संत हे वरदपिंडी असतात




Like
Like Love Haha Wow Sad Angry
4

The word saint comes from the Latin sanctus and literally means “holy.” Throughout the New Testament, saint is used to refer to all who believe in Jesus Christ and who followed His teachings.

For more information kindly read below article.

Mind-and-Body-Balancing

सूक्ष्म देहाची जाणीव फार थोड्या लोकांना म्हणजेच सत्पुरुष, संत यांनाच असते. त्यामुळे त्यांना आत्मदर्शन होते. आत्मदर्शनामुळे त्यांची प्रज्ञा जागृत होते आणि सामान्य मनुष्याच्या प्रत्येक शन्केचे  समाधान ते व्यवस्थितरित्या करून त्यांना निसंशय बनवितात.वास्तविक पाह्ता या सूक्ष्मदेहालाj    वगळल्यास नरदेहात रक्त, मास,व अस्थी यांशिवाय आहे तरी काय ? माणूस मरतो म्हणजे आपण म्हणतो तो ‘ गेला’   पण तो जातो म्हणजे कोठे जातो ? आपल्या डोळ्यांना तर संपूर्ण देह पडलेला दिसतोच सर्व अवयव जेथेली तेथेच जशीच्या तशीच असतात. हा गेला म्हणजे नेमके काय झाले?

या सर्वांचे रहस्य काय? तो येतो आणि जातो.

भगवंताने या येण्याजाण्याचे  रहस्य मात्र सामान्यांना कळू दिले नाही.  सामान्य मनुष्य ते रहस्य. इ उलगडू शकत नाही. याचाच अर्थ या सृष्टीच्या निर्मितीवर, सृजन शक्तीवर,कोणाचेतरी नियंत्रण आहे.

ती नियंत्रित करणारी शक्ती म्हणजेच ईशव्रीय शक्ती होय.

सृष्टीच्या निर्मितीपासून उत्पत्ती, स्थिती आणि लय हे घडतच आले आहे. परंतु लय याचा अर्थ पूर्णपणे नाहीशी होणे नाही. या योनीतुन त्या योनीत जाणे. कोणीही मरत नाही, कोणीही अदृश्य होत नाही. फक्त हि प्रकृती, हा देह नष्ट होतो. चैतन्याचा वियोग एवढेच याचे कारण !  हेच चैतन्य पूण:पूण: नवे रूप धारण करून या पृथ्वी तलावर येत असते. आणि ते आपण अनुभवत असतो ऋणानुबंधातून.

सामान्य मनुष्य सूक्ष्म देहाचा विचार करतच नाही. जिवंत असताना  मानवाला इच्छा,वासना निर्माण होतात त्या कारण देहामुळे. स्थूल देहामुळे त्या पुरवून घेतल्या जातात.  मृत्यू नंतर कारण देहाच्या तृप्तीसाठी, शांतीसाठी श्राद्ध, पिंडदान यां सारखे विधी करून घ्यावे लागतात. कारण  देहाच्या वासना पुरविल्या नाही तर त्यांचा इतरांना त्रास होतो. त्या पासून एक प्रकारे भय तयार होते. मग मात्र  कर्मकांडातून त्यांची इच्छापूर्ती करावी लागते. स्थूल देह हा कारणदेहाचा आरसाच असतो. त्याचे वागणे, बोलणे, आचरण,कृती,मन आणि विचार म्हणजेच पर्यायाने बुद्धी या सर्वांच्या निरीक्षणातून त्याचा दर्जा सत्पुरुष्यांच्या  लक्षात येतो. देहावर अनेक गत जन्माचे संस्कारही असतात ते कृतीतून दिसतात.

संत हे वरदपिंडी असतात. म्हणजेच जन्म: त्यांना इच्छा,वासना नसतात. ते फक्त जगाच्या कल्याणासाठीच जन्म घेतात. त्याचे जीवन ‘उरलो उपकारापुरता’ याप्रमाणे जगतात. मात्र वासना हि  सामान्य मनुष्याचा पाठलाग करतात.  इच्छा त्याला सोडत नाही. एकामागोमाग सुरूच असतात.

यामुळेच कारणदेहाची मुक्ती होत नाही. कारण देहाची मुक्ती होणे फार अवघड आहे. परंतु अशक्य नाही.  संत संगतीने त्याला मुक्ती मिळू शकते.

कारणदेह हा मुक्त झालेला दिसत नसला तरी, अनुभवातून येतो.  काहीवेळा त्याचे सदृश्य अनुभव येतात.  परंतु हा देह मुक्त झाला नसला तर तो पिशाच्चं योनीत येऊन कुटूंबियांना फार त्रास देऊन आपले अस्तित्व दाखवितो.  जि सर्व मृत्यू पावतात ती सर्व जात नाही. आपण त्यांचा देह जाळला  कि तो संपला असते समजत असलो तरी तो संपत नाही. काही अतृप्त आत्मे  त्यांच्या इच्छा असतात.  त्या त्यांना बोलून दाखविता येत नाही,  त्यांची पूर्तीही झालेली नसते.  अशावेळी तो इच्छा, वासना, भावना  इतरांच्या देहात प्रवेश करून व्यक्त करतो. किंवा त्याच घरी जन्म घेऊन तो इच्छा पूर्ण करण्यातून कुटुंबियांना त्रास देऊन तृप्ती करवून घेतो.

मनुष्य मृत झाल्यावर कोठे येतो का ?  अशी शन्का व्यक्त होत असते. परंतु कधी कधी आपण पहातो. काही काही घरी कारण नसताना फार कलह असतात, ताट वाढायला घेतल्या बरोबर शुल्लक कारणावरून भांडणे, मग ताट सोडून उठणे, अन्नाची फेकाफेक होणे, अन्न तयार असून वेळेला खायला न  मिळणे अशा प्रकारे हे परिणाम घरात दिसून येतात.तसेच कुठल्याही कार्यात सफलता न प्राप्त  होणे, वारंवार अपयश, कुठल्याही प्रकारे आपत्ती येणे, मुलांची चिडचिड असते. बरीच काही अशी  नकळत कारणे घडत असते,  तेव्हा हीच वायुरूप शक्ती त्याठिकाणी अन्न वासनेने प्रगट होऊन हे प्रकार  किंवा कलह  उत्पन्न करीत असते. तेव्हा हे अतृप्त आत्मे या प्रकारे त्रास देऊ नयेत घरात शांती बनून राहावी या करीता पितृ देवतांची श्राद्धे, अक्षय तृतीयतिथी नुसार करावीत व त्यांना शांत ठेवावे, आपल्याला माहिती नसते कि कोणती आत्मा तृप्त  आणि अतृप्त असावी, तेव्हा सर्व पितृ देवतांची विधीनुसार  श्राद्धादी कृत्ये, तर्पण, काकबली वै. करून तृप्ती करणे आवश्यक आहे.

कोणतीही योनी मुक्ती शिवाय पूर्ण नष्ट होत नाही. केवळ वस्त्र बदलणे चालू असते. कारण आत्मा हा अमर आहे .देहातून मुक्त होणे अवघड असले तरी अशक्य नाही.  ती मुक्ती केवळ मानवी देहातूनच शक्य आहे.  म्हणूनच मनुष्य देह सर्वात श्रेष्ठ मानला आहे.  नराचा नारायण होण्याची संधी याच जन्मात मिळते.  म्हणून या देहाला सतत पवित्र  राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  वासनेतून मुक्ती मिळण्यासाठी अध्यात्म हाच एक मार्ग आहे. अध्यात्म हि देहाची सहज प्रवृत्ती नाही. म्हणूनत्याच्या ठायी ती सहज स्थिर होत नाही.  परंतु जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावयाचे असेल तर या अध्यात्म्याला सहज प्रवृत्तीत बदलविणे आवश्यक आहे. त्याशिवाय मुक्ती नाही.

अतृप्त आत्मे या ठिकाणी सांगायचे म्हणजे त्यांच्या त्याघरच्या व्यक्तीशी किंवा कुटुंबाशी ऋणानुबंधाचा भाग असतो असते मुळीच नाही. केवळ पूर्व जन्मी झालेल्या त्रासातुनही कुणीही कुठेही जाऊन आपली पूर्वजन्मीचे  अतृप्ती तृप्त करू इच्छीतात.

मनुष्याला कुठल्याही वासना दीर्घकाळ असणे  हा सुद्धा एक दोषच समजला जातो. त्या काही विशिष्ठ काळात संपल्याचं पाहिजे.  नाहीतर तो एक मानसिक विकार होय.निसर्ग नियमा प्रमाणे देहाला वासना असणे यातकाही गैर नाही, परंतु वयोमानापरत्वे  वासना संपली नाही तर घराण्याकडून आलेला दोष समजावा.  अशा अनेक विकृती,मनोदौर्बल्य, वेडेपणा, क्षुद्रवृत्ती,  हे याच पद्धतीचे असतात. याची कारणे सावकारी, भिक्षुकी हि असतात. या मार्गाने जर द्रव्य  मिळवून त्यातून लोकांचे शोषण झाले व दानाचा अभाव असला की त्या द्रव्यापायी असते दोष पुढील पिढीला भोगावे लागतात.

मनुष्य जीवनात आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु मृत्यु नंतर त्याची काय काय आकृती होईल हे सांगणे  कठीण आहे. तरीही तिच्या जाण्याने  मनाला वेगळीच हुरहूर लागलेली असते. या व्यक्तीपासून त्रास होऊ नये म्हणून  रामनाम घेत तिला स्मशाना पर्यंत पोचवावे लागते. स्मशानभूमी वरून आल्या नंतर स्नान करून सपिंडकांनी सुतक पाळावेच लागते.  मात्र संन्यासी पुरुषाचे सुतक  नुसत्या स्नानाने शुद्धी होते. तेरा दिवस पाळणे हि आवश्यकता नाही. कारण संन्याशी, संत हे स्वतः हुन देह सोडतात  म्हणूनच ते महानिर्वाण होत!  सर्व सामान्यांना देह सोडावाच लागतो. तो मृत्यू होय.

या दुःखमय नरदेहातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, धर्म,अध्यात्म, या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी परमार्था कडे वळण्याचे वळण इंद्रियांनां लावावे लागेल. या इंद्रियांना नामसमरणाची वळण लागले कि ती सर्व इंद्रिये आपोआपच नामसमरण करू लागतील  असते झाले की मनुष्याचे कर्मे

सुटतात.  व कर्मे सुटली की  मनुष्य मोक्षाच्या मार्गाला लागून देहातून मुक्त होतो.

मनुष्याला इंद्रिय ज्ञान जास्त आहे,  त्यामुळे त्याला इंद्रियांवर इंद्र्यांवर ताबा मिळविणे अतिशय अवघड जाते.   याशिवाय मनुष्य देहाला ज्या वासना असतात त्या सर्व काही ‘ विषयाच्याच’ असाव्या लागतात असं  नाही. याशिवाय वासना असू शकतात. देह  आहे तिथे वासना असतात. काहींना उंचच दर्जाच्या इच्छा असतात काहींना दर्शनाची, काहींना मोक्षाची,  काहींना भक्तीची यासाठीही त्यांनाजन्म घ्यावा लागतोच. अशा या इच्छा एकाजन्माने पूर्ण होत नाही. परंतु अशी एकच इच्छा, एकच घ्यास असावा लागतो. त्याचा सत्पुरुष्यांच्या रुपाने जन्म होतो.मोक्षाचा घ्यास घेणाऱ्यास कितीतरी जन्म घयावे लागतात. परंतु प्रत्येक हि जन्मात ते सातत्याने ईशवर दर्शनाची,मुक्तीची अभिलाषाच ठेवतात.

त्यासाठीच प्रयत्नशील असतात.   मग त्यांच्या ठायी तेजोवलय निर्माण होतात. त्याचे ते कित्येक जन्माचे फळ असते. ज्या घराण्यात ते जन्मघेतात  त्याचेही  अनेक पिढ्यांची पुण्याई असते. अनेक जन्माच्या पुण्याईने,सत्कर्माने घरात सत्पुरुष जन्माला येतात. याच प्रमाणे सामान्य पुरुष्याचे सत्पुरुषाची धरलेली कास जर मृत्यूने सुटली  तर पुढे कोणताही जन्म मिळाला तरी ते त्याच सत्पुरुष्याच्या श्वासात पुन्हा येतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
4




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu