Thinkers of Humanity and Saints




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Thinkers of Humanity and Saints : According to the theory of the law of attraction, our thoughts are magnetic and have their own frequency and consequently when we think we emanate a frequency depending on the kind of thinking we have and for the fact that our thoughts are magnetic, we attract everything located on the same frequency. Read complete Marathi article for Humanity and Saints.

books-power-change-thoughts-life

मानवता वादी विचार आणि संत:

आपल्या महाराष्ट्र राज्याच्या  सांस्कृतिक परंपरेचा सरवोचच सम्मान म्हणजे इथली अनेक शतकांची संत परंपरा असेच त्याचे वर्णन करावे लागेल. महाराष्ट्रात गेल्या सातशे वर्षापासूनच काळ हा आपण संतांचा आणि संत वाङमयाचा काळ म्हणूनच ओळखतो. य्७या वाड्मयात सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब किती उमटलेले असते त्यावर वाङमयाचे आयुष्य व त्याचे स्वरूप अवलंबुन असते.  म्हणजे समाजकता हे जीवन व जातिवन्त साहित्याचे प्रमुख लक्षण असते. त्या काळापासून ते आजही तितकेच वाचनीय व भक्तीत लोकप्रिय आहे.आजही अशिक्षित पासून ते शिक्षितांपर्यंत सर्वांच्याच ओठाओठांवर आहे. महाराष्ट्रा नंतर अन्य कोठेही इतकीसी असेल असे वाटत नाही. संत आणि जागतिक वाङमयाचा जीवंतपणा  ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. संतांनी समाजातील विकृती नाहीशा करून समाजाला नैतिक मार्गावर आणण्याचे महत्वाचे कार्य केलेले आहे.

भारतीय समाजाच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक  विचारांना नवा आशय प्राप्त करून देऊन सम्पूर्ण समाज जीवनाला एका नव्या वाटेवर आणण्याचे युग प्रवर्तक कार्य संतांनी केलेले आहे. अश्या या वैशिष्ठ पूर्ण परंपरेचा यासाठीच अभिमान बाळगावा लागतो. भक्तीच्या माध्यमातून समाजातील भेदभाव दूर करण्याचा मोठा संदेश दिला गेला आहे. प्रामुख्याने पंढरपूरच्या पांढुरंगाच्या निमित्ताने दरवर्षी भरणाऱ्या आषाढी , कार्तिकी यात्रा आणि यासाठी महिनाभर आधी वारीचा पायी प्रवास करून समाजातील सगळे भेदभाव कसे अमंगल आहे हे सांगण्याचा पूर्ण प्रयत्न संतांनी केल्याचे स्पष्ट दिसून येते.

संत परंपरेने समाजाला भक्तीची, चिंतनाची,आत्मपरीक्षणाची शिकवण दिलेली आहे. संतांनी मानवतावादी विचार जनसमाजात चांगल्या रीतीने रुजविण्याचा सखोल प्रयत्न केलेला आहे. मनुष्याने एकमेकांना मदत करून चांगले नागरिक समाजात निर्माण व्हावे, जीवन कसे सत्कारणी लागेल याचे शिक्षण दिलेत.

संतांनी कोणतेही लौकिक शिक्षण न घेता म्हणजेच आजच्या सारख्या शाळा, कॉलेजेस, पुस्तकी पांडित्य असे काहीही त्याच्या जवळ नव्हते. घराघरातून आणि समाजातून घडविले जाणारे संस्कार हाच त्यांचा जीवन शिक्षणाचा सर्वात मोठा आधार होता. त्या काळात जीवन मूल्यांना अधिक महत्व होते. आणि हे मूल्य टिकविण्यासाठी शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ती हि विलक्षण स्वरूपाचे समाधान देते.  म्हणून संतांनी देवाकडे  स्वतःसाठी तर काहीही मागितले नाही त्याउलट समाजाच्या सुखासाठी त्यांनी आपला देह झिजवून जीवन संपविलेले आपण लक्षात घेतले आहे. जर प्रत्येकाचे अंत करणं शुद्ध असले तरच हे घडू शकते तेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखविले आहे. आणि ते सर्वत्र समाजाला पटलेले आहे. म्हणूनच आज शेकडो वर्षांनंतरही लाखो भक्त कोणताही भेदभाव मनात न ठेवता पांढुरनगाच्या दर्शनाला संघ करून पायी टाळमृदूंग घेऊनही मोठ्या हर्षाने वारी करतात. संतांच्या काळात काही प्रमाणात हा उचनीचतेचा फार भाव होता त्यामुळे त्यांनी अतिशय कठोर शब्दात निर्भत्सना केलेली त्यांच्या अभांगातून आपल्याला वाचायला मिळते. परमेशवराला सर्व समसमान आहेत तर मनुष्यातला भेदभाव कसा शिल्लक राहील.

आपल्या समाजामध्ये आजही संतांनी शिकवलेला मानवतावादी विचार हा खर्या अर्थाने भक्ती, ज्ञान आणि कर्म  या माध्यमातून समाजाला एकत्रित बांधून ठेवण्यासाठीच आहे. प्रत्येकाने त्याला मिळालेले  आयुष्य हे सार्थकी लावण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि तो करताना तुम्ही कितीही लौकिक शिक्षण घेतलेले असेल तरी देखील आंतरिक समाधानासाठी, शांतीसाठी, परम आनंदासाठी जे या लौकिक शिक्षणातू प्राप्त होत नाही. असा हा आनंद भक्तीतून प्राप्त होत असतो. असा हा चिरंतन स्वरूपाचा वसा संतांनी आपल्याला दिलेला आहे.

प्रामुख्याने महाराष्ट्रातील संतांच्या मांदियाळीचा विचार करताना ज्ञानोबा,  तुकोबाराया,  नामदेव, संत चोखामेळा , नरहरी सोनार,  सावतामाळी,  जनाबाई,  मुक्ताबाई अशी कितीतरी नावे घ्यावी तरी कमीच आहेत.  त्यांनी केवळ  आपल्या ईशवर भक्तीतून आनंदाचे निधान देण्याचे प्रयत्न केले आहेत. परंतु हे सर्व वाटते तितके सोपे व सहज नव्हते यासाठी त्यांना कितीतरी त्रास घ्यावा लागला. आपणही इतक्या गांभीर्याने त्याकडे बघत नाही. परंतु आजची सामाजिक परिस्थिती पाहिल्यानंतर समाजाला जोडून ठेवण्याचे कार्य हे फक्त आणि फक्त भक्ती व अध्यात्म्याच्या अंगाने होऊ शकते. म्हणूनच अनंत उपकार करणारे संत आमुच्या महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानास्पद बाब आहे .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu