नको ती दुःख स्वप्ने
Like
Like Love Haha Wow Sad Angry
11

A sad dream can make you feel out of sorts all through the following day, but it may be Nature’s way of helping you to cope with stress. here we are giving tips to avoid Sad dreams. Read this article to avoid Sad dreams.

Sad Dreams

प्रत्येकाला स्वप्न हि पडतात. अमेरिकेतील असोशिएशन फॉर द स्टडी ऑफ ड्रीम्स मधील तज्ज्ञाच्या मते ५ ते १० टक्के वयस्क लोक महिन्यातून एक किंवा अधिक वेळा स्वप्नांचा अनुभव घेतात. वाईट स्वप्नानं मनोदशा बिघडते. सतत वाईट स्वप्न पडण्यामागे तणाव वाढतो. गर्भवस्थामध्ये वाईट स्वप्न पडणे म्हणजे पुढे त्या मुलांना झोपेत चालणे किंवा बिछाना ओला करणे हे त्रास होऊ शकतात. म्हणून याकडे दुर्लक्ष करू नये, याकरिता गर्भावस्थेत भीतीदायक स्वप्ने पडत असतील तर झोपण्यापूर्वी तणावमुक्त होणे गरजेचे आहे. झोपताना मन शांत व स्थिर असेल तर हा त्रास होणार नाही, यासाठी शक्यतो थोडे ध्यान लावणे, गरम पाण्याने स्नान करणे, छानसे संगीत ऐकणे, भक्तीगीत ऐकणे हे उपाय करता येतील. झोपण्यापूर्वी भीतीदायक मालिका, चित्रपट बघू नये. तसेच हिंसक व्हिडीओ बघू नये. यामुळे स्ट्रेस लेव्हल वाढते व याचा झोपेवर स्पष्ट परिणाम दिसून येतो. तसेच रात्रीच्या आहाराचा सुद्धा स्वप्नांवर परिणाम पडतो. पचनास जड आणि तेलकट पदार्थ सेवन केल्यास झोप अस्थिर लागून वाईट स्वप्नांची मालिका सुरु राहते. या मुले शरीरात कोर्टजेल नामक स्ट्रेस हार्मोन्स चा स्तर वाढतो. त्यामुळे रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो व वाईट स्वप्ने त्रास देतात. रात्रीच्या जेवणा नंतर लगेच झोपू नये. त्याकरिता शक्यतोवर हलका आहार किंवा दूध घेऊन झोपावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
11
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu