नियमांवर विश्वास ठेवू अथवा नका ठेवू. ते आपलं काम अखन्डपणे करतच राहणार. निसर्गाच्या नियमांची हि म्हत्वपूर्ण गोष्ट आहे. उदा आपण आगीत हात घातला तर तो भाजणारच. आपल्याला ते माहित असो व नसो.त्याने काहीच फरक पडत नाही. कारण हा एक अलिखित नियम होय. कारण हे आपल्या विश्वासावर चालणार नाही. दोन्ही परिस्थितीत हात भाजणारच हे निर्विवाद सत्य आहे. हे स्वयंपुर्ण आहे. त्यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. निसर्गाचा प्रत्येक नियम तोपर्यंत आपला मालक आहे. जोपर्यंत आपण त्याला जाणत नाही. हि बाब भौतिक नियमांना लागू होते, परंतु मानसिक नियमांना लागू पडेल असे नाही.
विचार नियम नुसार प्रत्येक विचारांची निर्मिती प्रथम विचारांत होते. आणि मग भौतिक रूपात. हे व्यक्तव्य अत्यन्त म्हत्वपूर्ण आहे. आपण जे काही पहात आलो त्याची निर्मिती प्रथम विचारांत व नंतर ते वास्तवात साकार होते.
विश्वात कोणतीही वस्तू भौतिक रूपात निर्माण होण्याआधी प्रथम तिची निर्मिती वैचारिक थरावर होत असते.
जगात दोन प्रकारची लोक असतात, एक प्रकार म्हणजे ते स्वतःच्या जीवनाचे मालक असतात. दुसरे म्हणजे जीवन त्यांचे मालक असते. आपण आजूबाजूला बघतो, लोकांचे बोलणे ऐकतो, डोळे कां उघडे ठेवले कि सर्व काही दृष्टीस पडते. तेव्हा काही आनंदी व यशस्वी दिसतात. काही विकसित तर काही अविकसित. विकसित लोकांच्या बाबतीत म्हणजे त्यांनाकाही विशेष नियम किंवा शक्ती विषयी ज्ञान असत. त्याउलट अविकसित लोकांत असे आढळून येईल कि ते प्रत्येक क्षण दिवसाचे चोवीस तास अगदी त्यांच्यासाठी शिक्षाच असल्या सारखे कार्य करतात.