Chandra (Sanskrit: चन्द्र, IAST: Candra, lit. “shining” or “moon”) is a lunar deity and is also one of the nine planets (Navagraha) in Hinduism. Chandra is synonymous to as Soma. Other names include Indu (bright drop), Atrisuta (son of Atri), Sachin (marked by hare), Tārādhipa (lord of stars) and Nishakara (the night maker). Here is the aarti of lord moon.
जयदेव जयदेव जय श्री शशिनाथा | आरती ओवाळू पदी ठेवुनीं माथा ||धृ||
उदयीं तुझया हृदयी शीतलता उपजे | हेलावून क्षीराब्धि आनंदे गर्जे |
विकसित कुमुदिनी देखुनि मम रंजे | चकोर नृत्य करिती अद्भुत सुख माजे ||१||
विशेष महिमा तुझा न कळे कोणासी | त्रिभुवनी द्वादशराशी व्यापूनि राहसी |
नवंही ग्रहांमध्ये उत्तम आहेसी | तुझे बळ वांछीती सकाळी कार्यासी ||२||
शंकरगणनाथादिक भूषण मिरविती | भाळीं मौळीं तुजला संतोषे धरिती |
संकटनाम चतुर्थीस पूजन जे करिती | संतती संपत्ती अंती भवसागर तरीती || ३||
केवळ अमृत रूप अनुपम्य वलसीं | स्थावर जगम यांचे जीवन आहेसी |
प्रकाश अवलोकितां मन हें उल्हासीं | प्रसन्न होऊनि आतां लावी निजकांशी || ४||
सिंधूतनया बिंदू इंदू श्रीयेचा | सुकीर्तीदायक उद्दुगण यांचा |
कुरंगवाहन चंद्र अनुचित हे वाचा | गोसावीसुत विनवी वर दे मज साचा ||५||