Childhood is the age span ranging from birth to adolescence. According to Piaget’s theory of cognitive development, childhood consists of two stages: preoperational stage and concrete operational stage. In developmental psychology, childhood is divided up into the developmental stages of toddlerhood (learning to walk), early childhood (play age), middle childhood (school age), and adolescence (puberty through post-puberty). Various childhood factors could affect a person’s attitude formation.
For more information kindly read below articles.
पूर्वी पेक्षा आजच्या पिढीला बऱ्याच काही सुखसोयी प्राप्त झाल्या आहेत ज्या पूर्वी प्राप्त होत नसत.
सुंदर सुंदर चित्रपट, शाळेतील सहल, दूरदर्शन वरील मौज, जे आवश्यक आहे ते आणि विनाकारण आहे त सुद्धा मिळत आहे. पूर्वी ज्या विषयांची भीती वाटायची त्या विषयांची समजूत, सुधारलेल्या शिक्षण पद्धतीमुळे , तसेच खेळावयास क्रीडांगणे, त्यांसाठी ठिकठिकानि उदयाने, अनेक दृष्टीने आजची लहान मुले पूर्वीच्या मुलांपेक्षा अधिक भाग्याची ठरतात. परंतु या मुलांना आजीचं प्रेम कस असत याची कल्पना नाही. आजीच्या चौघडीची उब ह्यांना कधी मिळालेली नाही.पूर्वीच्या लहानपणातलं, तारुण्यातलं अवर्णनीय संगीत आणि वैभवशाली नाट्य ज्या प्रमाणे काळाच्या पडद्या आड कायमच गेलं आहे. त्याच प्रमाणे आजीचे लाड, आजीचा खाऊ, तिची कूस, तिची भजन ,तिच्या गोष्टी आता दुर्मिळ झाल्या आहे.
” आजी ” नावाची संस्था आता नामशेष झाल्यात आहे. लहान मुलांची मन अधिकाधिक संस्कारी करण्याच्या अनेक निमसंस्कारी खटपटी चालवलेल्या बघत आहोत, तेव्हा मनात येत कि खरंच आजीच्या मायेच्या काव्यमय संस्काराला हि आजची अभागी मुलं मुकली आहेत कि काय ?
याची हळहळ वाटते आहे.