स्त्री तुझी जागरूकता !
Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

Raising awareness and empowerment in Woman is helping our society to become strong. The existing  system in Indian society has not changed much in the past 100+ years. Therefore many women are in relatively the same position their ancestors were more than a century ago. Though a percentage of the female population are successfully attaining a higher education, the actual position of women in terms of their capacity to make decisions and be independent in a true sense is still missing.  This article is based on awareness and empowerment of women.


स्त्री तुझी जागरूकता !
भारतीय संस्कृती प्राचीन काळा पासून श्रेष्ठ व पवित्र आहे. तिचा अभिमान, गर्व प्रत्येकाला असायला हवा. परंतु  काळानुसार त्यामध्ये बदल होत चालला. आणि तो गरजेचा आहे. पाश्चात्यांच्या प्रभावामुळे भारतीय संस्कृतीमध्ये बरेच बदल घडून आलेले आहे.  भाषा, पेहराव, खानपेन आणि संस्कृती इ. अशा अनेक पाश्च्यात्य संस्कृतीचा आम्ही स्वीकार केलेला आहे. तसेच आमच्या जीवनातील असंख्य क्षेत्रावर काळानुसार बदल झालेला आहे. परंतु पुरुष प्रधान संस्कृतीचे आजही आपण समर्थक आहोतच त्यांत  विशेष बदल झालेला नाही. पाश्च्यात राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय स्त्रीला विकासासाठी  पूर्णपणे पोषक असे वातावरण आजही आपल्या देशांत नाही. म्हणायला समानता आहे  परंतु ती पूर्णपणे स्वीकारली जात नाही.  त्यामुळे स्त्रीने आपल्या हक्काप्रती जागृत होऊन आपले स्थान महत्वपूर्ण असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे.

 कधी कधी असे वाटते पुरुषप्रधान संस्कृती आपणच स्वतः वर लादून तर घेतली नाही ना असा प्रश्न पडतो!  भारतीय राज्य घटनेने  स्त्री-पुरुष असा भेद न करता स्त्रीला वडिलांच्या व पतीच्या संपत्तीमध्ये समान हक्क  व अधिकार कायद्याने बहाल केलेला आहे.  तरी सुद्धा अजूनही कुटुंबामध्ये व समाजात तसे मान्य होत नाही, किंवा आई- वडील यांच्या मनी-ध्यानी ते बसलेले नाही. तिला आजही दुय्य्म स्थान दिले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या हक्काप्रती असलेला जाणिवेचा अभाव हेच आहे.  त्यामुळेच तिच्यात  स्वतः परावलंबी असल्याची भावना बळावत असते. असे करावयाचे झाल्यास सर्व प्रथम तिला तिच्या स्त्री त्वाची जाणीव करून दिली जाते.

स्त्री तुझी जागरूकता

स्त्रीचे आजपर्यंत सर्व कार्य क्षेत्रात यश आणि विजय प्राप्त करून तिने सन्मानाचे स्थान प्राप्त केले आहे. तिने स्वतः: चे अस्तित्व अधोरेखित करून असामान्यत्व प्राप्त केले आहे. म्हणून भारतीय स्त्रीने मानसिक दृष्ट्या समक्ष होऊन आपल्या अस्तित्वाप्रती जागृक व सकारात्मक असणे गरजेचे आहे. पाश्च्यात्य राष्ट्रांच्या तुलनेत भारतात स्त्रीच्या संदर्भात अनेक समस्यां असल्याचे दिसते. त्यांच्या संरक्षणासाठी शासनाला अनेक कायदे करावे लागतात  हुंड्याची प्रथा हि केवळ भारतातच आढळून येते. या वरून त्यांचे दुय्य्म स्थान हे निदर्शनास येते. या हुंड्यासाठी कितीतरी स्त्रिया बळी गेलेल्या आहेत. तसेच कायद्याने मुलीला मुलांप्रमाणे वडिलांच्या संपत्ती मध्ये समान अधिकार दिलेला असला तरी तो अधिकार आजही स्त्रीला बजावताना असहाय्य व असमर्थ असल्याचे लक्षात येते.  बहुतांश स्त्रिया या नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक मदत करू लागतात, तरीही सम्पूर्ण आर्थिक व्यवहार हा पतीकडे असतो.यावरून आर्थिक दृष्या स्वावलंबी असून सुद्धा पर्वतनबित्व  पत्करण्याची मानसिकता दिसून येते.  तर हि मानसिकता बदलून स्वतःप्राधान्य देणे गरजेचे आहे. बघण्यात येते कि महिलांना लोकप्रतिनिधीत्वाची संधी दिली जाते परंतु त्यातही त्यांचे कार्य त्यांचे पती सांभाळतात.

 इतर क्षेत्रात राहणारा स्त्रीवर्ग भारतीय सण -उत्सव साजरे करण्यात त्यांचाच सहभाग असतो तसेच घरातील पूजा-अर्चना विधी, पुराण -कथा, दीर्घ काळ उपवास, हि त्यांचीच जबाबदारी असते. त्यांच्याच संबंधित बरेच सण व्रत-वैकल्ये असतात. घरा बाहेरचा व्यवहार न केल्याने  निर्णयक्षमता, धैर्य, स्वावलंब, साहस, इत्यादी गुणांचा विकास स्त्रीमध्ये होऊ शकत नाही.

 त्यासाठी स्त्रियांनी आपला दृष्टिकोन बदलण्याची फार गरज आहे, अनावश्यक बंधनातून मुक्त होऊन स्वतः: च्या व्यक्तिमत्व विकासाची प्रगती करणे गरजेचे आहे. त्यांनी पुढे येऊन स्वतः अस्तित्व सिद्ध करण्याचा संकल्प करणे, हि काळाची गरज ओळखली पाहिजे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d