Housewife thoughts: Cooking ‘home’ is world.




Like
Like Love Haha Wow Sad Angry
8

Our Body loves food. The kind of food the food consumes the same way our mind works, the food should be saintly, pure and homely. The sattvik thoughts are made only by a godly diet. this article is based on how should our diet should be and how we take the food for better thoughts.

Maunika-Gowardhan

गृहिणी विचार: स्वयंपाक ‘घर’ हे विश्व्..:

मनुष्य देह  हा अन्नपिंडमय आहे. ज्या प्रकारचे अन्न ग्रहण करता  त्याच प्रकारचे विचार व्यक्तीच्या मनात व्युप्त होतात म्हणून आहार हा सात्विक, शुद्ध व घरचाच असावा. आणि सात्विक विचार हे सात्विक आहारानेच होतात. असया सात्विकतेचे मुख्य स्थान  म्हणजे घराचे ‘स्वयंपाकघर’ होय. घराचा ‘आत्मा’ म्हणजे ‘स्वयंपाकघर’ गृहिणीचे हक्काचे स्थान. कधी कडू, कधी तिखट, कधी गोड. सर्व रसांचा आस्वाद जसे तिखट, आंबट, खारट, तुरट, गोड वेळ पडल्यास कडू या सर्वांचाच स्वाद आपल्या आहारात उत्पन्न करणारे पवित्र स्थान तिथे भोजनाचे स्वाद तयार होतात ते ‘स्वयंपाक घर.

जिथे बसून आपण भोजनाचा आस्वाद घेतोच पण  मनातील दिवसभर साचलेल्या भावनांना  व्यतीत केलेल्या दिनचर्येचे चर्चा करतो त्यातून काही चुका तर काही गुण यांचे स्वतःचेच परीक्षण करता येते. कारण तिथेच विश्वास प्रेम देणारी भावना व्यक्त होते. घराच्या अंगणावरून आपण जसे घराचे चित्र मनात तयार करू शकतो. तसेच घरात असणारे आपले ‘देवघर’ हि घराची व घरातील व्यक्तींची ओळख न कळत देते. आयुष्यात घडणार्या सर्व सुख दुःखाची रुजवात होते तेव्हा याच देवघरा समोर बसून मन पुन्हा नतमस्तक होते.  ‘हे विश्व् ची माझे घर | एसी मनी ज्याची स्थिर || ‘ हि संत ज्ञानेशवराची ओव्या किती अनुभवनीय, आनंददायी आहे. ज्याला सारे जग आपले घर वाटते, जो मी म्हणून उरत नाही सर्व चराचर होऊन जातो तो या ‘घर’ संकल्ल्पनेतूनच ‘मी’ स्वतः पुरता मर्यादित न राहता विश्वा एवढा विशाल होण्याचा विचार देते ते ‘घर’ जशी मिठाने भरलेली पोटी सागरात परत पडली तर ती पूर्ववत होऊन जाईल तसेच ‘घर’ स्वतः पुरते न राहता आले तर?  जे केवळ व्यक्ती व्यक्तींवर अवलंमबुन राहते. आपल्या प्रवासाच्या प्राप्त प्रतिकूल परिस्थितीत आपले सामर्थ्य टिकून राहते कौटुंबिक प्रेम मिळणे आपल्या अंगच्या

चांगल्या गुणांचे कौतुक होते ते या घरामुळेच कारण याच घरात माया म्हणजे प्रेम, माया म्हणजे आपुलकी, माया म्हणजे संपत्ती,  ममता,  जिव्हाळा,  आपुलकी असते.  आणि त्यामुळेच घराचे घरपण सांभाळता येते. घरातील वातावरण आनंदी होते. परस्परांचे परस्परांशी वागणे बोलणे. संवाद असावा, पैसा स्वकष्टार्जित असावा. दान, धर्म असावे, हे सर्व घरातच रुजत असते. संयम, त्याग, सदाचार, समाधान हे खरे कृतार्थ जीवन घडते हे घरामुळेच ‘घर’ म्हणजे खर्या अर्थाने भौतिक, शारीरिक,  मानसिक गरजा पुरविणारे हक्काचे ठिकाण. ‘घर’ हे सुखद ओलावा, मायेची उब, थकल्याचा विसावा, मायेची फुंकर घालून मनाची रुजवात करून दिलासा देणारे एक सोनेरी पिंपळपाचं जणू जटिल धागे दोर्यान्नी विणलेली नाती हि सपाट नितळ जगण्याला एक्स्न्घता आणते.  ते ‘घर’ नुसते घर नसून खरे ‘तीर्थस्थान’ होय.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
8




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu