For more information kindly read bellow article.
मुद्दा :- मानवी मन हे सौन्दर्य सक्त आहे. बालक बालिका, तरुण, प्रौढ, सर्वांनाच फँशनचे वेड लागले.चित्रपटांचा प्रभाव- फँशनच्या माध्यमातून लटके समाधान – फँशनचे वेड हे संसर्गजन्य रोगांसारखे. फँशन हि कृत्रिमता न होता सहज प्रवृत्ती व्हायला हवी.
मानवी मन हे सौन्दर्यसक्त आहे. सुंदर, आकर्षक दिसण्यासाठी माणूस स्वतः:ला अनेक प्रकारे नटवत . आदिकाळात मनुष्य स्वतः:ला पानाफुलांनी, पक्षांच्या पिसांनी, पशूच्या कातड्यानी नटवत असे. आता मात्र काळानुसार सौन्दर्य प्रसाधने, वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा साहित्य, कपडे या मध्ये फार बदल होत आहे. मूळ इंग्रजी भाषेतला या शब्दाचा मराठी भाषेतला अर्थ ‘ पद्धत किंवा चलरीत’ असा आहे. हि पद्धत म्हणजे फँशन देश,काळ व परिस्थितीनुसार प्रत्येक बाबतीत वेगवेगळी असते. वेशभूषा, केशभूषा, लकबी, इत्यादी बाबतीत तर सातत्याने बदलत असते.
पूर्वी बालगर्न्धर्व सारखे दिसण्यासाठी स्त्री वेषातली फुग्याची पोलकी, आंबाडा, नऊवारी नेसून त्यांची उभी राहण्याची ती पद्धत बहुतेक स्त्रिया उचलत.
गेल्या साठ वर्षांपासून तर चित्रपटातील नटनट्यांनी तरुण पिढीवर प्रभाव पडलेला आणि त्यांचेच अंधानुकरण करण्याची हाव त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यांच्या फँशनने तरुण मनाची इतकी पकडघेतली कि हे फँशनचे वेड पुरताना सभ्यता, संस्कार यांचा विवेक सुटलेलाच आहे, आणि कमीत कमी व तंग कपडे घालून देह प्रदर्शन करून समाजात वावरण्याची असंस्कृत फँशन आता फारच बळवंत चाललेली आहे हे आपण पाहतो आहे.
या फँशनची लाट आता इतकी कि अनेक मोठमोठे उद्योग समूह यांनी वेगवेगळ्या कपड्यांच्या जाहिराती करून टी.व्ही. वर फँशन परेड, फँशन शो, या कार्यक्रमांना आता लोकप्रियता मिळालेली आहे. या वर आधारलेले अनेक उद्योग निर्माण झालेले आहेत.
या विविध प्रकारच्या फँशन मुळे मनुष्यच अहं कुठेतरी सुखावण्याची धडपड चालू असते. समानु जीवन जगणाऱ्या जीवाला आता असामान्य जीवन जगण्याची ओढ लागलेली आहे. प्रत्येक्षात त्याच्या अंनत मर्यादित कुवतीमुळे ते जीवन त्याला मिळू शकत नसले तरी त्यासाठी त्याची धावपळ सुरूच असते. व आयुष्याची आसक्ती फँशनच्या माध्यमातून लटके समाधान घेत तो शमवत असतो. त्यामुळेच जवळ जवळ बहुतेक लहान मोठी वेगवेगळ्या हिरो हिरोइनचे पोशाख व सुंदरतेच अनुकरण करून आपली हौस पुरी करतात.
कालचक्रानुसार फँशनही भरभरा बदलते आहे. आजची फँशन उद्याच जुनी होते. सध्या फँशनचे वेड इतके वाढलेले आहे कि टी करताना सारासार विचार ,विवेकबुद्धी, सौन्दर्य दृष्टी, हि घनदाट टाकल्याचे जाणवत आहे. फँशनच्या नावाखाली विटके,चिटके, मळलेले, ठिगळ लावलेले, तर फाटलेले, आडवे उभे चट्टे पडलेले, रंग उतरलेले, आकार हीनता, त्या कपड्यांना आकारच उरलेला नाही, असे या प्रकारातले कपडे म्हणजे आजचे वैशिष्ट्य होऊन बसलेले आहे, परंतु त्यांना नाकारण्याची कुणाचीही कुवत नाही.