मैत्री हि सकारात्मक हवी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Are YOU in a toxic friendship? Your friend is ruining your life and it’s time to cut them out. Whilst most of our friends are there for us through thick and thin and can always be relied on for a good time, we’ve all encountered the toxic friend. Friend is a person who stay with you in your difficult time. if your friendship stress you that mean it may Toxic to you. read this article on Friendship.

Toxic Friendship

संशोधकांनी  नुकत्याच काढलेल्या  एका निष्कर्षाला नुसार मैत्री हि ‘टॉक्सिक’  असते आणि तिच्या या घातक गुणधर्मा मुळे कॅन्सर पासून हृदय विकारापर्यंत  अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.  युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया त झालेल्या एका अभ्यासात  हि बाब समोर आलेली आहे. या अभ्यासानुसार सामाजिक नकारात्मक संभाषण शरीरातली जळजळ  वाढविण्यास कारणीभूत ठरते.  आणि याचा परिणाम म्हणजे पुढे शरीरावर ते परिणाम दिसू लागतात.  नकारात्मक विचारांच्या मैत्रीमुळे  निर्माण होणाऱ्या या जळजळीत परिणाम कालांतरानं नैराश्य आणि  कॅन्सर सारख्या रोगांत परिवर्तन होण्यात होतो.  या अभ्यास गटात सहभागी असणाऱ्या न्यूरोसायन्टीस्टं शेली यांच्या मते या अभ्यासातून आशावादासारखी मानसिक स्थिती आणि सामाजिक  संबंधातून निर्माण होणाऱ्या स्पर्धात्मक भावनेचा त्वचेखाली कसा परिणाम होतो हे जाणण्याचा उद्देश होता.  या अभ्यासासाठी १२२ तरुण  आणि निरोगी व्यक्तींना आठ दिवसांसाठी डायरी लिहिण्यास सांगितले होते.  या डायरीत रोजच्यारोज होणाऱ्या  सकारात्मक आणि नकारात्मक सामाजिक संभाषणामुळे मनात निर्माण होणाऱ्या भावना आणि त्यामुळे होणार शारीरिक त्रास  नमूद करण्यास सांगितला गेला होतो. ह्या व्यक्तींना  हृदयविकार, डिप्रेशन  अशा आजारांची पार्श्वभूमी असणार नाही याची काळजी घेण्यात आलेली होती.  काही दिवसांनी यात सहभागी व्यक्तींच्या जबड्याच्या आतल्या भागाच्या द्रवाचे नमुने घेण्यात आले.

 या सर्वातून त्या त्या व्यक्तींवर असणारा ताण तपासण्यात आला, गत आठवड्यात ज्या व्यक्ती अधिक प्रमाणात  नकारात्मक विचारांच्या सानिध्यात  आल्या होत्या त्यांच्या नमुन्यात इंन्फलमेंटरी प्रथिनांचं प्रमाण खूप अधिक  आढळलं. हे इन्फ्लमेशन  रोगजनक परिस्थितीत महत्वाची भूमिका बजावत हे देखील नोंदवलं गेलं.

 अश्रे यांनी याची निरीक्षण नोंदवताना म्हटले आहे कि  मैत्री – नाती हि आयुष्यात  तितकीच महत्वाची आहेत  जितका कि आहार.  म्हणूनच जो नियम आहाराला लागू होतो, तोच मैत्री आणि नाती यासाठी लागू होतो.  म्हंणूनच मनाला पोषक अशी मैत्री निवडण्यातच शहाणपणा हा तितकाच महत्वाचा आहे.

मैत्री  हि जीवनाची  औषधी आहे ती सांभाळून हवी तेवढीच स्वीकारावी.

मित्र मंडळी किती ?

 कधी कधी आपला सुद्धा गैरसमज होतोच.  सतत मित्रमंडळींच्या गराड्यात मुलगा फार आनंदी दिसतो .मित्रमंडळींचा सहवास म्हणजे धमाल आणि मौजमजा हे सर्व साधारण समीकरण आहेच. अशी मुले  तणाव रहित असतात हा सुद्धा आपला समज असतोच. मात्र अलीकडे एका संशोधनात हि बाब चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. याविषयी अमेरिकेत एक सर्वेक्षण करण्यात आले. त्याम सोळा हजाराहून अधीक लोकांचा अभ्यास केला गेला. यात सतत मित्रमंडळीं मध्ये रममाण होणारे लोक जास्त अंतर्मुख आणि एकाकी , व दुखी असल्याचे आढळून आले. एकटे असल्याने त्यांच्यात एकाकी व उदासी भरलेली असतेच परंतु फ्रेड सर्कल वाढले म्हणून सुखाची व्याप्ती वाढली असा संबंध हि  त्यात जोडता येत नाही.

 हेही म्हणणे चुकीचे आहे हेच संशोधक सांगतात, त्याच मित्रमंडळींत राहून  अपेक्षांची उपेक्षा होऊनही उदासी वाढते असे त्यांच्या लक्षात आले.

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu