Tree-planting is the process of transplanting tree seedlings, generally for forestry, land reclamation, or landscaping purpose. It differs from the transplantation of larger trees in arboriculture, and from the lower cost but slower and less reliable distribution of tree seeds. Trees absorb odors and pollutant gases (nitrogen oxides, ammonia, sulfur dioxide and ozone) and filter particulates out of the air by trapping them on their leaves and bark.
For more information kindly read following information.
मुद्दे -: त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषाप्रमाणेच असतात. – निसर्ग हा साहित्याचा अविभाज्य भाग.- मानवाने केलेली बेसुमार जँगलतोड. – वने हि राष्ट्रीय संपत्ती.- वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण,- शिक्षण संस्थेद्वारे वृक्ष संवर्धनाचे उपक्रम होणे आवश्यक आहे. – वृक्ष संवर्धन हेच आजचे मोक्षसाधन होय.
‘ छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे, फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषां इव,| जे त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहतात, इतरांना सावली देतात. ज्यांची फळे -फुले हि दुसऱ्यासाठीच असतात. असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषाप्रमाणे अटळ असतात.
या वृक्षरूपी सत्पुरुषांचे सानिध्य अबालवृद्धांना, सामान्य जणांना व त्याच बरोबर अलौकिक विभूतींनाही लाभावे असे वाटते. म्हणूनच ऋषीमुनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सानिध्यात
अध्ययन, अध्यापन आणि तपश्चर्या करीत असतात. निसर्गातील गूढ उकलण्याचा प्रयत्न करितात.
साहित्यिकांच्या जीवनात आणि साहित्यात निसर्ग एक अविभाज्य भाग आहे. तो सावली सारखा त्यांच्या सोबत वावरत असतो. संत काव्यात पानापानांवर वृक्षवेलींच्या उपमा,संज्ञा व दृष्टांत दिसतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात -‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी ”
इंदिरा संत म्हणतात – ” जरी वेढिलें चार भिंतींनी,या वृक्षांची मजला संगत ” सामान्य मनुष्य नेहमीच्या संसारिक त्रासापासून, विचारांपासून दूर हवापालट म्हणून थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यातच जातो.
अश्या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होत चालला आहे. एकूण भूभागापैकी एकूण एक तृतीयांश जमीन वृक्षराजींनी व्यपलेली असलीच पाहिजे, तरच निसर्गाचा समतोल राखला जातो. आपल्या भारतात हे अत्यंत कमी म्हणजे एक पंचमांश पेक्षाही कमी आहे. पूर्वी हिमालयातील उतरंड, मध्य प्रदेश, आसाम, ओडिसा आणि बंगालच्या गंगेंच्या मुखाजवळील येथेच घनदाट असे जन्गल होते.
परंतु आता तेथेही मानवाने कमी अधिक जँगलतोड करून वस्त्या तयार केलेल्या आहेत. तसेच जिकडे तिकडे बेसुमार जन्गल तोड होत आहे. मानवाने वैराण असे वाळवंट तयार केलेली आहेत. म्हणतात कि ‘ मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहूल ‘ अशी म्हणच आहे. जोपर्यंत मानवी वस्ती कमी होती, तोपर्यंतच वृक्षवल्लीचे प्रमाण जास्त होते. पूर्वी जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी जमीन शेती खाली आणली जाऊ लागली. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी वृक्षांची बेसुमार तोड झाली. त्यामुळे उष्णता वाढली पावसाचे प्रमाण कमी होत गेले. जमिनीची धुप होऊन जमीन नापीक होत गेली. पावसा अभावी त्यामुळे दुष्काळाचे प्रमाण वाढले. त्यामुळे खेडोपाडी, गावाकडील शेतकऱ्याचे शेतीवरील लक्ष लागेनासे झाले, त्यामुळे तो आळशी होत गेला. असेच हळू हळू त्याचे शेती वरील राबाई , मेहनत करण्याची प्रवृत्ती कमी होत गेली. आणि आता प्रत्येकाची धाव चमचमत्या शहराकडे लागलेली आहे. प्रत्येक जण शहराकडे धाव घेत असल्याने शरीरातील लोकसंख्या वाढीस लागली. आता लोकवस्त्यांसाठी शेतजमिनीचा वापर प्लॉट पाडण्यात होऊ लागला, त्यामध्ये मुबलक पैसा शेतकऱ्यास मिळत गेला. मेहनतीशिवाय पैसा भरपूर मिळतो तर कोण राबणारं असेच त्याचे विचार बदलत गेले. प्रत्येक शेतकऱ्यास शेत जमीन विकनेच योग्य वाटले. त्या कारणाने लोकवस्त्या वाढतच गेल्या आज अशी परिस्थिती आहे. जागा कमी असंल्याने कमी जागेत उंच इमारती बनत गेल्या. शहर विस्तार वाढतच गेलेला आणि खेडेगाव व शेत जमिनीचा विस्तार अतिशय कमी होत चाललेला आपण बघत आहोत. अश्या या सिमेंटीकरन शहरांत वृक्षांना कोठे जागा मिळणार.
आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना महत्व दिले होते. तुळशी,वड,पिंपळ,औदुंबर यांची पूजा केली जात असे. तसेच बेल,दुर्वा,धोत्रा यांना आणि अन्य अशा वनस्पतींना देवाच्या पूजेत स्थान दिले होते. त्यामुळे वृक्षांची आपोआपच जपणूक होत असे आणि त्यांच्या बद्दल कृतज्ञताहि व्यक्त होत असे. परंतु हळूहळू हि श्रद्धा लोप पावत आहे.
वने हि राष्ट्रीय संपत्ती आहे. ते खनिज संपत्ती सारखे ओहोटीस लागणारे धन नाही.ज्या प्रमाणे ज्ञानेश्ववरांनी म्हटलेले आहे -” मोगरा फ़ुलला, मोगरा फुलला| फुले वेचिता बहरू कळियांसी आला|” त्याच मोगर्या प्रमाणे पुनर्निर्माणाची शक्ती असलेल्या संपत्तीचा हा ओघ आहे. म्हणूनच सरकारने वन महोत्सव हा राष्ट्रीय सण मानलेला आहे. कित्येक जमिनी गवत व जळाऊ लाकडांच्या लागवडींखाली आणण्यात येत असते. तसेच सामाजिक मोहिमेखाली वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्षसंरक्षण यांसाठी कसोसिने प्रयत्न होत असते.
सांगावेसे वाटते सामान्य जनतेलाही यासाठी सहजपणे पण खूपकाही करण्यासारखे आहे. त्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची आवश्यकता नसते. पण इच्छाशक्ती ची गरज आहे. आपणच वृक्षतोड हि थांबविली पाहिजे, पुष्कळ असे सामाजिक कार्यक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम राबवताना किंवा साजरे करताना
‘ एक मुलं आणि एक झाड ‘असे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाची प्रथा पाडावी. कुठलेली झाड तोडण्यापूर्वी दुसरे झाड लावण्याची सक्ती असावी. महापालिकांनी झाडे तोडण्याविरुद्ध सक्त कायदा ठेवावा. जनतेला घर घरासमोर झाडे लावण्यास रोपेंहि द्यावीत मधून मधून झाडांचे निरीक्षण करून जनतेला त्यांच्या घर समोरील झाडांचे संगोपन करण्या बाबत उत्साहित
करावेत. त्यांना नगरसेवकांतर्फे झाडांच्या संरक्षणार्थ जाळीचे कटघरे द्यावीत. मोठमोठ्या पटांगणावर, मंदिरांसमोर रिकाम्या जागी झाडे लावण्यात जनतेला प्रोत्साहित करावे,त्याबाबत त्यांना मोफत मदत करावी.
कालमापनाप्रमाणे व्रतवैकल्यांचे तसेच धार्मिक कार्यक्रमाचे स्वरूप बदलत असते. किंवा पुरातन असले तरी. वड, पिंपळ, कडूंनीब, अशा रोपांचे वाटप करून सामाजिक कार्यक्रम ज्या ठिकाणी, पटांगणावर साजरे करण्यात येतात तेथे एखादे सुट्टीचे दिवशी थोडा खर्च करून नेत्यांनी कार्यकर्त्याकडून वृक्षरोपणाचा कार्यक्रम आखावा,व जनतेलाही उत्साहित करावे. कारण वृक्षसंवर्धन हेच आजचे मोक्षसाधन आहे. अनेक सामाजिक संस्था द्रुकश्राव्य माध्यमांद्वारे वृक्षसंवर्धनाच्या प्रसाराचे कार्य करत आहेतच, आणि अजूनही मार्ग अनेक आहेत फक्त इच्छा असली पाहिजे हे महत्वाचे आणि सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपलू भारतमाता ‘फुल्ल कुसुमाता दुमडलं शोभिनी’ या वर्णनानुरुप शोभू लागेल.