पती-पत्नी दोघांनी सदैव एकमेकांच्या भावना, विचारवस्व तंत्र अस्तित्वाचे भानठेवून परस्परांशी प्रेमाने वागावे.
सुख-दुःखांनी तुमचा ताबा घेण्यापेक्षा, त्यांच्या अधीन राहण्यापेक्षा, तुम्हीच त्यांचे स्वामी बना.
त्या त्या प्रसंगी जे काही चांगले घेण्या सारखे असेल ते ते स्वीकारून आपले जीवन सतत रसपूर्ण होईल याची काळजी घ्या. जीवनाला उन्नत करून घेणे. जीवनाची पातळी उंचावणे. हेचखरे मनुष्याचे कर्तव्य कर्म आहे.
आमचे भाग्यच वाईट असे म्हणत आमच्यावर संकटे आली. आम्हाला संकटे सहन करावी लागतात असे म्हणणे योग्य नाही. हे तर आपणच आपल्या गैर वर्तणुकीद्वारे आपल्या जवळ बोलवून घेत असतो. परंतु या मागे देवाचा मोठा उद्देश असतो. आपले विचार सुधारावेत, आपली प्रतिभा उजळून यावी म्हणून तो हे दुर्दैव आपल्याकडे मुद्दाम पाठवीत असतो हे लक्षात घ्यावे.
साधू संतांचे गुण कोणते ? धन आपल्या जवळ असेल तर दान करणे. आपल्याला कष्ट होत असतील तर धैर्य बाळगून सहन करणे, मूर्खाशी संबंध आला तर त्यांची उपेक्षा करणे
चांगले मोठे काम करीत असताना निरमिषाची वृत्ती ठेवणे. माणूस उच्चं व्हायला हेच गुण कामी येतात.
आपले आयुष्य कितीही मोठे असो, पण वेळेचा अपव्यय करणाऱ्यासाठी ते सुद्धा पुरुशकत नाही.
ते त्यांना लहान पडते, वेळेचा जे दुरुपयोग करतात त्यांना हा काळच नष्ट करून टाकतो.
कुठलासंप्रदाय, कुठलाप्रदेश, कुठलाधर्म, कुठलीजात, कोणती भाषा अश्यायासी मेमध्ये स्वतः; बांधून घ्येऊ नका. आपल्या आत्म्या सारखे सर्वच आत्मे आहेत. तो एकच परमेशवर आपल्या अंशाने सर्वच प्राणीमात्रांच्या ठिकाणी वावरतो आहे याचा अनुभव घ्या . विश्व्नागरिक म्हणून मिरवा. जे उचित असेल, योग्य असेल त्याचेच समर्थनकरा. त्याचा पुरस्कार करा.