Malai Kofta, it is always for a celebration time! This is one dish which nobody will get bored of even if it is served at every day. in this post we are sharing something unique with you Gajar Malai Kofta Kari. Read complete recipe and share with your friends also.
साहित्य- किसलेला गाजर दोन वाट्या, उकडलेला बटाटा एक, खवा पाव वाटी, आले-लसूणपेष्ट एक चमचा. मीठ, लिंबू, साखर चवी नुसार, कृष्ण मिरची एक चमचा, फ्रेश क्रीम एक वाटी, दूध दोन वाटी, काजूची पेष्ट अर्धी वाटी, कोथिंबीर, वेलची पावडर अर्धा चमचा, हिरवी मिरची ५ ते ६ दही एक वाटी, काळी मिरी पावडर अर्ध चमचा.
कृती – गाजर किसून त्यात बटाटा किसून घ्यावा त्यात मीठ चवी नुसार, आलेलसूण पेष्ट घाला. खव्यात काजू किसमिस, लींबूरस, मीठ, साखर, हिरवी मिरची कोथिंबीर मिसळून हे मिश्रण गाजराच्या पारित भरा कोपते तयार करा हे मंद आचेवर तळा, व बाजूला काढून ठेवा.
एका पसरट भांड्यात काजूची पेष्ट, दही वेलची पावडर व तेल घालून पाणी घाला हे मिश्रण तेल सुटेस्तोवर उकळू द्या, मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात दूध व फ्रेश क्रीम घालून चवी नुसार मीठ साखर, काळी मिरीपावडर, घाला हि ग्रेव्ही कोप्त्यांवर घालून बटरणानं बरोबर सर्व्ह करा.