आरती श्री नवनाथांची




Like
Like Love Haha Wow Sad Angry
4

The Navanath (Sanskrit: नवनाथ), also spelt as Navnatha and Nao Nath in vernacular languages, are the nine saints, Masters or Naths on whom the Navnath Sampradaya, the lineage of the nine gurus is based.  They are worshipped collectively as well as individually. here is the aarti sangrah of Navnath Maharaj.

 

आरती श्री नवनाथांची

जयदेव जयदेव जय नवनाथा | भक्तगण उद्धरी देउनी सिद्ध करा ||धृ ||  

मच्छिन्द्र गोरख तैसे जालिंदरनाथ | कानिफ  गहिनीनाथ नागेशासहित |

चर्पटी भर्तरी रेवण मिळुनी नऊनाथ  | नवनारायण अवतार संत ||१||

भक्तीशक्ती बोधावैराग्यहीत | तापत्रय ते हरिती स्मरा एकचित्त |

नमने चरित्र पठणे दुरितांचे अंत | भक्त जणांशी तारी नवनाथ खचित ||२||

इहपर साधूंनी देती समस्त नवनाथ | भूत समंधा  प्रेता घालविती सत्य |

भक्त जणांचे पुरवा तुम्हीच संकल्प | कृतार्थ होता दावा सदानंद रूप ||३||

दुखी दरिद्री लोकांना तारा | देउनी सुख संपत्ती मुक्ती दोहीं करा |

स्मरन करावे आता नित्य नित्यनाथा | शरणागत मी तुमच्यापायी मम माथा ||४||

नवनाथची आधार सकलांनाआता | आरती ओवाळिता हरळी भवचिंता |

ब्रम्ह सनातन शांती देई मम चित्ता | शरण विनायक लोटांगण आता ||५||


 

जयदेव जयदेव जय ‘नवनाथा’ आरती स्वीकारावी प्राज्ञानीं कवंता ||धृ || 

मछिंद्र, गोरक्ष जालींदरनाथ | कानिफा, चौरंगी, आडबंगीनाथ |

रेवण,चरपटी, गहिनी, नि वटसिद्ध | भर्तरी आणि मीननाथ ||१||

जन्म आपुला ‘अयोनी संभव’ | त्यात ‘श्री दत्तात्रेय – अनुग्रह’ |

तेणें प्रसन्न केली दैवतें | संपादिली सर्व विद्या अस्त्रांतें || २||

त्या महान विद्या अस्त्रांतें | केले हो सुखी सकळ जनांसी | चौर्याऐंशी सिद्ध करुनि |

दत्त पंथाचा हा नाथ पंथाचा हो वाढविला महिमा ||३||

चरणासी एकचि ” नम्र विंनती, ‘या बाळांवरी’ ठेवा कृपादृष्टी ” ||

‘ नवनाथ ! नवनाथ !’ करिता धावा |  तारुनि न्यावे ‘या बालकांना ‘ || ४||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
4




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा