योग आणि एकाग्रता
Like
Like Love Haha Wow Sad Angry
141

Touch attraction is very strong. That is why a person runs behind soft, soft and hot. Of course, the attitude of work and behavior has originated from the color, the sensation of touch. Today the ‘Mahabharata’, ‘Ramayana’, ‘Bhagavadgita’ are written by the great masters in their own words, sacred to the attitude, position, and nature of man.  Make the mind calm, the rest of the mind calm. The happiness that is given in it is the supreme sacrifice for life. This article is based on how yog and concentration is important for human life. yoga-and-concentration

 रस अथवा स्वाद

जसे मनुष्य रंग -रूपाच्या कडे आकर्षित होतो तसेच वासना भोग याचा शिकार बनतो. आणि त्याच प्रमाणे  आपल्या मुखात असणारी हि छोटीशी  जीभ हिचे वेगवेगळे स्वाद पुरविण्यासाठी या पाच फुटाच्या मनुष्याला कुठले कुठले हॉटेल तर  रस्त्यावरील ठेले यांच्या भोवताली फिरवत असते, स्वादाच्या दोरीने बांधलेला मनुष्य वेगवेगळ्या रसांचा स्वाद घेण्यासाठी वाटेल तेथे खानावळीचा शोध घेत असतो. आज या स्वादाने मनुष्याला घरच्या बनविलेल्या अन्नात रुची राहिलेली नाही. आजच्या युगात मोठमोठ्या हॉटेल पासून ते रस्त्यावरील हाथ ठेण्यावरची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु त्याला त्याच्या या छोटीशी  जिभेवर कंट्रोल करता येत नाही या वरून लक्षात येते कि त्याला परमरस कशात आहे त्याचे भानच उरले नाही. परंतु या  परम रसासाठी त्याला या गोष्टींचे मनन करावे लागेल ते असे…

 (क)  उदा- मनुष्याच्या भोवताली वेगवेगळ्या प्रकारचे  स्वादिष्ट असे अनेकाअनेक पदार्थ त्याच्या  समोर आहेत ,ते ग्रहण करण्याची त्याला फार तडफ आहे. तो आपल्या मित्रमंडळीत बसून त्याचा स्वाद घेण्यास सुरवात करील इतक्यात फोनची रिंग वाजून त्याला त्याच प्रिय पुत्र च्या मृत्यूची बातमी कानावर आली तर काय होईल ? तर तेच स्वादिष्ट पदार्थातली रुची एकाएकी फिकी पडेल  या वरून हेच लक्षात येते कि मनुष्याची रुची त्याच्या वृत्तीवर(mood) निर्भर आहे. त्याचे मन शांत असेल तर त्याला रुची असेल मन अशांत असेल तर त्याची कोणत्याही स्वादिष्ट पदार्थात रुची नसेल. तेव्हा सर्वात जास्त रुची ‘ शांत रस ‘ ‘एकांत रस’ व ‘आनंद रस’ या रसाला प्राप्त करण्यासाठी ‘योग साधना ‘ याची गरज आहे, प्रभू चिंतनाची गरज आहे.

 (ख)  उदा- एखादा पदार्थ एका व्यक्तीला फार आवडतो.परंतु तो खाण्यास त्याला लिमिट आहे. लिमिट च्या जास्त खाल्याने त्याला त्याची बाधा होते. आणि  पदार्थ लिमिट मध्येच खातो नंतर त्याच आवडत्या पदार्थाला खाण्याची त्याचीच इछा नसते. तेवढ्यातच मन शांत होते ते का? त्याला त्या रुचकर पदार्थाने त्रास होत असल्याने  तो कंट्रोल करू शकतो, याचा अर्थ कि त्या खाद्य पदार्थात त्याला रुची नसून, जास्त खाण्यात त्याची रुची आहे. परंतु तोच पदार्थ त्याला रोज दिला तर त्याचे मन त्यातून उबते परत खाण्याची इछाच होत नाही.

(ग) उदा- एक पदार्थ एकाव्यक्तीला रुचकर वाटतो तोच पदार्थ दुसर्या व्यक्तीला मुळीच  रुचकर वाटत नाही का? या वरून हे स्पष्ट होते कि पदार्थात स्वाद नाही, तो खाणेवाल्याच्या रुची वर अथवा पसंतीवर अवलनबुन आहे. म्हणून रस या स्वाद मनुष्याच्या अवस्थेवर, मनोदशेवर किंवा त्याच्या अभिरुचीवर ठरते.  म्हणून मन शांत नसेल  चित्त चलविचल असेल तर त्यांना हा संसार निरस व फिका वाटतो. त्याची स्थिती ठीक नसेल तर आपल्या संबंधित लोकांत राहूनही जीवनात रस नसते. त्याचा परिणाम म्हणजे  व्यक्ती उदास, राहून चिडचिडा बनतो तो व्यक्ती स्वतः प्रसन्न राहू शकत नाही व दुसर्याशी प्रसन्न करू शकत नाही अशा वेळी त्याला योग-साधने तून ‘परम-रस’ प्राप्त होऊ शकतो. त्यातून त्याला ‘आनंद रस’ मिळू शकतो.

young-woman-sitting-outdoors-in-yoga-position_1098-1390

(1) गंध

 सुगंध मनुष्याला आकर्षित करत असतो. परंतु तो क्षणिक असतो.  पुष्प सुगन्धी हि सुद्धा काही वेळ असते. अत्तर चा गन्ध हा सुद्धा काही वेळच असतो. परंतु सुगन्धी फुल चिखलात किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सुद्धा उगवून आपला सुगन्ध सर्वत्र पसरवितो.  त्याच प्रमाणे मनुष्याने आपल्या दिव्य गुणाने सर्वत्र आनन्द पसरविला पाहिजे. आपल्या आत्म्याला आपल्या दिव्य गुणांनी सुशोभित केले पाहिजे आपली गुणीजन म्हणून ख्याती पसरविली पाहिजे.

(2) स्पर्श  

स्पर्शाचे आकर्षण अतिशय प्रबळ असते. म्हणूनच मनुष्य कोमल-शीतल, नरम-गरम यांच्या मागे धावतो. अर्थात काम-वासनेची वृत्ती रंग-रूप, स्पर्श या संवेदनातूनच निर्माण झाली आहे. म्हणूनच एक नेत्रहीन पुरुषही काम-वासनेच्या अधीन होतो.  मनुष्य ज्यावस्तूची घृणा करतो त्यावस्तूला स्पर्श करण्यास  नाकारतो, परंतु जी वस्तु त्याच प्रिय असते. तिला तो स्पर्श करतो किंवा वापर सुद्धा करतो. आवडत्या वस्तूचा त्याला फार मोह असते वारंवार त्याला स्पर्श करण्याची वृत्ती निर्माण होत असते. त्या वस्तूला तो आपल्यात सामावून घेण्यास बघतो.   परंतु सर्वात उत्तम स्पर्श म्हणजे प्रभूचा असतो. त्यात शीतलता प्राप्त होत असते. आपल्या शरीरातील ताप, दाह नष्ट करतो. अहंभाव  नष्ट करतो. याकरिता योग-साधनेची आवश्यकता आहे.

 (3) शब्द 

या पृथ्वीतिला वर शब्द याचे इतके महत्व आहे. शब्दाची शक्ती सामान्य नाही, त्यात महान प्रभावशाली असे आकर्षण आहे म्हणून संसार मध्ये साधू, संतांच्या व्याख्यानाने , प्रवचनाने लोक त्यांचे चेले बनलेले आहे. गुरु पासून मिळालेल्या शब्दांचा प्रभाव एवढा असतो कि त्यांच्या संबंधाने आपले जीवन साध्य करून घेतलेले धार्मिक लोक आहेत. रेडिओ, टीव्ही वरून जी संगीत,गाणी आपण ऐकतो त्यात आपण तल्लीन होतो आपले काही काळ दुःख दूर करतात. मनाला आनंदी करतात. आज शब्दांचे अर्थ, अनर्थ, ध्वनी, तरंग मध्ये सारा संसार आनंद मानत आहे. आज गायक, गायिकांची  करोडो गीत मनुष्याला मोहात पाडतात, भारावून टाकतात. भक्ती- गीत, भाव गीत यांत दुनिया तल्लीन होऊन जाते. आपापल्या परी गीत ऐकण्यात सारी दुनियांतील जण समुदाय भारावलेला, झपाटलेला आहे.

 मनुष्याने विचार करायला पाहिजे हर एक मनुष्याचे बोल त्याची बुद्धी, त्याची सोच त्याच्या अनुभवावर, आणि त्याच्या स्थिती नुसार असते. कधी कधी छोटी बालक बालिका च्या मुखारविंदातील शब्द सुद्धा माणसाला भारावून सोडतात, त्यांच्या मुखातील सुंदर गीत ऐकण्यात कितीतरी आनंद प्राप्त होतो. आज ‘महाभारत’ , ‘रामायण’, ‘भगवतगीता’ अधिक मोठमोठ्या महात्म्यांनी  संतांनी आपापल्या शब्दांत मांडलेले ग्रन्थ मनुष्याची वृत्ती, स्थिती, आणि कृति ला पावन पवित्र करणारी आहेत, मनुष्याच्या जीवनाला आनंदी उत्साही, परमकल्याणकारी करणारी आहे. बुद्धीला सात्विक, व परिपकव स्थिती जीवनाला पावन करणारी आहे. ती मनुष्याने ऐकलीत  पाहिजेत व स्वतः: वाचली पाहिजेत.

Yoga

 मनाला शांत करते, मनातील चंचलता शांत करते. यात मिळणारा आनंद रस जीवनाला परमपावन करणारा आहे. त्यांनतर मनुष्या कोणत्याही रसाने वंचीत राहणार नाही, चिरस्थायी होऊन निर्दोष होईल, पवित्रता व दिव्यता प्राप्त करून घेऊ शकतो. याच प्रकारचे मनन -चिंतन यां कडे आकर्षिला जाईल यात आत्मा-उचचकोटी वर टिकून प्रभूचे सुंदर दर्शन करून आनंद रस, दिव्य गुणांची गन्ध जीवनात प्राप्त करू शकतो.  ईशवरीय ज्ञान याच शब्दातून संपन्न होत असते. ईशवराचा स्पर्श, ईशवराचा गन्ध, आपल्याला होऊन मनुष्य कृतकृत होऊन धन्य होतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
141  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu