Exceptional is the new normal. And because we’re all quite average, we feel that we don’t measure up and that we’re not good enough. “Being ‘average’ has become the new standard of failure.For more information kindly read below article.
पूण; जन्म म्हणजे जुने वस्त्र टाकून देणे व नवीन वस्त्र धारण करणे. सूक्ष्म देह हा याच प्रमाणे नवीन वस्त्रे धरण करून पूण: पूण: कारण देहात प्रवेश करतो. व जन्म घेत राहतो.
मनुष्य मृत झाला कि आपल्याकडे आत्म्याला शांती देण्याची औपचारिक प्रथा आहे. पण आत्म्याला शांती देण्याची आवश्यकता नाही. तो नेहमी शांतच असतो. तो कधीही अशांत नसतो. आणि त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही. सुक्षमदेह हा चैतन्यमय असतो. त्यामुळे स्थूल देहाला चैतन्यच अनुभव येतो. त्याची हालचाल होऊ शकते. आणि सूक्ष्मदेह हाच खरा प्राण असतो. तो वायू रूपात असतो. हवा हि डोळ्यांनी दिसत नाही. परंतु तिचे अस्तित्व जाणवत असते. त्याच प्रमाणे प्राणाचे आहे. सूक्ष्म देह हा हलका असतो, प्राणवायूच्या स्वरूपात असतो. त्यामुळेच हा एवढा मोठा स्थूलदेह त्याच्या आधाराने त्याच्याच चैतन्याने उभा असतो. देहाला त्याच्या अस्तित्वामुळेच हलके पणाची भावना असते. आणि सूक्ष्मदेह हा स्थूलदेहाला सोडून गेल्या नंतर स्थूलदेह हा जड पडतो. त्यातील हलकेपणाची भावना निघून जाते. यालाच म्हणतात कि माती जड आली. हि माती जड होण्याचे कारण त्यातील सूक्ष्मदेहाचे अस्तित्व संपणे हेच होय. हलकेपणाची, जीवनतपणाची, चैतन्याची भावना शरीराला येण्याचे कारणही सूक्ष्मदेहच आहे. तो सूक्ष्मदेह निर्लेप असतो. अविनाशी असतो.
सूक्ष्मदेह हा स्थूलदेहाला संकेत करीत असतो परंतु मनुष्य कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण त्याला विश्वास नसतो. सूक्ष्मदेहाचे एकलेतर बुद्धी विकासाकडे धाव घेते. मनुष्य अनेक गोष्टीत यशस्वी होतो. त्याला धैर्य प्राप्त होते. सूक्ष्म देहाचे ऐकले नाही तर बुद्धी विकारांकडे घाव घेते.