Muktabai or Muktai was a saint in the Varkari tradition. She was born in a Deshastha Brahmin family and was the younger sister of Dnyaneswar , the first Varkari saint . Muktabai wrote forty-one abhangs throughout her life span.
For more information kindly read following articles
इवलीशी मुक्ता सकाळी डोपेतून उठून आई वडिलांना शोधू लागते. अरे ! आज मला उचलून घ्यायला कुणीच कसे आले नाही. म्हणून बावरते आणि ज्ञानदादापाशी जाते अन विचारते. दादा आई कुठे आहे ? ज्ञानदादा तो ! काय बरे सांगावे मुक्ताईला ! आई सांगून गेली कि रडायचे नाही, तिथल्या तिथेच हुंदका दाबून घरला. एवढेच पुरेसे झाले मुक्ताईला ! मुक्ताईच्या मनात दाटून आलेला कढ, डोळ्यातील अश्रू येत येत जागच्या जागीच जिरतात , तिचे बालपण, अवखळपणा माहित नाही कुठे गेला? क्षणातच समंजस झाली मुक्ताई ! काहीच न कळण्याचं वय अशी अजाण मुक्ता तिला कसे कळणार आई-बाबांनी या उघड्या आकाशाखाली आपल्याला सोडून देहांत प्रायश्चित्त घेतलेले आहे. आता कडेवर उचलून घेऊन लाड करायला बाबा येणार नाही. आणि आईची कुस हि मिळणार नाही. निशब्द झाली मुक्ताई !
बाबाची कामे निवृत्ती दादा करू लागला आणि कोरांन्नाचे अन्न म्हणून रांधून – वाढू लागला ज्ञानदादा. प्रेमाने खाऊ घालू लागला, माऊलीच झाला होता सगळ्यांचा ! आता मला देखील मोठे व्हायला हवे असा विचार येण्या आधीच क्षणात मोठी होतेच मुक्ताई ! खरे तर विरक्ती, ज्ञान,भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तीमंत स्वरूप घेऊन निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान, मुक्ताबाई हे जन्माला आले. साक्षात दिव्यत्वाची हि चार रूपे होत. पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून या माता-पित्याला निरोप घ्यावा लागला विश्वाचा. कोरांन्नाचे अन्न खाऊन मोठे होणे सोपे नव्हते. आदि मध्ये मधुकरीच्या भिक्षेसाठी निवृत्ती, ज्ञानदेव जात असतं. एकदा ज्ञानदेव भिक्षेला गेले, परंतु अपमान सहन करण्याची जणू सवयच झालेली. कधी कोणाला उलट उत्तरे दिली नाहीत . एकदा कोणी ज्ञानोबाला उलट -सुलट बोलले ते बोल ज्ञानोबांच्या जिव्हारी लागले. तडक परतले आणि ताटीचे दार घट्ट लावून घेतले. अशावेळी समजूत घालायला धावली मुक्ताई ! कळवळून विनवू लागली. आदिनाथांकडून गहनीनाथांकडे, गहनीनाथांकडुन निवृत्तीदादाकडे, निवृत्तीदादाकडून ज्ञानदादाकडे आलेल्या नाथसंप्रदायाची आठवण करून दिली. तेव्हा त्या शब्दाचे म्हणजेच मुक्ताच्या हे ताटीचे अभंग झाले. योगी पावन मनाचा, साहे अपराध जणांचा, विश्व् रागे झाले वन्हीं, संत सुखे व्हावे पाणी | शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्व् पट ब्रम्ह दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा | मुक्ता हि आदिमाया होती, ज्यांच्या अंगी द्या, क्षमा,असते तो संत एवढे अगाध ज्ञान सांगत नाही.
मुक्ताईच्या शब्दातून लडिवाळपणा ओसंडतो अरे दादा ? आपलीच जीभ आपल्या दाताखाली म्हणून काय आपण आपले दात पडून घ्यायचे काय? नाही ना ! ब्रम्ह पदाला पोहचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात. अपेष्टा सोसाव्या लागतात. हे तूच आम्हाला शिकवलेत नां? तरी ताटीचे दार काही उघडत नव्हते, मुक्ततेचा स्वर आर्त होत चालला. आवाजात कंपने भरली. पण डोळ्यात पाणी आणून चालणार नव्हते. ज्ञानदेवाच्या उपदेशाने जगाचा उद्धार व्हावा अन ते सुखाचे आगर व्हावे. पुनः शुद्ध मार्ग धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरां || ताटीचे दार काही उघडेना, हळवी झालेली मुक्ता म्हणते ” लडिवाळ मुक्ता बाई, जीव मददला ठायींचे ठायी, तुम्ही तरून विश्व् तारा,| ताटी उघडा ज्ञानेश्वरा |” मुक्ताईचे बोलणे लडिवाळ पण ध्येयाची जाणीव देणारे होते. ज्ञानदेवांचा अवतार विश्वाला तारण्यासाठीच आहे. याचे भान डोकावले शब्दातून आणि ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले. त्यानंतर आयुष्यात अलौकिक कार्य घडलेत. मुक्ताईच्या हातून विश्व् उद्धाराचे कार्य घडले. जपातपांच्या सामर्थ्याचे १४०० वर्ष आयुष्य लाभलेल्या चांगदेवाला तिनेच शहाणे केले. मुक्ताई चांगदेवांच्या गुरुमाउली झाल्या. त्यावेळी त्यांचे वय ११ ते १२ वर्षाचे असेल. अलौकिक संतत्व त्यांच्या होते. मुक्ताईच्या अनुग्रहाने आत्मरुपाची प्राप्ती चांगदेवास झाली तेव्हा चांगदेवांचे १४०० वर्षाचे आयुष्य धन्य झाले. अशी हि मुक्ताई धीराची, सोपानदेवांच्या समाधी नंतर मागे आपलेही जीवित कार्य संम्पल्याची प्रगल्भ जाणीव झाली. आकाशातून कोसळणाऱ्या विजे सह क्षणाधार्थ लुप्त झाली.