Women are an integral part of today’s society. They have an active social life. They participate in various social and cultural functions. A woman today no longer lags behind the man in the most occupations. She plays the games of football, cricket, and hockey. She draws the attention of the world as an athlete. The women can no more be kept behind the curtains doing only domestic duties. Our society is accepting the wider participation of women. They are working as pilots; and they are even holding the helm of a country’s administration.
For more information kindly read bellow articles.
निबंध म्हटले कि बंधन नसलेले लेखन पण तरी सुद्धा एखाद्या विषयावर लिहायचे झाले तर मुद्देसूद तर्कशुद्ध आणि शैलीदार लिहिणे असलेच पाहिजे. पद्धतशीर सराव देखील लागतो. विषयाचे काटेकोर पालन करूनच लिहावे. त्या विषयाचा विस्तार अगदी मोचक्या ओळीत मांडायचा असतो व वेळेचीही दक्षता घेता आली पाहिजे. मोचक्या ओळीतील शैलीदार असला तरच वाचताना सुखद वाटतो.
मुद्दा – पुरातन काळातील विद्या, कला निपुण स्त्रिया. आधुनिक काळात समानतेची जाणीवर स्त्रीमुक्ती संघटनांचे कार्य. – सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील स्त्रियांचे कर्तृत्व. – अष्टपैलू -घरची व बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी – आजचे स्त्री जीवन खऱ्या अर्थाने सुखी समृद्ध व निर्भय होण्याची गरज . ‘ न स्त्री स्वातंत्र्यम अहंर्ती ‘ असे पुराणात सांगितले जाते. पण पुरातनकाली सनातन, कर्मठ संस्कसृती मुळे स्त्रीचे स्वातंत्र्य लयाला गेले. तेव्हा तिचे पररावलंबित्व सुरु झाले होते. त्याही पुरातन काळात डोकावले तर तेव्हाची स्त्री हि वेदशास्त्र संपंन्न आढळते. तिला शस्त्र शास्त्राचे शिक्षण दिले जात असे, गार्गी, मैत्रेयी यांसारख्या वेदशास्त्र निपुण आणि ककैयी सारख्या युद्धशास्त्र कुशल असणाऱ्या स्त्रीया सर्व प्रकारच्या विद्द्याकलांत निपुण होत्या. आजही भारतात मुलींना मोफत शिक्षण , नोकरीत राखीव जागा ठेवलेल्या आहेत. वडिलांच्या संपत्तीचा वारसा हक्क बरोबरीचा दिला आहे. समान वेतनाचा व समान नागरिकत्वाचा दर्जा दिला आहे. व सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यात आली आहे. ज्या कुटुंबात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव विकसित झाली आहे.अशा घरातील मुलींलाही स्वतःचे छंद, आरोग्य , ध्येय इत्यादी जोपासण्यासाठी प्रोसाहन दिले जाते. व तीच सर्वांगीण विकासही केला जातो.
स्त्रीच्या स्वतःच्या कार्य शक्तीला, बुद्धीला आणि कर्तुत्वाला संपूर्ण वाव मिळाला आहे. आणि समाजात तिला समान दर्जा मिळावा म्हणून स्त्री मुक्ती चळवळी तसेच स्त्री मुक्ती संघटना तयार झाल्या व विशेषतः स्त्रियांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे. तसेच त्यांना त्यांच्या हिताच्या कायद्याचे ज्ञान व मदत हि केली जात आहे. घटस्फोटित,परितक्त्या,विधवा आणि निराधार स्त्रीला मानाचे जीवन जगता येण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. हि मदत सर्वधर्मी स्त्रियांसाठीच आहे. आजची स्त्री हि डॉ, इंजिनियर, वकील, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, राजनीतिक अधिकारी यांसारख्या मोठमोठ्या महत्वाच्या पदांवर अगदी जबाबदारीने काम करीत आहे तरीही घरात ती तितकीच कर्तव्य दक्ष आहेच. तेव्हा यावरून समाज तिचे मोठेपण व कर्तृत्व आजही ठरवतो आहे.
विवाह पूर्वी जोपासलेल्या कला, छन्द,या कडे विवाह नंतर बऱ्याच वेळा दुर्लक्ष केले जाते, संसारातील जबाबदाऱ्यांमुळे, किंवा वेळे अभावी विवाहापूर्वीची अष्टपैलू स्त्री विवाहा नंतर केवळ चोवीस तासाची बांधील अशी चाकरमानी ठरत असायची. संपूर्ण कुटुंबातील जबाबदारी मुळे एकटीवर पडणारे ओझे आणि सामाजिक दृष्टिकोन यांमुळे जबाबदारीची व मोठ्या अधिकाराची पदे बहुसंख्य स्त्रियांना त्यानं मध्ये पात्रता असून सुद्धा नाकारावी लागायची वेळ येत असे. म्हणून विवाहा नंतर तिला स्वतः:चे व्यक्तिमत्व विकसित करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आज काही ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांच्या नैसर्गिक शक्तींना व गुणांना वाव मिळत आहे.आणि अशा स्त्रियांची संख्या वाढतच आहे.
आधुनिक समाजरचणेमध्ये स्त्रीला घराबाहेर पडून पुरुष्याच्या बरोबरीने अर्थार्जन करणे हे अपरिहार्य झालेले आहे. घरची व बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी तिला सांभाळावी लागत आहे त्यामुळे तिची तारे वरची कसरत होत असते. याचा विचार शासकीय पातळीवर होऊन स्त्रियांना बालसंगोपनासाठी आवश्यक असणाऱ्या प्रसूतीरजा,व अन्य सवलतींचे कायदेही झाले आहेत, कामाच्या ठिकाणी पाळणाघरे, जेवणाच्या सोयी, भोजन गृहे वै योजना राबवतात त्यामुळे त्यांना सुविधा मिळते.
आजकाल गृहोपयोगी अत्याधुनिक साधने जागोजागी नवनवे मॉल झाल्याने त्यांना वेळोवेळी फ्रेश असे साहित्य, नित्योपयोगी वस्तू , गर्जे नुसार त्वरित मिळतात त्यामुळे तिचे घर गृहस्तीचे कार्य अगदी सोपे झाले आहेत. तरीपण त्यामुळे तिला घरात आता जास्त कामाचा ताण होत नाही. हे म्हणणे चुकीचे ठरते त्या व्यतिरिक्त तिला घरात मुलांकडे लक्ष देणे त्यांचा अभ्यास सांभाळणे यात तिला लक्ष घालायला वेळ मिळतो. त्यात तिची ओढाताण होतेच. घरातील सर्वांनीच तिला समजून घेतल्यास तिला थोडा घरकामाचा आधार दिल्यास तिचा नोकरी पेशातील मजबुतीचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. या दृष्टीने तिच्या व्यवसायात,व नोकरीत आवश्यक ते प्रोत्साहन तिला द्ययला हवे. काही महत्वाच्या बाबतीत तिला स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्यास मोकळीक दिल्यास खऱ्या अर्थाने समाजात स्त्री व पुरुष समानता म्हणता येईल. व ती सुखी व समृद्ध होईल.