स्वतंत्र भारतातील तरुणांची कर्तव्य !




Like
Like Love Haha Wow Sad Angry
5

Young people possess energy, but it should be channelized in the right direction. Misguided youth may do greater harm to the society than even the worst enemy can do. Moreover, it is on the shoulders of the young that the future of the country rests because they represent new values, new thinking and the new ways of life.

For more information kindly read below articles.

shutterstock_105548261

स्वतंत्र्य भारतातील तरुणांनी राष्ट्रधर्म पाळला पाहिजे, मानवतेशी नाते जोडले पाहिजे. सुराज्य अवतरण्यासाठी तरुणांनी समाजसेवेचा वसा घेतला पाहिजे. –  तंत्रज्ञानं, संशोधन, संरक्षणदल, व्यसननिर्मूलन इत्यादी क्षेत्रात कार्यरत असले पाहिजे. – राष्ट्रीय कर्तव्याचे पालन केले पाहिजे.-

तरुण  नेहमी आत्मसंतुष्ट असावा.

वाऱ्याचा वेग,सूर्याचा तेज, प्रपाताची आत्मvमर्पणवृत्ती, विदुल्लतेची चंचलता  यांचा समन्व्य म्हणजेच  तारुण्य ! तारुण्याची एक व्याख्या म्हणजे तेज,तप आणि तत्परता ज्याचे ठिकाणी वास करतात असे व्यक्तिमत्व असणे म्हणजे तारुण्य ! या प्रमाणे केली  आहे. तारुण्य कधी ज्ञानेश्वरांच्या, शिवाजीच्या रूपात, तर कधी विवेकांनदच्या रूपात बघण्यात येते.

आजची तरुण पिढी असंतुष्ट आहे, त्यामुळे ती विद्धवंसक कार्य करते, असे आरोप नेहमीच त्यांच्या वर केले जाते. परंतु आत्मसंतुष्टता हे तारुण्याचे लक्षण नाहीच. ते  वार्धक्याचे लक्षण आहे. तरुण हा नेहमीच असंतुष्ट असतो , नव्हे तसाच तो असला पाहिजे. अध्यात्म्याला संस्कृत भाषेत भिंतीत कोंडून ठेवणार्या विरुद्ध संत ज्ञानेश्वरांनीं बंड केले. या असंतोषातूनच अमृतातेही पैजा जिंकणारी ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या घराघराचे वैभव बनली. तसेच तारुण्यात थोरल्या माधवराव पेशव्यांनी स्वराज्याचा  ढासळता डोलारा सांभाळला, आणि मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, कान्हेरे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि वीर सावरकर यां सारख्या कित्येक देश भक्ततांनी तारुण्यातच स्वातंत्र्याच्या वेदीवर आत्मबलिदान केलेत.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देखील भारतीय जनता अज्ञान, दारिद्र्य, बेकारी यांच्या गर्तेतच राहिली. जाती, धर्म, भाषा, प्रांत यांच्यातीळ भेद वाढतच गेले. म्हणून भारत एकसंघ राष्ट्राच्या पदास अजूनही पूर्णपणे पोचलेला नाही. आपमतलबी, भ्रष्टाचारी अशा राजकारणीय व्यक्तींनी तरुणपिढीच्या आवेशाचा फायदा घेऊन आपला डाव साधला, व वरून आजचा तरुण विद्धवंसक आहे असा शिक्का त्याच्यावर मारला. शक्य तितका त्यांच्या दरिद्रीचा त्यांच्या पैशाच्या कमजोरीचा,त्याच्या बेरोजगारीचा  या प्रमाणे फायदा घेऊन आपली पैशाची कोठारे भरण्यासाठी तरुणांचाच उपयोग करतात, नाही तर त्यांच्या एकट्याची काय मजल आहे. प्रत्येक नेता पैशाच्या जोरावर तरुण कार्यकर्ते यांचा जमाव करून त्यांना लालच दाखवून निरनिराळ्या व्यसनाच्या आहारी घालतात, तेवढ्या पुरते तरुणांनाही बरे वाटते.

परंतु तरुण हा विचार कधीच करीत नाही कि यात आमचा कोणता फायदा आहे. आपण तर बुडणार हे त्यांच्या लक्षात येत नाही. हे कोठार भरणारे कधीच आपल्या कार्यकर्त्यांच्या भविष्याचा विचार कधीच करीत नाही. त्यांचे कार्य आटोपले कि ते त्यांना मदत, सहकार्य तर सोडाच परुंतु साधी ओळखही दाखवत नाहीत.  तेव्हा तरुणांच्या जोशाने, शक्तीने त्याचे कार्य सफल झाले हे ते विसरून जातात.

तरुणांनी या देशविघातक नेत्यांपासून कोसो दूर राहिले पाहिजे. त्याच्या कार्यावर आपली शक्ती, युक्ती का म्हणून घालवावी. स्वतंत्र्य भारतातील तरुणांनीं एकच धर्म मानला पाहिजे, तो म्हणजे राष्ट्रधर्म, आणि नाते एकच जोपासले पाहिजे ते म्हणजे मानवता, व बंधुता !

आज देशाला राजकारणा पेक्षा  समाज कारणांची जास्त गरज  आहे. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी तरुणांनी समाज सेवेचा वसा घ्यावा. सेवाभाव प्रगट करावयाचा असेल तर भ्रष्टाचारी नेत्यांचा करण्या पेक्षा अज्ञानी, दरिद्री,मतिमंद, रुग्ण, आदिवासी  आणि दुरबल घटकांची सेवा करावी.

अंधश्रद्धा यांचा समूळ नायनाट करण्यासाठी झटावे. देशाची प्रगती साधण्यासाठी स्त्री भ्रूणहत्या, स्त्री संरक्षण, स्त्रीमुक्ती, खोटे संत बलात्कारी बाबांच्या नायनाट व्हावा यांसाठी चळवळी राबवाव्या.  या क्षेत्रात पथदर्शक असणाऱ्या ताराबाई मोडक, सिंधुताई सपकाळ, बाबा आमटे हि मोठमोठी व्यक्ती

यांचे  कार्य डोळ्यासमोर आणून सेवाभाव ठेवावा.

भारताचे अर्थकारण सुरळीत होण्यासाठी तरुणांनी स्वतःचे लघु उद्योग सुरु करावे,  विविध व्यवसायिक क्षेत्रात आधुनिक उपकरणाचा, साधनांचा, तंत्रज्ञानाचा वापर करून आपली आणि तसेच बेरोजगारांची आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल याचा विचार करावा. तसेच अल्पबचतीच्या योजना मध्ये सहभागी होऊन तरुणांच्या आर्थिक समस्यां सोडविणे सुलभ होऊ शकते. कारण आजच्या या वेळी प्रत्येकाला रोजगाराची गरज आहे.  कुठेही कार्यरत राहिल्याने तरुणांची उन्नती होईल व त्याचे लक्ष दुसर्या फाजील कार्याकडे जाणार ही नाही. प्रत्येकाची प्रगती हि देशाची आजची गरज आहे.

या प्रगती बरोबरच अनेक नवनवीन समस्यां देशात निर्माण होत आहे. वायू,जल,प्रदूषण, जँगलतोड, प्राण्यांची बेसुमार शिकार, या मुले वातावरणाचा व निसर्गाचा समतोल बिघडत आहे. रोगराई, दुष्काळ यांसारखी आपत्ती येतात. हेटाळण्याच्या दृष्टीने तरुणांनी पावले उचलली पाहिजे.

शेजारी देशांकडून भारताचे लचके तोडण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. आपल्या सरहद्दीच्या संरक्षण प्राणपणाने करणे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे.यासाठी जास्तीतजास्त तरुणांनी बलोपासना करून भारतीय संरक्षण दल, भारतीय पोलीस दल या संघटनांमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. देशाला खिळखिळा करण्यास मदत करणारा आणखी एक शत्रू म्हणजे अमली पदार्थाचे व्यसन या पासून तरुणांनी  किंवा सर्वांनीच दूर राहिले पाहिजे.

आता घटनांनी १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मतदानाचा हक्क देऊन तुम्हाला तुमचे कर्तव्य व त्याची समज ठेवूनच कोणतेही कार्य करण्यास सहकार्य केलेले आहे.

राजकीय सत्ता सतत बदलत असतात. पण या राष्ट्रीय कर्तव्याबाबत कोणाचे दुमत नसते. त्यात तुम्ही स्वतःचे मत कुणास द्यायचे याची जाणीव पूर्वक योजना ठेवूनच मांडायचे असते. आणि वादातीत कर्तव्य आजचे स्वतंत्र  भारतातील तरुण काटेकोर बजावतील तरच राष्ट्रपुरुषाचा रथ वेगाने व अभिमानाने  प्रगती पथावर घावेल. त्यातच तुमचे भाग्य आहे.

सुजलाम, सुफलाम, आमची भारत माता असेल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
5







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा