कधी ये रे ये रे पावसा तर कधी जा रे जा रे पावसा असे कां वाटते ?
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Rainy season starts in India in the month of July when winds of South West Monsoon starts blowing. According to the Hindi month it falls in Asadha and Shawan. Everyone enjoy it a lot as environment becomes so clear, cool and clean because of the fresh air and rainy water. Plants, trees and grasses become so green and look very attractive. New leaves are arising to the plans and trees as they get natural water after a long time of hottest summer. The whole environment gives a greenery look all around which is very nice for the eyes.For more inforamation kindly read following article.

rainy

मुद्दा : पावसामुळे सर्व सृष्टी आनंदाने न्हाऊन निघते. – सामान्य किंवा कमी- अधिक गरीब मानवास  पावसाचा त्रास होतो.- विस्कळीत संसार, झोपड्यांमुळे राहण्याची गैरसोय, त्रेधातिरपीट, दुर्गन्धी, रोग, माणसांचे बळी, इ. कटू अनुभव.- तसेच शहरातील जनजीवन विस्कळीत.- अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ असा हा छळवादी पाऊस कधी कधी  नकोस होतो. पावसाचे महत्व अनोखे आहे. ग्रीष्म ऋतूच्या दाहकतेने होरपळून जाणारी सर्व सजीव सृष्टी डोळ्यात प्राण आणून पावसाची वाट पहात असतेच.  पहिल्या पर्जन्यधारांतील  संजीवनी लुटण्यासाठी प्रत्येक प्राणिमात्र आतुर असतो. तेव्हा सर्व सजीव त्याला मनोमन आमंत्रण देत असतात.आणि पर्जन्यवृष्टी सुरु होताच अगदी आनंदाने मनात सुखावतात. आणि म्हणतात – ‘सजल, शाम घन गर्जत आले, बरसत आज तुषार ! आता जीवनमय संसार | आकाशात मेघ गोळाझाले कि  पिसारे फुलवून मोर नाच करू लागतात. शेतकऱ्यांचे डोळे निवतात.

सनावरांचे दिवस सुरु होतात. साहित्यिक, चित्रकार इ. कलावंत पावसाळ्यातील सौन्दर्य  टिपण्यासाठी आपली लेखणी आणि कुंचले सरसावून बसतात. पहिल्या पावसाने येणाऱ्या मृदंगन्धाने  अवघ्या सजीव प्राणीमात्रांचे मन भरून जाते. हिरव्यागार धर्तीच्या आनंदाने उधाण झऱ्याच्या,व धबधब्यांच्या रूपातून प्रगट होते. असे आनंदाचे वातावरण असताना कधी कधी असे काही अचानक विधवंशक घडते कि वाटते – ”  नको हा पावसाळा ” ! एरव्ही सौन्दर्याची बरसात करणारा हा पाऊस अगदि क्रूरपणे कधी चक्री वादळे, तर अतिववृष्टी ने सर्व काही नासधूस करून सोडतो,  कितीतरी प्रकारे मानवास त्रासदायी ठरतो. मानसिक,शारीरिक,आर्थिक त्रास तर होतोच परंतु जीवहानी करून निष्ठुरपणे सर्व उध्वस्त करून सोडतो. तेव्हा मनुष्य आनंदाच्या धुंदीतून खाड्कन जागा होतो तेव्हा अगदी जीवाचा त्रागा होतो व वाटते कि ‘नको हा जीवघेणा पाऊस’ ! पावसाळ्यातील इंद्रधनुष्य आपले मन मोहून टाकतात. खवळलेला सागर, रात्रीच्यावेळी आकाशात कडाडणाऱ्या विजा, ढगांचा कडकडाटहे निसर्गाचे रौद्र रूप असले तरी मनाला मोहित करतात. कधी कधी विजांमुळे झाडे पडतात, गुरे ढोरे ,मनुष्यही या विजेला बळी पडतात. एखाद्या वेळी खुप पाऊस पडतो.तेव्हा रस्ते,रेल्वेमार्ग,रेल्वे वाहतूक,बसमार्ग बंद पडतात, दाट आवरणामुळे विमानाची उड्डाणे स्थगित होतात. तसेच जलवाहतूकही स्थगित होते. अनेकानेक अपघात होतात. त्यामुळे बस,रेल्वे गाड्या वेळेवर पोचू शकत नाही जण जीवन विस्कळीत होऊन बसते. घरची मंडळी घरी वेळेवर न आल्याने घरचे सर्व काळजीत पडतात. शाळा,महाविद्यालये बंद ठेवावी लागतात त्यामुळे  विद्यार्थ्याचे अभ्यासाचे नुकसान होत असते. घराघरांत विजेचा लपाछपीचा खेळ चालू होतो त्यामुळे घरांतील गृहिणींच्या कामावर तसेच सर्व अधिक कामावर परिणाम होऊन, सर्वच विचित्र होऊन बसते, वीज नसल्याने गर्मीचा उकाडा जीवाला कासावीस करून सोडतो.

पावसाळा भर असेच चालले तर कामाच्या वेळी अंधारात वावरणे,तसेच काम करणे कठीण होऊन बसते.पाखरे,किडे घरात त्रास देतात. खान-पान बरोबर होत नाही, झोप बरोबर होत नाही. आजूबाजूला पाण्याचे खडगे असल्यास बेडकांचा आवाज, आजूबाजूला गुरे- ढोरे असल्यास त्याच्या शेण-मातीचा वेगळाच त्रास , येताजाता रस्त्यावरीन घाणीचा त्रास यासर्व कटू अनुभवांची आठवण होताच वाटते ”नको हा पावसाळा ”! पावसाळ्यात सूर्यदर्शन दुर्मिळ होते, त्यामुळे घाणीचे साम्राज्य आरोग्यावर प्रभाव करतात. किडे, डास यांचा सुळसुळाट होतो. बाहेरील उकिरडे, गटारे भरण्याचे संभव असतात. त्यामुळे होणारी दुर्गन्धी, हैराण करून सोडते. कपडे बरोबर कोरडे होत नसल्याने त्यांना कुबट असा वास येतो. कोरडे कपडे घालण्यास मिळत नाही. अशा परिस्थितीत या पावसाचे स्वागत कसे करणार ? घरात पिण्याचे पाणी गढूळ येत असते ते हि दुर्गन्धी युक्त असते. त्या दूषित पाण्याने अपचन,कावीळ,कॉलरा, अतिसार या सारखे रोग होण्याची संभावना असते. तसेच डासांपासून डेंग्यू,मलेरिया, स्वाइन फ्ल्यू यासारखे रोग मनुष्यास होतात. त्यामुळे कित्येक बळी जातात. यासर्व बाबींवर कित्येक सुखसोयी निघाल्या असल्या तरी प्रत्येकांच्या किंवा सामान्यांना परवडणाऱ्या  असतातच असे नाही. त्यामुळे मनुष्यास नुकसान व त्रासच होतो. जीवन देणारा,नवचैतन्य फुलविणारा हा पाऊस बऱ्याचदा पुराचे संकट आल्यावर जीवघेनाच ठरतो शेतातील उभी पिके भुईसपाट होतात. नद्याकाठची घरे जलसमाधी घेतात. एरव्ही नद्यांचे स्वरूप शांतता, शीतलता, आनंद  देतात.  आपण मातेचे स्थान देऊन त्यांचे पूजन करतो. तीच नदी अतिवृष्टीत रौद्र रूप धारण करते, कधी जीवित हानी पोचवते तेव्हा असे म्हणण्याची पाळी आणते,- ”माता न तू वैरिणी” या प्रमाणे जीवनात आलेला हा ओला  दुष्काळ महा भयानक वाटतो. त्याचे दर्शन होताच आपण उद्वेगाने हेच उच्चार काढतो ‘ जा रे जा रे पावसा, तुझे दर्शनही नको ! ‘

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: