There is a growing trend in the West to seek alternative, complementary and traditional healing not only as a reaction to Western biomedicine but also to the mindset of “talking heads” in psychotherapy. Traditional healing aims to restore harmony and balance within the individual through a symbiosis of the body, mind and spirit. Through this process traditional healing offers a holistic conceptualization of wellness and wellbeing, both within the individual, and between the individual and his or her environment.
For more information kindly read below article.
मन हे पारंपारिक असते पूर्व कर्माचे निरनिराळे विषय माणसाच्या मनात येतात व त्यानुसार तो पावले टाकीत कर्म करतो. उदा- बऱ्याच वेळा मनुष्याच्या मनात दानधर्म करण्याची कर्तव्य भावना नसून देखील तो दान करतो. तेव्हा अशावेळी त्याला पूर्व कर्मातुन पापपुण्याचे स्मरण होत असते. त्यामुळे तो अशांत व भयभीत होतो त्या भयापोटी तो दान करतो. मनुष्य हा पाप करताना विचार करीत नाही.
मग मात्र रडत बसतो. रडून देहाला क्लेश होतो.तेव्हा असे क्लेश देत बसण्यापेक्षा आनंदाने कसे राहता येईल याचा विचार करावा. कधी तरी दुःख भोगून झाल्यावर आनंदाचे क्षण येतात तरी आंनद भोगायचे सोडून गेलेल्या दुःखाला उगाळत बसून डोळ्यात अश्रू आणतात तेव्हाही मनाला क्लेश होतोच. तेव्हा मिळालेल्या आनंदाच्या क्षणाचा उपभोग घेऊन सुखावण्याचा प्रयत्न करावा. जे अध्यात्मची उंच पायरी गाठतात,त्यांना दुःख कधीच होत नाही. ते सदैव शांत असतात.
मनावर अनेक गत संस्कार असतात. जेव्हा आपण निद्राधीन होतो. तेव्हा ते गतजन्माचे संस्कार दृश्यमान होतात. याला आपण स्वप्न म्हणतो. स्वप्न पडणे हाही मनाचा दोष आहे. जेव्हा स्वप्नातील गोष्टी मनुस्मृतीवर अंकित होतात व झोपेतून जागे झाल्यावरही स्वप्नांचा विसर पडत नाही तेव्हा मनात दोष उत्पन्न झाला हे स्पष्ट आहे. यावरून मनाची स्थिती ओळखता येते. मनाची स्थिती उंचच असेल तर शुभदायी स्वप्ने पडतात व खालावली असेल तर वाईट व भीतीदायक स्वप्ने पडतात. स्वप्नांना सत्य मानून त्यांना जीवनाचे मार्गदर्शक समजू नये. स्वप्न दोष घालवण्यासाठी चिंतन करावे. त्याने मनशुद्ध होते.
विसर पडणे मनुष्य स्वभाव आहे परंतु त्याला सर्वच विसर पडले तर मग संपलेच. विसरणे हा पशूंचा स्वभाव आहे पशूला आपला पुत्र,संतती यांचा विसर जन्मदिल्यां नंतर काही काळातच होतो. कारण तेथे सूक्ष्म मनाचं अभाव आहे. मनाचा स्वभाव हा चंचल असतो. म्हणून भगवंताने मनाला
बऱ्यापैकी बांधून ठेवलेले आहे. नाही तर त्याचा वेग वायुपेक्षाही अधिक आहे. मनाचा स्वभाव अतिशय चंचल उच्शृंखल व हट्टी असल्यामुळे त्याचा निग्रह वायूप्रमाणं अत्यन्त दुष्कर आहे. त्यामुळे त्याला ताब्यात ठेवणे, किंवा वळविणे या दोन्ही गोष्टींअवघड आहे. याला ताब्यात घेण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी विषय भोगाची आसक्ती सोडली पाहिजे. मोठमोठे ऋषीमुनी, संत,सत्पुरुष ज्यांचे अंतःकरण शुद्ध आहे ज्यांची बुद्धी नियंत्रित आहे,ज्यांची पापकर्मे नाहीशी झाली आहेत, असे कामक्रोध रहित सत्पुरुष मनावर नियंत्रण ठेवू शकतात. परंतु मनुष्य नियंत्रणाचा वेग कमी करू शकतो. त्याला विकाराच्या विरुद्ध दिशेला आणून विकासाला लवणे शक्य करू शकतो.
मनुष्याचे शरीर थकले तरी मन थकत नाही म्हणून तो मीळविणे थांबविता नाही. त्याचे मन तृप्त होत नाही. मिविण्या बाबत मनुष्याचे मन थकणेहा दुर्गुण असतो. अवघड आहे. कारण त्याच्या मुळाशी
हव्यास हा दुर्गुण असतो. तो हव्यास त्याला थांबू देत नाही. मनुष्याचे जीवन हे कर्ममय आहेच परंतु त्याला काय कर्म करावे व काय करू नये त्याला कळत नाही. तो कर्क करतो व त्यातच लिप्त होतो.
जो पर्यंत तो अलिप्त होत नाही तोपर्यंत त्याच्या मनाची विरक्ती होत नाही. कारण देहाला व मनाला कर्माची इतकी सवय झाली असते. त्यासवयीने कर्मे होतच राहतात. परंतु देह हा थकतो तेव्हाच ते कर्म थांबतात.
यासाठी मनुष्याला त्याच्या जीवनाचे नियोजन करता आले पाहिजे. मिळविण्याचे काम हे कुणासाठी, कशासाठी, व किती याची मर्यादा ठरविता आली पाहिजे.याच बरोबर आपल्यासोबत काय येणार आहे याचा विचार करता आला पाहिजे, या विचाराची सवय लागली पाहिजे. याला कुठेतरी थांबता येईल,स्थिर होता येईल. मनाला विरक्ती,अथवा निवृत्ती हि संसाराचा त्याग करून,किंवा समन्यास घेऊन मुळीच येणार नाही. त्यासाठी तपश्चर्या करावी लागते,मनाला थकवावे लागते. मन थकल्यावरच वैराग्य येते.त्यांनतर स्थिरता येते असे ते सूत्र आहे. एकदा मनाने विरक्तीचा निश्चय केला त्याचा दृष्टीने विचारांची वाटचाल, स्वतःच्या मनाला भोगापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, व त्याचाच ध्यास घेतला कि आपोआप तश्या विचारांची वलये आपल्याभोवती निर्माण होतात. असे झाले किंग योग्यवेळी योग्यठिकाणी थांबायला शक्य असते. आपल्या ठिकाणी असलेली ईशव्रीय शक्ती जागृत असली कि आपला निर्णय कधीच चुकत नाही.
निश्चय हा मनाने स्वीकारला म्हणजे तो पूर्णत्वाला जातो. कुठल्याही गोष्टीचा ध्यास लागला कि निश्चय पक्का असतो. ( त्यासाठी कधीही चांगल्या गोष्टीचा ध्यास असावा. ) मन केंद्रित झाले पाहिजे. सामान्य मनुष्याचे मन हे वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रित होत असते. त्या मनाला एकाच ठिकाणी केंद्रित करणे अवघड असते. त्यामानाने अंधांची मने लवकरच केंद्रित होतात. कारण सर्वात जास्त ज्ञान हे डोळे मनाला पुरवीत असतात. म्हणून मन चंचल असल्यास हे डोळ्यांच्या हालचाली वरून लक्षात येत असते. मनाचा स्वभाव हा पाण्यासारखा असतो. त्यात सारखे तरंग उठत असतात. पाण्याला जसा स्वतःचा रंग नसतो, आकार नसतो त्याच प्रमाणे मनाला स्वतःच रंग, आकार नसतो. म्हणून मन ज्या विकारांकडे वळविले त्याचे स्वरूप त्याला प्राप्त होत असते. मनाला दुःखाचे प्रसंगाचे स्मरन झाले कि ते दुखी होते. व सुखाचे स्मरण झाले कि ते आनंदित होते,व सुखावते. म्हणून मनाला दुःखानं पासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर ते विकलांग होईल. कारण ते आधी मनाला क्लेश होतात, नंतर त्याचे पडसाद देहावर उमटतात. म्हणून देहाला सुरळीत ठेवायचे असेल तर आधी मनाला सावध करावे
संत रामदास स्वामींच्या श्लोकातून हे सर्व गुण घराघरांत मुलांद्वारे म्हणत असत व त्यांचे संस्कारही मनावर उमटत परंतु आज हे सर्व संपून घराघरातील त्याची जागा आजच्या चित्रपटांनी व वेड्यावाकड्या संगीताने घेतली आहे व मनाचा संस्कार लोप पावला आहे आणि हेच मनुष्याच्या मन:शांतीच्या समाप्तीचे मूळ कारण आहे. मनाचे श्लोक, स्तोत्रे ,स्तुती, हरिपाठ याचे पठण कानाला ऐकू येईल इतक्या मोठ्या स्वरात करावे म्हणजे मनावर त्याचा परिणाम होऊन मन एकाग्र, व शांत होण्यास त्याची मदत होते.
मनुष्याच्या मनावर अनुवंशिकतेचा परिणाम होतो. मानवी मन हे अतिशय जुने असते. त्याच्या गत जन्माचे संस्कार असतात. त्यात अनुवंशिकता हि संक्रमीत झालेली असते.मनाचे गुण हे अनुवंशिक असतात. माणसाच्या मनात जे सद्भाव येतात ते अनुवंशिक विचरातून येतात. हे विचार पहिल्या पिढीतून रक्तातून संक्रमीत दुसर्यापिढीत येतात.यालाच आपण अनुवंशिकता म्हणतो. कधी कधी मनुष्य एकाच ण पटणाऱ्या गोष्टीचे सारखे मनन करतो, तेव्हा ती अनुवंशिवकताच असते त्यात त्याव्यक्तीचा काहीच दोष नसतो. त्यामुळे मन अशांत होते. बऱ्याच वेळी अनुवंशिकतेने जास्तीत जास्त दुर्गुणही गुण येतात हे दुर्गुण मधून मधून मनाचे प्रवृत्तीनुसार बाहेर डोकावतात. त्यामुळे अशा व्यक्तीला स्थैर्य प्राप्त होत नाही..त्यात सुख कशाला व दुःख कशाला म्हणावे हेही वेड्या मनाला समजत नाही. तेव्हा त्याच्या मनासारख्या झालेतर तो आंनद मानतो व मनाविरुद्ध झालेतर दुःख करतो. तो कायम गोंधळलेल्या मनस्थितीत असतो. या सर्व गोष्टी शिक्षणाद्वारे समजू शकत नाही. कुठेतरी अपुरे पण असल्याकारणाने विचारांची प्रगल्भता आलेली नसते. कुटुंबात त्याचे विचार जुळत नसतात. त्यामुळे त्याला मनाची निर्मळता सांभाळता येणे कठीण होत जाते. मनात कुटुंबातील इतरांशी जुळते भाव येत नसल्याने तो एकटा पडतो. कारण मनुष्य भावनेवर जगतो. त्याला भावनाच आली नाही तर त्याला आशा कसली तो जगणार कसा, कारण भावनेतून त्याला चैतन्य येते आणि
आशेतून जगण्याची उर्मी येते हेच संपले तर मनुष्यच संपला. चैतन्य आणि आशा या दोन गोष्टी मनाला पोषक असंतात त्यातूनच जगण्याची आस, इच्छा वाढते. अश्या प्रकारच्या व्यक्तीला जपणे कुटुंबियांना फार अवघड जाते. त्यासाठी हि अनुवंशिकता घालविण्यासाठी भगवंताला अंतःकरणातून प्रार्थना करावी लागते, तेव्हा अनुवंशकतेचे दुर्गुण हे दोष निघून जातात.
आपल्या राशी ग्रह नक्षत्रांचा आपल्यावर परिणाम होतो. मनाची अवस्था हि जन्म कुंडलीवरूनही सांगता येते. हे एक शास्त्र आहे. परंतु आपण सामान्यांनी याच्या खोलात शिरू नये. जन्मराशीचे काही विशिष्ठ पद्धतीचे खडे येतात ते ग्रह दोषाणपुरते वापरल्यास मनाचे दोष कमी होतात. चंद्राचा मानवीमनावर परिणाम होतो. चंद्र हा स्त्री स्वभावाचा ग्रह आहे मुळातच चंचल असून मनाचा कारक आहे. या चंद्रा पासून मनाचा विकास होतो. आणि मनाला विकारही उत्पन्न होतात. कुंडलीतील चंद्राला या दृष्टिकोनातून फार महत्व आहे. वेड्या व्यक्तीवर चंद्राचा परिणाम होतो पौर्णिमा जवळ येत असता व पौर्णिमेला त्यांची स्थिती अधिक भयावह होत असते. हे निश्चित आहे.
मनुष्याचे मन वातावरणावरून भारावून जाते, आनंदी वातावरणात मन आनंदित होते व दुखी वातावरणात गेल्यास मन दुखी होते. वास्तविक सुख -दुःख का व कशासाठी, आणि कुणासाठी हे काहीच कळत नाही. पण मनुष्य भारावलेला असतो. तसाच तो परिस्थितीनेही भरवतो. उदा:- एखाद्या ठिकाणी तो गेला व तेथे काही वाद्य वाजत असतील तर त्यातले त्याला काही कळों अथवा न कळों त्याची मन, मन डोलू लागतो.तसेच ईशवराच्या दर्शनाने मन भारावतें. तसेच प्रार्थना, मंदिरातील घण्टा नादाने मनस्थिती भारावून जाते. पाण्याला उसळी मारायला वाऱ्याचा वेग लागतो त्याचं प्रमाणे मनाचे तसेच आहे, मनाचीस्थिती भारावल्याशिवाय भावना येत नाही. परमेश्व्रावरील प्रेम वाटण्यासाठी भावना येणे आवश्यक आहे.