For more information kindly read below article.
आजच्या फँशनच्या वेडा पायी मुले – मुली आणि स्त्रीयां सुद्धा आपल्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष करीत आहे. रंगभूषा (मेकअप ) करण्याची पद्दती फार फोफावली आहे.अनेक रासायनिक द्रव्य असलेली लिपस्टिक,क्रीम,रूज,पावडरी,फाउंडेशन,काजळी,पापण्यांचे रंग, डोक्यावरील केसांचे विग, केस रंगविण्याच्या वेगवेगळ्या रंगांचे प्रकार इत्यादी कितीतरी सांगाव्या तितक्या कमीच आणि हे सर्व उत्तम दर्जाचे असतीलच असे नाही. हलक्या दर्जाच्या वस्तूने चेहऱ्यावर पुरळ उठतात, कातडी काळी पडू शकते तसेच चट्टे उठतात. हलक्या दर्जाच्या लिप्स्टीकने ओठ काळे पडतात. ओठांवर कोडासारखे डागही पडतात. कानांत मोठमोठ्या व वजनी अश्या प्रकारातील टॉप्स वापरल्याने कान फाटतात. परंतु या सर्व गोष्टींचे भानच नसते.फँशनचे वेड समाजात अगदी संसर्गजन्य रोगांसारखे पसरलेले आहे. नित्य नवी फँशन जवळ जवळ लहानमोठी ,मुले मुली, तरुण, प्रौढ अगदी सर्वांनाच हवी हवी असते. याचा परिणाम म्हणूनच प्रत्येक उद्योगी पैशा कसा कमविता येईल आणि कशाही वस्तू ग्राहकाच्या माथी मारता येईल हेच बघत आहे.फँशन च्या नावाखाली बाजारात कृत्रिम नखे, कृत्रिम पापण्या, केसांचे टोप परंतु यासर्वांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होईल याच कुणी विचारच करीत नाही.हल्लीचे ब्युटीपार्लर हे या फँशनच्या वेडाचे फलित आहे. चेहऱ्याला ब्लिच करणे, भुवया कोरणे, हातापायावरील लव काढणे, आणि अशा इतर अनेक गोष्टी या पार्लर मध्ये केल्या जातात. यासाठी अमाप पैशा खर्च केला जातो. एकावेळी घरात पौष्टिक आहार नसला तरी चालेल, पण या दिखाऊ आणि खर्चिक बाबी अगदी झाल्याचं पाहिजे, या कडेच सर्वांचा कल चालला आहे. फँशनचे वेड हि मानवी मनाच्या प्रकृती ऐवजी विकृतीच म्हणावी लागेल. आज नैसर्गिक पेक्षा कृत्रिम गोष्टीत आपण हरवून बसलेलो आहोत.
पूर्वी नटनट्यांसाठी या गोष्टी ठीक होत्या पण आज आपल्या रोजच्या जीवनात यासर्वांची गरजच होऊन बसलेली दिसत आहे. परंतु या साऱ्या मागे पैशा वाया आहेच व आरोग्याचा हि विचार होत नाही.
या सर्वांमध्ये या वस्तूंचाव्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची चांदीच आहे. त्यांचा,कच्चा पक्का सर्वच मालाला भरपूर प्रतिसात होत असून पैसाही भरपूर कमावला जातो.
प्राचीन काळी सौन्दर्य वाढविण्यासाठी अनेक फँशन होत्या परंतु त्याचा उपयोग करताना प्रत्येक वेळी शिष्टाचार, सभ्यता, सौन्दर्य, मुख्यत्वे आरोग्य, या सर्वांची जपणूक केली जात असे. आरोग्यवर्धक वस्तूंचा उपयोग केला जात असे.
फँशन करणे हे वाईट नाही. सतत बदलत जाणे हि मानवी मनाची सहज प्रवृत्ती आहे. पण फँशन करत असताना स्वतःच्या आरोग्याला, खर्चाला झेपेल एवढे सांभाळले पाहिजे व आपल्या
फँशन मुळे परिवारावर किंवा समाजावर वाईट परिणाम होऊ नये. व सांगायचे म्हणजे कधी कधी अति फँशनने आपल्याही जीवनावर त्याचा परिणाम होऊ नये याची काळजी घ्यावी.