आनंदाचा शोध
Like
Like Love Haha Wow Sad Angry
14

Many of us reach a point when our lives become routine, dull, and thankless. We lose our sense of meaning and direction. There seems to be a lack of purpose and feelings of hopelessness permeate our very being. We do reach a time when we are tired of being emotionally constipated and seek out ways to break this numbing cycle. The time has come to venture into something new.

For more information kindly read following article

shutterstock_7756789

जगण्यात मौज आहे त्यात आनंदाचा  शोध घ्या !

आनंद आपल्या सभोवताल आहे.

छन्द हे आनंद मिळविण्याचे साधन .

आनंद परस्परात वाटलं पाहिजे म्हणजे तो द्विगुणित होतो.

निसर्ग हे आनंदाचे मूर्तिमंत प्रतीक.

आनंद  आपल्यात ओतप्रोत भरलेला आहे.

कवी म्हणतात –  ” आनंदी आनंद गडे , इकडे तिकडे चोहीकडे  “सर्वच जण सुख आणि आनंद शोधण्यासाठी धडपडत असतात. ‘ आपण सुखी व्हावे’ हि प्रत्येकाचीच  इछा असते. सुख मिळाले कि आंनद होतो अर्थात सुखाची कल्पना व्यक्तिगणिक  बदलते. हा भाग वेगळा.

आनंद हि काही मूर्त वस्तू नाही. बाजारात पैसे देऊन ती विकत मिळत नाही. किंवा कुणाकडे मागुनही मिळत नाही. एखादा चिंताग्रस्त, दुर्मुखलेला मनुष्य जर म्हणेल  कि ” काय  करणार ? ” माझ्या नशिबातच आनंद नाही ” तर ती चूक नशिबाची नसून त्याचीच असते. आनंद हा मानून घेण्यावर असतो. आनंद आपल्या सभोवार पसरलेला असतो. घरात नुकतेच बोलता येऊ लागलेले बाळ त्याचे बोलणे ऐकल्याने, त्याच्या सोबत बोलण्याने, शाळेतून घरी आलेल्या आपल्या मुलं कडून शाळेत झालेल्या गमती -जमती ऐकल्याने, खूप दिवसांनी मिळालेल्या मित्र – मंडळी सोबत बोलल्याने, चांगले काम केल्यास मोठ्या कडून शाब्बासकी मिळाल्याने, आपल्याच घरात मिळणारे आनंदाचे क्षण आहेत.

प्रत्येक मनुष्य आपापल्यापरीने आनंदाचा शोध घेत असतोच.  छन्द हे आनंद मिळविण्याचे एक साधन आहे. हे छन्द बऱ्याच प्रकारचे असू शकतात.  कुणाला तिकिटे जमविण्याचे,  कुणाला चित्रे जमविण्याचे, कुणाला कचऱ्यातील काही वस्तू गोळा करण्याचे, त्या वस्तूतूनच काहीं नविन तयार  करण्याचा, कुणाला पेपरातील कात्रण काढून ठेवण्याचा असे कित्येक छन्द असतात.  परंतु कुठलाही छन्द आनंद देण्यास  सारखाच समर्थ असतो.  कुणी दुःखितांची सेवा करून तर कुणी विद्या दान करून  आनंद मिळवितात. कलाकाराला आपल्या कलासाधनेतून अलौकिक आनंद मिळतो. ध्येय प्राप्तीमुळे तसेच कर्तव्यपुर्तीतूनही आनंद मिळतो. आपला मुलगा यशाच्या शिखरावर पोचलेला बधून आईला मिळणार आनंद केवळ आवर्तनीय असतो.

आनंद हा ज्ञानाप्रमाणे देण्याने वाढतो.  दुसऱयांला आपल्या आनंदात सहभागी करून घेतल्यास  तो द्विगुणित होतो.  घरी आलेला एखादा आनंदी व खेळकर पाहुणा संपूर्ण घर कसे प्रसन्नतेने भरून टाकतो. त्यामुळे त्या घरची मंडळी त्याला भरपूर आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतात.  यावरून इतके लक्षात येते कि आनंद दिल्याने त्याही पेक्षा जास्त पटीने परत मिळतो. एखादी सुंदर वस्तू खरेदी केलीद असेल तर ती दुसऱ्याला दाखविल्याशिवाय चैन पडत नाही. आनंद भोगायलाही कुणाची तरी सोबत हवी असते. त्यामुळेच हवेतील राहणाऱ्या सर्व सुखात लोळणार्या श्रीमंतांपेक्षा सडकेवर भटकणारा कलंदर मनुष्य जास्त सुखी व आनंदी असू शकतो.

निसर्ग हे आनंदाचे मूर्तिमंत प्रतीक आहे.  निसर्ग हा कधीच दुखी नसतो,  सकाळ होताच टवटवीत होऊन वाऱ्यासोबत डोलणारी झाडे, किलबिल करणारे व मोहक हालचाली करणारे पक्षी, फुलांमध्ये बागडणारी फुलपाखरे, खळखळाट करत धावणारी नदी, मोठं मोठ्या पहाडांवरून संथ उतरणारे झरे, हि निसर्गाची निरनिराळी रूपे आपला आनंद उधळत असतात. ते हेच सांगतात ” आम्ही आनंदी आहोत तुम्ही आनंदी व्हा ” असाच संदेश जणूकाही  ते आपल्याला देत  असतात.

आनंदाची अनेकविध रूपे आपल्याला ठायी ठायी दिसत असतात. अशा परिस्थितीत दुखी राहणे म्हणजे पाण्यात राहून कोरडेच राहणे नव्हे काय ?  ज्या प्रमाणे काविळ  झालेल्या मनुष्याला सारे जग पिवळे दिसत असते.  त्याच प्रमाणे दुखी मनुष्याला सारी कडे दुःखच भरलेले दिसत असते. म्हणून आनंदी होण्याचं अनेक उत्तम उपाय म्हणजे स्वतःच्या दुःखाचा विचार सोडून दुसर्याच्या दुःखाचा विचार करणे  व ते कमी करण्याचा प्रयत्न करणे. अशा प्रकारे आनंदाचा उगमस्थान हे म्हणजे मन च आहे.  म्हणून आनंद मिळविण्यासाठी इकडे तिकडे न भटकता स्वतःच्या मनाशी त्याचा शोध घेतला पाहिजे – म्हणून कवी बोरकर म्हणतात”  अमृत घेत भरले तुझया घरी का वणवण फिरशी बाजारी ”

हि सृष्टीचं मुळात आनंदातून निर्माण झालेली आहे. आणि तिचा विलय सुद्धा आनंदात आहे. असे उपनिषदात म्हटले आहे. मानव हाच आनंदस्वरूप  आहे.  म्हणून तुकोबाराया म्हणतात.

” आनंदाचे डोही | आनंद तरंग | आनंदची अंग | आनंदाचे ||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
14  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu