The early Marathi literature written during the Yadava (850-1312 CE) was mostly religious and philosophical in nature. The earliest known Marathi inscription found at the foot of the statue at Shravanabelgola in Karnataka is dated c. 983. However, the Marathi literature started with the religious writings by the saint-poets belonging to Mahanubhava and Warkari sects during the Yadadva reign. The Yadava kings patronized the two religious sects and the Marathi language, which had been adopted by these sects as the medium for preaching their doctrines.
For more information kindly read following article.
खऱ्या मित्राची महती — सुख- दुःखात साथ देणारे ग्रन्थरुपी सोबती- ग्रन्थ आपल्याशी हितगुज करतात. ग्रन्थ हेच गुरु ग्रन्थ हेच मार्गदर्शक अज्ञानाचा अंधार नाहीसा करणारे ज्ञानरुपी सूर्य म्हणजेच .
संकटाच्या वेळी जो मदतीला उभा राहतो तोच खरा मित्र होय. एकंदरीत जगातील अनेक माणसांचा
असा अनुभव आहे कि, गप्पागोष्टी करायला, सुख , आनंद भोगायला आपल्या आजूबाजूला अनेक मित्र जमतात. पण आपल्या वाईट परिस्थितीत आपणाला कोणाची साधी शाब्दिक सहानुभूतीही लाभत नाही.
जेव्हा विविध आणि विचित्र संकटे माझया वाट्याला येतात तेव्हा मी सुद्धा माझया मित्रांकडे धाव घेत नाही. परिस्थितीशी झुंज करण्याची वेळ आली कि माझया ग्रन्थरुपी सोबत्याची मदत घेते. कारण सुखाच्या तसेच संकटाच्या प्रसंगीही तितक्याच आपले पणाने साथ देणारा. ग्रन्था सारखा दुसरा सोबती नाही. असे मला माझ्या अनुभवाने पटलेले आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा , एकनाथ गाथा, श्रीमद भगवतगीता, यांसारखे ग्रन्थ जीवनातील प्रत्येक वळणावर, चढउतारावर आपल्याला मार्गदर्शक ठरतात. कारण आयुष्यातली कुठलीही गोष्ट घ्या. तिचा विचार केलेला नाही, किंवा त्यावर उपाय सांगितलेला नाही असे या ग्रन्थात शोधूनही सापडणार नाही.
ग्रन्थ हे आपल्याशी हितगुज करतात. आपण एकटे असलो,आजारी असलो, आपल्या जवळ आपली जवळची व्यक्ती नसेल तरी हे ग्रन्थ सोबती आपल्या एकटेपणाची जाणीव दूर करतात. आपल्याशी सुसंवाद साधतात. आपली साथ देतात. या ग्रन्थाची निर्मितीच हि एकटेपणात झाली आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्यवीर सावरकर हे जेव्हा तुरुंगात होते त्यांच्या सोबतीला हेच ग्रन्थ होते.यांच्या सोबतीने पुढे त्यांनी कितीतरी अलौकिक कार्य पार पडलेत.
ज्ञानेश्व्रर, तुकाराम महाराज, एकनाथांनी हे ग्रन्थ एकांतातच लिहिलेले गेले आहेत.
जेव्हा आपल्या मनाची जी अवस्था असेल त्या अवस्थेत ग्रन्थ आपल्याला साथ देतात. मन दुखी असेलतर तत्वज्ञानाने ग्रन्थ मनाला स्थैर्य आणि दिलासा देतात. मन आनंदी असेल तर हलक्याफुलक्या कविता किंवा कथा -कादंबऱ्याच्या वाचनाने त्या आनंदाला बहर येतो. विनोदी ग्रन्थ मनाची मरगळ घालवायला मोलाची मदत करतात. सामान्य स्त्री असो वा पुरुष कधी कधी जीवनात कितीतरी वेळा मनाने अस्वस्थ आणि एकटा असतो.तेव्हा हीच कथा कादंबरी मनाचा एकटेपण घालवून मन शांत करिते, क्षणातच मन आनंदी करिते तेव्हा यांची सोबत करून वाचन केलेच पाहिजे. तसेच संसाराला कंटाळून विजनवासात जाणारी मंडळी स्वतः बरोबर ग्रन्थ सोबत म्हणून का घेऊन जातात , यामागील रहस्यहि ग्रन्थ हेच सोबती हे होय.
ग्रन्थ आपल्याला गुरूप्रमाणे मार्गदर्शन करतात. त्यांनीच कोपर्निकसला मार्ग दाखविला. सी. व्ही. रामन सारख्या शास्त्रज्ञानां संशोधनात मदत करणारे ग्रन्थच होते. आणि यांनीच कालिदास, शेक्सपिअर, भवभूती यांच्या कलेत गुरुचे स्थान भूषविले. ‘शारदा’, ‘इंदू काळे’, ‘सरला भोळे’.
‘एकच प्याला’. यां सारख्या समस्यां प्रधान ग्रथांनी सामाजिक समस्यांची उकल करण्याची दृष्टी दिली. रस्किनच्या ग्रँथाचे वाचन करताच बॅरिस्टर मोहनदास गांधी यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले. त्याच क्षणी जगातील अनेक महात्म्यांचा अवतार उदयास आला.
चरक, सुश्रुत आणि असेच अनेक वैद्यकीय क्षेत्रातील ग्रन्थ आजच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरलेले आहे. त्याच प्रमाणे थोरव्यक्तींचे चरीत्रग्रन्थ जीवनात आपल्याला ध्रुवताऱ्या प्रमाणे मार्गदर्शन करतात.
हजारो पाकक्रिया, सुरुची,रुचिरा, अन्नपूर्णा आणि अनेक यांसारखे ग्रन्थ गृहिणींना पाककला शिकविताना खऱ्या सहचरीपेक्षा हि अधिक जवळचे भासतात. आणि समजा एखादी पाकक्रिया बिघडली तरी या सख्या हसून चेष्ठा करण्याचे भय नसते. आपलेच पूर्वज असलेले लेखक पु.ल.देशपांडे, ,काकासाहेब कालेलकर, गंगाधर गाडगीळ यांचे ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ प्रवासवर्णात्मक ग्रन्थ तसेच हासास्पद लेखन केलेले विनोदी लेखन केलेले असे कित्येक ग्रन्थ वाचताना जीवनात आनंद निर्माण होतो. असे कित्येक लेखकांचे धार्मिक ग्रन्थ वाचताना जीवनात धैर्य वाढविणारे आहेत.
तुरुंगात असताना सुद्धा ग्रँथाचा अभ्यास करून परीक्षा देणारे व ग्रन्थ वाचनाने आपल्या जीवनाला
नवा चांगला आकार देणारे कैदीही अनेकानेक आहेत. असे कित्येक महान व्यक्ती आहेत कि ग्रन्थाच्या वाचनातून आपल्या जीवनाचा कायपालट करून तपस्वी होऊन गेलेत.
अशा विविध प्रकारे, बर्या वाईट प्रसंगात, संगतसोबत करणाऱ्या ग्रन्थरुपी मित्राची आपल्याकडून मात्र परतफेड म्हणून काहीच अपेक्षा नसते. त्यांना एकदा वाचून कपाटात बंद करून ठेवले किंवा त्यांना निष्काळजीपणे हाताळले तरी तोंडातून ब्र काढत नाही. तेव्हा तुम्हीच विचार करावा कि व्यक्तीमित्र चांगला कि ग्रन्थमित्र. सूर्याला संस्कृत भाषेत मित्र म्हणतात, ग्रन्थरुपी मित्र हा सूर्याप्रमाणे अज्ञानरूपी अंधार नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश पडून ते आपल्या जीवनात आनंद,चैतन्य फुलवितात. म्हणूनच म्हणतात कि ग्रन्थ हेच आपले सर्वात जवळचे मित्र व आपले खरे सोबती होत…..