The term “national character” is used to describe the enduring personality characteristics and unique life styles found among the populations of particular national states. This behavior is sometimes considered on an abstract level, that is, as cultural behavior without actual reference to necessarily different personality modalities. It may also be considered as motivated by underlying psychological mechanisms characteristic of a given people.
For more information kindly read following article.
अत्यावश्यक मुद्दे — राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे राष्ट्रा तील जनतेचे चारित्र्य. – तथापि राष्ट्रातील बहुसंख्य जनता स्वार्थी व नीतिमूल्यहीन. – शैक्षणिक,व्यावसायिक, सामाजिक,व शासकीय इत्यादी क्षेत्रांत राष्ट्रीय चारित्र्याचे हनन .- राष्ट्रीय चारित्र्य शुद्ध करण्याची जबाबदारी सरकार व जनता या दोघांचीही आहे. – उत्तम चारित्र्याचा आदर्श लहान,मोठी समोर ठेवलाच पाहिजे . ‘ देश म्हणजे देशातील माणसे, देशाची प्रगती हि त्या देशाच्या माणसांवरून ठरते. ‘ बहुसंख्य माणसे ज्या अवस्थेत असतील त्या अवस्थेवरून देशाची अवस्था ठरते. तदवत राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे त्या राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य वृक्षावरील एका फळा वरून साऱ्या वृक्षाची किंमत ठरते. तसेच राष्ट्राच्या एखाद्या व्यक्तीचा योग्यते वरून साऱ्या राष्ट्राची योग्यता ठरवली जाते. म्हणून राष्ट्रीय उत्तम राखण्याची जबाबदारी हि प्रत्येकाचीच आहे. स्वतःची जात, धर्म, प्रांत,भाषा इत्यादी सर्व भेद बाजूला सारून राष्ट्राचे हिट ते माझे हित, राष्ट्राचा मान तो माझा मान अशी निष्ठा बाळगून जर प्रत्यकाने वर्तन केले तर उच्च्तम राष्ट्रीय चारित्र्य भारतात जन्माला येईल.
आज खेदाने असे म्हणावेसे वाटते कि आज राष्ट्रीय चारित्र्य खालावलेले आहा. राष्ट्रातील बहुसंख्य जनता स्वार्थी ,आत्मकेंद्री झाली आहे. स्वतःच्या विचारापुढे तिला राष्ट्राचा विचार, तुच्छच वाटतो. असंखयांना नीतिमूल्याची चाड नाही. संम्पत्तीच्या लोभामुळे तस्कर,धर्मांध, नफेखोर, काळाबाजार करणारे तसेच देशातील पैसा विदेशात नेवून साठवण करणारे, भ्रष्टाचारी आमच्या राष्ट्र मंदिराला उंदीरघुसीप्रमाणे पोखरत आहे. हि राष्ट्रविघातक शक्ती अन्य राष्ट्रासाठी हेरगिरी करून राष्ट्र कमकुवत करण्याच्या मागे लागलेले आहे. आपापसात भांडून एकमेकांचे लचके तोडत आहे. याचा फायदा इतर राष्ट्रांना उचलायला ठीकच असते. शैक्षणिक, व्यापारिक,व्यावसायिक ,सामाजिकांनी शासकीय. अशा सर्वच पातळींवरून राष्ट्रीय चारित्र्यायाचे हनन होत असते. आज आपण आपल्या विहित कर्तव्याची टाळाटाळ करितो. काही ठिकाणी विद्यार्थ्यां पासून शैक्षणिक संस्थांना त्रास तर काही ठिकाणी शैक्षणिक संस्थानकडुन विद्यार्थ्यांना त्रास बहुतांश ह्याच घटना अमलात येत आहे. त्यामुळे मोर्चे, निदर्शने, घेराव,बंद इत्यादी घडवून आणून, शिक्षक विद्यार्थ्यांना त्रासून सोडतात, तर कुठे विद्यार्थी शिक्षकांना त्रासवून सोडतात. अगदी अलीकडे तर चाकू सुरे घेऊन मारहाण किंवा खात्माच करण्यापर्यंत मजल गेलेली बघावयास मिळते हे विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांचे हे खालावलेले चारित्र्यद्योतक म्हणावे लाभेल. तसेच व्यापारांनी जणू कोणताही माल शुद्ध स्वरूपात न देण्याचा चंगच बांधला आहे.प्रत्येक मालात भेसळ करूनच विकतात याची जराही खन्त त्यांना नसते. तसेच वाममार्गाने जास्त पैसा कमविण्याची कीड तर अघ्यापक, डॉ, यांच्या व्यवसायाला अधिकच लागलेली आहे. शासकीय क्षेत्रात प्रत्येक अधिकारी असो किंवा कर्मचारी किंवा क्लासफोर असिस्टंट, सेक्युरिटी सर्वांना हातावर दक्षिणा मिळाल्याशिवाय कर्म करायचीच नाही, असे ठरविलेलेच असते. शासकीय पातळीवर भ्रश्टाचार हा शिष्ट|चार झाला आहे.सार्वजनिक जीवनातील हि घाण निपटून काढण्यासाठी सुरवात करणे गरजेचे आहे. यांस सर्वांचीच साथ हवी असते. राष्ट्रीय चारित्र्य निकृष्टावस्थेत नेण्यास सर्व सामान्य जनता नेत्यांना जबाबदार धरते. परंतु ‘ यथा राजा तथा प्रजा ‘ ! याउलट सरकार हे जनतेचे प्रतिबिंब आहे; कारण जनतेतूनच लोक नेतेपदी निवडले जातात. म्हणून राष्ट्रीय चारित्र्यबांधणीसाठी दोन्ही पातळ्यांकडून प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय चारित्र्याचे महत्व भारतातील राजकर्त्यापासून सामान्य माणसापर्यंत सर्वानीच पटवून घ्यायचे आहे. हि चारित्र्याची घडण प्रथम घराघरातून होणे आवश्यक आहे. घरातील कर्त्यव्यक्तींनी उत्तम चारित्र्याचा आदर्श प्रथम मुलांसमोर ठेवला पाहिजे. मुले,मुली,तरुण हेच राष्ट्राचे आधार आहे. त्यांच्यात देशाभिमान,धैर्य,नीतिमत्त्ता,संयम, निस्वार्थ बुद्धी निर्माण करणे आवश्यक आहे. देशाबद्दलची नितातं भक्ती त्यांच्या मनात रुजेल असेच संस्कार असायला हवे. त्यासाठी मुलांच्या क्रमित पाठयक्रमाच्या पहिल्याच पृष्ठावर प्रतिज्ञा दिलेली असतेच. शिक्षण संस्थामधून ती म्हटल्या गेलीच पाहिजे असे रूळ अवश्य असावे. मुलांना त्याचा अर्थ कळला पाहिजे व त्याच प्रमाणे वर्तन घडले पाहिजे याची दक्षता घ्यावी. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, व राष्ट्राची इतर मानचिन्हे हे प्रत्येकाचे मानबिंदू ठरणे आवश्यक आहे. याचा अपमान कोणीही सहन करता कामा नये. अपमान करणाऱ्यास कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे. व्यपारांनी माफक नफा घेऊन निर्भेळ वस्तू पुरविल्या पाहिजे. व्यवसायिकांनी स्वतःच्या व्यवसायाचे पावित्र्य टिकविलेच पाहिजे. प्रत्येकाने जास्तीत जास्त आपल्या देशी मालाचा वापर करून आपल्या देशाचे भाग्य साधले पाहिजे. विदेशी मालाचा बहिष्कार करायलाच पाहिजे. प्रत्येक व्यापाराने आपला माल उत्कृष्ट असावा त्यात कुणीही काहीच दोष काढणार नाही, अशी त्याने खात्री करून घ्यावी.यालाच म्हणतात राष्ट्रीय चारित्र्य जोपासणे, सांभाळणे. असे केल्यास भारताची मान व शान उंचावण्यास विलंब लागणार नाही.