोध ग्रँथ केला |

जडजीवा उद्धरिलें नृप शिवासी तारिले ||२||

ब्रम्हचर्य व्रत ज्याचे | रामरुप सृष्टी पाहें|

कल्याण तीही लोकीं | समर्थ सद्गुरूपाय ||३||


संत नामदेवांची आरती

जयजयाजी भक्तराया | जिवलग नामया |

आरती ओवाळितां चित्तपालटे काया ||धृ||

जन्मता पांढुरंगे | जिव्हेवरी लिहिले |

शतकोटी अभांग | प्रमाण कवित्व रचिलें ||१||

घ्यावया भक्तिसुख पांढुरन्गे अवतार |

धरूनिया तीर्थमिषें केला जगाचा उद्धार ||२||

प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परीस केला |

हरपली विषमता द्वैतबुद्धी निरसली ||३||

समाधी महाद्वारीं श्रीविठ्ठल चरणीं |

आरती ओवाळितो परिसा कर जोडुनी ||४||


संत तुकारामांची आरती

आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |

सच्चितानंद मूर्ती | पाय दाखवी आम्हां ||धृ||

राघवें सागरांत | पकषण तारिलें |

तैसे हे तुकोबांचे अभांग उदकीं रक्षिले ||१||

तुकींता तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |

म्हणोनि रामेश्वरें चरणीं मस्तक ठेविलें ||२||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड