Money doesn’t make you happy, says everyone, reassuringly, about not having enough money. Money does make you happy after all, says a new paper published by the UK government. “An individual’s level of personal well-being is strongly related to the level of wealth of the household in which they live,” says the report, which was designed to measure the relationship between wealth and happiness in the U.K. population
For more information read following article.
पैशाबाबत आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा, पैसा खर्च किती झाला हेच पहात बसण्या पेक्षा त्या मोबदल्यात आपल्याला परतून काय प्राप्त झाले हे बघणे महत्वाचे. दृष्टिकोन योग्य असेल तर त्याच्या दुपट्टीने परत मिळते हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून आपले नकारात्मक विचार प्रथम थांबवायला हवे. आपण नेहमी अर्ध सत्य बघतो, आपली पूर्ण सत्याची लपवालपवी चालू असते. बाहेर गेल्याने ५०० रुपयाचे पट्रोल लागले हे तर लक्षात राहते व एकवेळ आवश्यक खर्च काय झाला हे सुद्धा लक्षात राहते परंतु अनावश्यक असा वायफळ खर्च केला हे विसरून जात असतो तीच हि लपवालपवी होय. म्हणून खर्चा वर नियंत्रण असणे गरजेचे आहे. तेव्हाच पैसा खर्च होऊन आपले महत्वाचे कार्य किती झाले हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. पूर्ण सत्य स्वतःच्या मनाला सांगा, गाडीतुन गेल्यास वेळ वाचला, उन्हाचा त्रास वाचला, कष्ट वाचले, वेळेत पोचल्याने कार्य पूर्ण झाले, आनंद प्राप्त झाला हे सर्व सत्य आपल्या अंतर मनाला पोचवावे. त्याच प्रमाणे आपल्यात तशीच प्रचिती येते. हे विचार म्हणजे पैशांशी निगडित भावना कारण समस्यां हि फक्त पैशांशी जुळलेली नसून ती आपल्या भावनांशी व विचारांशी जुळलेली असते. फक्त पैसा गेला हीच भावना असणे म्हणजे क्षय, हानी हि मनाची विकृती होय. आपल्या जवळ पैसा असूनही त्याची कमतरता वाटते. हे योग्य नव्हे. म्हणूनच पैसा गेल्याने त्यासंबंधी बोलताना अर्ध सत्य बोलू नये त्यातून काय मिळाले हे विचार अवश्य करा. असं केल्याने जीवनात भरपूर पैसा तुमच्या जवळ येत राहील. चुकून कुणाला पैसा दिला असेल तरी त्याचे दुःख उगाळत बसू नका, तो केव्हा तरी कधी तरी दुपट्टीने परत येणारच हेच अंतर्मनाला सांगा म्हणजे तो प्राप्त होतोच आपल्या लक्षात येत नसेल तरी हेच सत्य होय.
तुम्ही ज्या गोष्टींकडे लक्ष पूर्वाल ती वृद्धिगत होईल, सावरेल आणि मजबूत होईल. हा नियम आपले आर्थिक आरोग्य मिळविण्याचे एक रहस्य होय.