For more information kindly read below article.
मनात विकार किंवा मन दुरबल होणे याचे एक कारण म्हणजे, मनाचा कद्रूपणा, क्षुद्रपणा या मुळे मनाला आला मनोविकृती जडते. स्वार्था मुळे ती वाढत जाते. किंवा व्यक्तीत कुठे तरी उणेपणा असतो त्यामुळे मन नेहमी अशांत असते. दुबळे असते. आणि त्यामुळे तो गलितगात्र होतो . त्यासाठी मनात समर्पणाची भावना आणावी. नाही तर सत्पुरुषयाचे प्रत्यक्ष दर्शन घेत राहावे. त्यांच्या सात्विक वैराग्याने मनाला सहजच समर्पणाची भावना येते. दुबळ्या मनाच्या मनुष्याला थोडा जरी त्रास झाला तरी तो घाबरतो, परंतु त्रासाला घाबरून न जाता मनाला दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत जावा. मनाचा आधार म्हणजे धैर्य त्याला कधीही सोडू नये. मनाला समर्पणाची भावना असणे फार गरजेचे आहे त्यानेचं जीवनाचे सार्थक होते, अन्यथा जीवनाला अपूर्णत्व येते. ते पूर्णत्वाला पोचू शकत नाही.
मनाचा अजून एक विकार म्हणजे संशय. तो संशय मनात अनेक प्रश्न निर्माण करतो. आणि प्रश्न निर्माण झाले कि ते मन उत्तराच्या शोध कार्यास लागते. तो संशय वेळीच नाहीसा झाला नाही तर बळावत जातो व मनुष्य वेडा होतो. मनात कसलेसे विकल्प तयार होत जातात आणि त्यावेळीच मनुष्य नको ती भयानक कार्य करतो आपल्यावर संकटे ओढवून घेतो. मनात विकल्प असला कि शक्ती नष्ट होते चिंता वाढतीला लागतात, त्या मनाला वाळवी प्रमाणे पोखरून टाकतात. मन अस्थिर होत जाते.
मन नि:संशय, निर्विकल्प व शांत होण्यासाठी नामस्मरण हा सर्वोत्तम उपाय आहे. आणि देव दर्शनाला, देवळात जाऊन बसने काही वेळ का असेनात पण मनुष्याचे मन तेथेच शांत होते. मन सर्वस्वी इश्व्राचे रूप पाहण्यात स्व:ताला विसरून जातो. देवळात बरेचदा आपण कासव बघतो. त्याची वृत्ती म्हणजे तो आपले सर्व इंद्रिय अंतर्मुख करतो व शांत असतो त्यासाठीच ती कासवाचीमूर्ती स्थापिली असते, त्याचे प्रमाणेच आपल्यालाही देवळात सर्व इंद्रिय अंतर्मुख करून नामस्मरण मध्ये तल्लीन व्हावयाचे असते. ज्ञानदेव म्हणतात –
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | तिने मुक्तिचारी साधियेल्या || ईशवर दर्शनाचे फार महत्व आहे.
मनुष्य देहाला भयंकर इच्छा, वासना असतात, मन मायेने मोहित असते,त्याच्या या मानवी इच्छेतून जे जे प्रगट होते तेच त्याच्या मनाला अशांत करीत असते. त्यासाठी त्याची एवढी धडपड चालू असते त्यामुळे त्याच्या बुद्धीला,मनाला स्थैर्य लाभत नाही. हा या युगातील कलीचा प्रभाव आहे. या तुन सुटका सहजासहजी नाहीच. आज आपआपसात आई-मुलगा, पती-पत्नी, बहिण- भाऊ, भाऊ-भाऊ, कुणालाही एकमेकांबद्दल प्रेमच उरलेले नाही. सर्वच एकमेकाकडे संशयानेच पाहतात. आज पूर्वीसारखा प्रेमाचा भाग कुटुंबात किंवा कुटुंबाच्या बाहेरही दिसत नाही. पती-पत्नी एक जीव होणे हा प्रकारचं संपला आहे. त्यामुळेच मनस्थिती अस्थिर होत आहे. सर्वांनाच कुणाची ना कुणाची चिंता सतावीत आहे. तीच चिंता देहाला चिते सारखी जाळून खाक करते. देह धुळीला मिळविते. चीन हा जरी मनुष्याचा स्वभाव असला तरी ती मर्यादे पलीकडे गेली कि जीवनाला खाक करणारच. म्हणून सर्व चिंता भगवंतावर सोपवून मोकळे व्हावे.म्हणजेच आपल्याला निश्चिन्त जगता येईल. अति पैशाचा लोभ धरू नका त्या ईशवराला तुम्हाला जेवढे द्यायचे तेवढेच तो देणार बाकीचे तुमचे कुणाला लुटून,फसवून
जी कमाई असेल ती तो कोणत्याही मार्गे तो नेणारच आहे. तेव्हा मेहनतीचे, कष्टाचे जे असेल तेच मार्गी,किंवा कामी लागणार आहे हे लक्षात असू द्या. आपल्या जवळसेल तर मदतीचा हात पुढे करा त्यात बरकत असते. द्रव्याच्या उपभोगातून शांतीचा प्रश्नचं उदभवत नाही. आपली कृती आपल्याला अपराधी वाटत नसली तरी मन अपराधी झालेले असते. ते मन कधीच शांतपणे जगू देत नाही.
कधी कधी मनुष्याला जगावेसे वाटत नाही. नैराश्य, वैफल्याची भावना मनात घर करते. मनुष्य म्हटलं कि त्यात थोडी ना थोडी संशय, हीन भावना हि असतेच. या प्रमाणे मनाची प्रवृत्ती असेल तर त्यासच दर्जा खालावतो. त्याला तरुण जाणे अवघड होऊन बसते. मनाने शूद्र मनुष्य कधीच तरुण जात नसतो. वर्णाने हीन असलेला मनुष्य तरुण जातो. कलंकित मनुष्य कधीही तरुण जात नाही. हे आपण आपल्या धर्मग्रन्थात कितीतरी वेळा वाचनात, श्रवणात आलेले आहे उदा:- रावण, हिरण्यकश्यपू, कंस, दुर्योधन. हि ऐतिहासिक परंपरा आहे. त्याच्या वर ईशवराची अवकृपाच असते.
द्रव्यलोभ, विकार, विषय, अति स्वार्थ, अति अन्नलोभ हे केल्याने मनाला अशुद्धता प्राप्त होते. आपणहोऊन पैसा आपल्याकडे आला तर स्वीकारावा. परंतु वाईट मार्गाने आला तोही निषफळ ठरतो.
मनुष्य पैशाने मोठा ठरत नाही तो त्याच्या औदार्याने मोठा होतो. मनाचे औदार्य नसलेला मनुष्याचे वैभव हे भासमान असते. कारण त्याचा उपयोग ते व्यक्तिगत करू शकत नाही. कधी कधी तो स्व:ताच्या सुखासाठीच करीत नाही तर तो दुसऱ्याच्या सुखासाठी काय करणार? मनाला सुखाने,समाधानाने राहायला शिकवा. आपल्यातील अहंकाराचे कंगोरे झिजवून टाका. नाही तर ते मधु मधून डोके वर करतच राहते. गटाराप्रमाणे पुन्हा पुन्हा तुंबतेचं. मनाच्या कप्प्याचे तसेच असते ते मध्ये मध्ये साफ करावेच लागते. तेही नाम स्मरणाने स्वच्छ होत असते. नाहीतर मनाला कमकुवतपणा येतो व तो अधर्माच्या गोष्टी करायला लागतो. त्याच सोबत मनात क्षुद्रपणा घर करतो.
मनाची अवस्था कधीही उच्चं स्थितीत असली पाहिजे. आपल्या देहात मनाचे ठायी एक सुप्त शक्ती असते. तिला जागृत करावी लागते. ती जागृत झाली कि मनाला ईशवराची ओढ लागते. चांगल्या लोकांच्या सहवासाची सवय होते. आणि हळूहळू सत्पुरुष्याच्या संगतीची इच्छा जागृत होऊन
मनुष्य सत्मार्गावर रूढ होतो. ज्ञान प्राप्त होते. कारण आपले मन नदीच्या पाण्यासारखे असते पाणी जसे प्रत्येक थरांतून वाहत वाहत जसे शुद्ध होत जाते तसेच आपले मन शुद्ध होत जाते.मन शुद्ध झाले कि इंद्रिये विकाराची साथ सोडतात व मनाच्या ताब्यात येऊन देह शुद्धी करतात.