भारत हा कृषी प्रधान देश आहे हे खरेच आहे. पूर्वीच्या भारतात ९० टक्के खेडी होती. त्यामुळे हे म्हणणे योग्य होते. परंतु आता खेड्यातील जनतेची धाव शहराकडे असल्या कारणाने शेती करणे हा व्यवसायच दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे शेतजमिनीचे क्षेत्रफळ दिवसेंदिवस फार कमी होत जात आहे.
आता हे चित्रच नेमके उलटे दिसत आहे.सर्व चैन,सुख,रोजगाराची उपलब्धता.शहरात दिसत असल्याने खेड्यातील जनता खेडी सोडून शहराकडे घावत आहे. फुटपाथवर राहावे लागते, वाममार्गाने पैसे मिळवावे लागते. अर्ध पोटी राहावे लागले तरी खेड्यातून शहराकडे आलेली जनता परत खेड्यात जावू इच्छित नाही. काही शिक्षणाच्या तर काही रोजगाराच्या निमित्ताने शहरात येतात. मग खेड्यात उरतात ती म्हातारी, वयोवृद्ध, कमजोर, हतबल मनुष्य आणि त्या ओसाड जमिनी वाडया, बागा या दुर्दैवी जीवांना कोणी वाली नसत.
वास्तविक शहरी जीवनात अनेक भयावह समस्यां निर्माण झालेल्या आहेत. आणि प्रतिदिन त्यानं नवीन भर पडतच आहे. अफाट गर्दी,गोंगाट, हवा-पाणी अन्न यासर्वांचे प्रदूषण त्यापासून होणारे दुष्परिणाम शहरवासीयांना भोगावे लागत आहे. अस्वच्छता, निवार्याची समस्यां हि तर कधीच नसुटणारी आहे. शहरातील लोकसंख्या वाढल्याने प्रत्येकाला रोजगार मिळतोच असे नाहो. तरीपण येथील रंगीबेरंगी जीवनाला चटावलेले माणूस खेड्याकडे पाठ फिरवून शहराकडील अनारोग्यकारक आणि आत्यन्तिक अशा गैरसोयीच्या वातावरणात रहायला तयार होतो आणि हे जिवन असहाय झाले कि व्यसनाच्या आधीन होतो. जिवन संपवण्यास तयार होतो. पण तो आपल्या शेत व्यवसायाकडे फिरकत नाही.
” तुझे आहे तुज पाशी ,तरी तू जागा चुकलासी” अशी स्थिती आज झालेली आहे. जसे खो,खो खेळातील खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध तोंडे करून बसतात. तसे हात आणि मन एका बाजूला,व संधीची तोंडे दुसऱ्या बाजूला आहेत. तसेच मनुष्याचे आहे हात आणि मने शहरांकडे धाव घेत आहे, तर असंख्य संधी खेड्यात उपलब्ध होत आहेत.ज्या हातांना काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही असे हे हात खेड्यातील कामात गुंतवले जाऊ शकतात.
आत तर खेड्यातही रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे. तेव्हा तेथील लोकांनी तेथील गरजांनुसार उद्योग धंदे, धंदेशिक्षण देण्याच्या तांत्रिक शाळा जास्तीत जास्त प्रमाणात सुरु केल्या पाहिजे. तर खेड्यातील युवकांना आपले खेडे सोडून जाण्याची गरज राहणार नाही. आवश्यकतेनुसार शिक्षण झाल्या नंतर खते रसायन तयार करण्याचे तंत्रप्रशिक्षण, तसेच अवजारे तयार करण्याचे व शेतीव्यवसायाचे शास्त्रीय, प्रगतज्ञान देणारे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर देण्यात यावे, हे प्रशिक्षण
देण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात यांचे कारखाने उघडावे म्हणजे एकाच वेळी प्रशिक्षण व रोजगार दोन्ही उपलब्ध होतील. ज्यांची स्वतःची जमिनी असणारी मंडळी शेती व्यवसाय करून इतर कुकुटपालन, दुग्धव्यवसाय, पशुउत्पादन. वीटभट्टी उद्योग, गोटफार्म, इत्यादी पूरक व्यवसायाकडे वळतील. हे सर्व कारखाने व प्रशिक्षण विद्यालये सरकारी तत्वावर उभारल्यामुळे सरकारच्या मदतीने
खेड्यांचा सर्वांगिक विकास झाल्यास शेतीच विकास व शेतकरी समाजाचा विकास झाल्याने शेतीचे क्षेत्रफळ कमी होणार नाही व शहरातील निवार्याची समस्यां कमी होईल