Humanity religion and ‘Ramakrishna Mission’




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Humanity religion and ‘Ramakrishna Mission’:  Beginning from an analysis of human rights activity in terms of a relationship between a judgement on human nature and consequent action, the article explores the claim that the teachings of Sri Ramakrishna and Swami Vivekananda provide an authentically Hindu basis for a commitment to human rights activity. Reference is made to the contemporary work of the Ramakrishna Movement and to the justifications it gives for its activities.  Read complete article on Ramakrishna Mission.

Sri-Ramakrishna-Dec-2017

मानवता धर्म आणि ‘रामकृष्ण मिशन’:

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगाल प्रांतात स्थापन झालेली  अध्यात्मिक क्षेत्रातील सेवाभावी संस्था म्हणजे ‘रामकृष्ण मिशन ‘  स्वामी विवेकानंद यांनी या संस्थेची उभारणी केली  रामकृष्ण परमहंस हे आयुष्याच्या अखेरीस  कर्क रोगाने आजारी असताना त्यावेळी त्यांचा नरेंद्र म्हणजेच स्वामी विवेकानंद आणि अजूनकाही शिष्य यांना संवादातून मार्गदर्शन करीत असत. रामकृष्ण मिशन या स्थापनेचे बीज याच संवादातून आहे.  पुढे काही दिवसांतच रामकृष्णांनी त्यांच्या  अंतरंग शिष्यांपैकी  नरेंद्र राखाल  आदीं अकरा जणांना भगवी वस्त्रे  व रुद्राक्षांच्या माळा दिल्या  आणि एक छोटासा विधी करून त्यांना दीक्षा दिली, आणि एके दिवशी भिक्षा मागून आणण्यास सांगितले  रामकृष्णांनी तो दिलेला संन्यास म्हणजे ‘रामकृष्ण मिशनचा’ आरंभ होय. अशी त्यांच्या शिष्यांची धारणा आहे. रामकृष्ण हे अखेरीस निरवानिरव करताना  नरेंद्रास म्हणाले ‘ माझ्या मागे सर्व मुलांची नीट काळजी घे त्यांतील कोणीही संसारच्या पाशात अडकणार नाही तेवढे पहा. ‘ त्यांनी त्यांची पत्नी शारदादेवी यांनाही ‘ तुम्हाला यासाठी पुढे काही कार्य करावे लागेल ‘ असे सांगितले. शारदा मातेने वात्सल्यपूर्ण मार्गदर्शन त्या अंतरंग शिष्याना १९२० प्रयन मिळत राहिले.

रामकृष्णांनी महासमाधी १५ ऑगष्ट १८८६  रोजी घेतल्या नंतर त्यांचे सारे अंतरंग शिष्य कोलकात्याच्या  वराह नगर भागातील एका पडक्या घरात  राहत असत. त्यावेळचा तोच पहिला ‘रामकृष्णमठ’  रामकृष्णांचे काही  गृहस्थाश्रमी शिष्य  त्यासाठी आर्थिक सहाय्य करीत  शिष्यांचा जीवनक्रम अध्यात्मिक साधना, धर्म ग्रँथांचा अभ्यास आणि धूमधून तीर्थ यात्रा असा होता.  त्यांनी विधी पूर्वक संन्यास दीक्षा १८८७ साली ‘विरजा’ होम करून घेतली व नवी नावे धारण केली. नरेंदरची स्वामी विवेकानंद, इतर सर्व स्वामी ब्रम्हानंद, शारदांड, प्रेमानंद,  शिवानंद, अभेदानंद, तुरियानंद, रामकृष्णानंद, त्रिगुणातीतानंद , योगानंद, नीरजानंद,  अद्वैतानंद आणि अद्दभूतानंद या प्रमाणे झाली या सर्वांच्या शकार्यातूनच ‘ रामकृष्ण मिशन’ पंथ व संघटना आकारास आली.

मात्र ते प्रत्यक्षात उतरण्यापूर्वी  विवेकानंदांनी भारत भ्रमण केले होते,  शिकागो येथील सर्व धर्म परिषद मध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करून  अपूर्व यश प्राप्त केलेले होते.  त्यांनी लंडन – अमेरिका  येथे साडे तीन वर्षे संचार  करून ‘वेदांत सोसायटीची’ स्थापना केली.   विवेकांनदांनी त्यांचे गुरुबंधू व रामकृष्णांचा प्रमुख अनुयायी यांची खास सभा १ मी १८९७ या दीवशी कोलकात्याला बाग बाझार भागात बलराम बसू  यांच्या घरी घेतली, व ‘रामकृष्ण मिशन ‘ ची रीतसर स्थापना केली. त्यांच्या संस्थेचे परिचित नाव ‘रामकृष्ण मिशन’ असले तरी मूळ नाव रामकृष्ण संघ ‘ यांचे दोन स्वतंत्र भाग ‘ रामकृष्ण मठ’ आणि ‘रामकृष्ण मिशन’  असे सोयी नुसार करण्यात आले.  मठाच्या शंखातून धार्मिक कार्य,  तर मिशन च्या शाखाद्वारे शिक्षण, दवाखाने, आपत्कालीन सहाय्य – सेवाकार्य  याप्रमाणे विभागणी करण्यात आली. ‘रामकृष्ण संघ’ हा रामकृष्णांच्या जीवनात आविष्कृत झालेल्या अध्यात्मिक  सत्यांचा आचार व प्रचार करणे, पाश्चात्य जगात वेदांत धर्माचा संदेश पोचविणे  भारतात आधुनिक विद्देचा प्रसार करण्यासठी  शिक्षण संस्था चालविणे  अशी ध्येय समोर ठेवून  स्थापन्न केले गेले. ‘रामकृष्ण संघ’ १८९९ मध्ये बेलूरला  स्वतःच्या मालकीच्या जागेत साकारला गेला  त्याचे केंद्रीय कार्यालय बेलूर येथे आहे.  संन्याशी व ब्रम्हचारी मिळून हजारोच्या संख्येत कार्यकर्ते तेथे कार्यरत आहेत.  नवागत ब्रम्हचर्यासाठीं  बेलूर मठात शिक्षण केंद्र असून  तेथे दोन वर्षाचा पदवव्युत्तर   पातळीचा अभ्यासक्रम आहे.

स्वामी विवेकांनदांनी संघासाठी बोधचिन्हे बनविली आहेत.  त्या बोध चिन्हात लाटा हे कर्माचे प्रतीक, कमळ हे भक्तीचे प्रतीक, उगवता सूर्य हे ज्ञान चे प्रतीक आणि चत्रा भोती असलेले सापाचे वेटोळे हे  योगाचे व जागृत कुंडलिनी शक्तीचे प्रतीक, हंस हे परमात्म्याचे प्रतीक याप्रमाणे आहेत. हे बोध चिन्ह असे सुचविते कि  कर्म, ज्ञान, भक्ती व योग्य  यांच्या समानव्यि साधनेतून परमात्म्याचे दर्शन घडते.

‘रामकृष्ण मठ’  श्री रामकृष्ण यांच्या  दिव्य जीवनातून प्रेरणा घेऊन  पावित्र्य , आणि वैराग्य  यांनी युक्त असे अध्यात्मिक जीवन व्यतीत करणाऱ्या साधूंचा संघ  अस्तित्वात आणणे आणि  त्या

संन्याशी साधूं पैकी काहींना शिक्षकाच्या  किंवा कार्यकर्त्याच्या भूमिकेने  सिद्ध करून जगाच्या कोणत्याही भागात  सेवकऱ्यास पाठविणे हि ‘ रामकृष्ण मठा’ च्या कार्याची दिशा आहे. तर रामकृष्ण मिशन सर्व साधारण  कार्यकर्त्यांचा सहकार साधुन त्यांच्या करवी जाती, धर्म, पंथ  आणि देश यांचा भेद न मानता  सर्व मानवांना ईशवराची रूपे मानून  त्यांच्या सेवेची कामे करणे हि

‘रामकृष्ण मिशन’ च्या कार्याची दिशा आहे. मठांच्या सर्व शंखामधूनरामकृष्णांची पूजा आरती होते. तर रामकृष्ण, शारदामाता आणि विवेकानंद याचे जन्म  दिवस साजरे होतात. जातीभेद, धर्मभेद,  उच्चं – निच भाव तेथे मानले जात नाही.  स्वामी विवेकानंद १९०२ मध्ये समाधीस्थ झाले.  त्यानंतर मठाचा कार्यभार ब्रम्हानंद, शिवानंद, अखण्डानंद  आदी गुरु बंधूंनी १९३९ पर्यंत सांभाळला.

मठ व मिशन यांच्या भारतात सर्व भागात मिळून जवळ जवळ ९० शाखा आणि फ्रान्स, इंग्लड , अमेरिका, अर्जेंटिना, स्वित्झर्लन्ड ,सिंगापूर, मॉरिशस, फिजी बेटे, श्रीलंका, बांगला देश आणि इतर देशातही तीसच्या वरून शाखा आहेत.  भारतात मिशन तर्फे सर्व सर्वसामान्य  नागरिकांसाठी  सुसज्ज रुग्णालये बंदी गेली आहेत  सुमारे शंभर वस्ती गृहातून  हजारो विद्यार्थी- विध्यार्थिनी ची सोय केली जाते. रोगराई, दुष्काळ, भूकंम्प, महागाई, अशा आपत्कालीन  संकट प्रसंगी कार्यकर्त्यांची गर्दी  मदतीला धावून जाते. ‘रामकृष्ण मिशन’ हे आदर्श सेवाभावी  केंद्र असून तेथे ‘ मानवता’ या धर्माचे पालन केले जाते  आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. आणि एक म्हणजे नीती मूल्यांचे जतन केले जाते.

म्हणून ‘मानवता’ हाच खरा व एकच धर्म याचा स्वीकार व्हावा….

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu