First aid is the provision of immediate care to a victim with an injury or illness, usually effected by a lay person, and performed within a limited skill range. First aid is normally performed until the injury or illness is satisfactorily dealt with (such as in the case of small cuts, minor bruises, and blisters) or until the next level of care, such as a paramedic or doctor, arrives. First aid may help the person to survive till the doctor comes and saves his/her life
आरोग्यावरील घरगुती आणि प्रथमोपचार:
कित्येकदा साधारण आजारांसाठी आपण डॉ. कडे जाऊ म्हणता म्हणता वेळ काढणे होत नाही अश्यावेळी काही घरघुती उपचार सुरु ठेवावेत.
ज्यांना वारंवार अपचन किंवा बद्धकोष्ठता यांचा त्रास होतो, त्यानीं सकाळी उठून उकळलेल्या बीटाचे एक कपभर तुकडे काहीही खाण्या अगोदर (नास्त्याच्याही अगोदर) खावेत.
ऍसिडिटीचा त्रास होत असल्यास त्यांनी जेवणानंतर तुळशीची पाने धुवून ती सावकाश चावून खावीत तुळस हे एक प्रभावी अँटीसीड असून याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होऊन त्याशिवाय ‘ ऍसिड रिफँल्स ‘ म्हणजे अन्न घशाशी येणे किंवा अल्सर्स होत नाही.
सकाळी उठून रिकाम्यापोटी सफर्चंडाचे सेवन केल्याने मायग्रेनमुळे उदभवणारी डोकेदुखी कमी होते. ज्यांनयाचा जास्त त्रास असेल त्यांनी नियम काही दिवस तरी हा उपाय करावा. अराम मिळेल.
सहा खजूर अर्धा लिटर दुधामध्ये १५ ते २० मिनिटे अगदी बारीक आचेवर उकळून नंतर ते प्यावे. हा उपाय ज्यांना कोरडा खोकला वारंवार येत असेल त्यांच्यासाठी हा उपाय आतुन फायदेशीर आहे.
थंड दूध केळे आणि मध एकतरी करून थोडे मिक्सर मध्ये फिरवून त्याच मिल्कशेक तयार करावा. याच्या सेवनाने पोटातील अस्तराला अराम मिळतो. त्यातील मधामुळे शरीरातील कमी झालेली शुगर लेव्हल पुन्हा वाढविण्यास मदत होते. मद्यपान केल्याने काही कलांनंतर उदभविलेला ‘हँगओव्हर’ घालविण्यासाठी हा उपाय फार फायदेशीर ठरतो.