Vat Purnima Vrat is a significant Hindu festival celebrated by married women observing fast for their husbands’ long life and wellness. Vat Purnima which is also called Vat Savitri is dedicated to Savitri who saved her husband Satyavan from the God of Death, Yama himself. Read this article for complete information about Vat Purnima Vrat.
आपल्या धर्मात अनेक चालीरीती आहेत. बदलत्या ऋतू सोबत येणारे अनेक सण सोहळे आपण साजरे करीत असतो. त्यात वृक्ष पूजा आहेतच. धन-धान्य, जलाशय, नक्षत्र, गोधन, प्राण्यांची, अवजारे, शस्त्र, तसेच मानव निर्मित वास्तू, यांच्या पूजा केल्या जातात. आपला देश कृषीप्रधान व आपली सण ऋतुप्रधान धार्मिक सण, समारंभ साधारणपणे असतात. सृष्टीशी, निसर्गाशी तादात्म पावलेल्या आमच्या दृष्ट्या पूर्वजांनी प्रत्येक ऋतूचा व प्रत्येक वृक्षाचा इतका सखोल अभ्यास आणि इतके सूक्ष्म चिंतन केलेले आहे. कि त्यांनी जाणलेली मर्म आणि मांडलेला सिद्धांत, आकलन करायला सुद्धा श्रद्धेनं आणि भक्ती जाणत्या सिद्धांच्या पायाशी बसून ‘तद्विधी प्रणिपातेंन परिपरशनें सेवया’ ह्या पद्धतीनं अभ्यासावे लागतील. मनाच्या अतिशय सूक्ष्म पातळीवर त्यासाठी उतरावे लागेल. इतकं तरल व्हावे लागेल. आणि त्यासाठी तेवढी तळभोर अनुभूती घ्यावी लागेल. तरच त्याचे खरे अर्थ आम्हाला मिळतील.
वट वृक्षाची पूजा :
वटपूजा व वटसावित्रीचे व्रत हा एक आमच्या धर्मातील आचार आहे असाच ऋतूंवर आधारित. आम्ही स्त्रिया तो श्रद्द्येने पाळतो. याला वटपौर्णिमा म्हणतात. दरवर्षी जेष्ठ पुनवेला वटवृक्षाचीपूजा श्रद्धयेने,भक्तीने करुन हा सण साजरा करतात. कुणी घरात तीन दिवस व्रत पूजा मांडतात, उपवास करतात. आमच्या निष्ठांना बळ देणार इश्वराच ते अधिष्ठान असतं.
तरी सांगावेसे वाटते कधी कधी यावर टीका टिपण्णी होत असते. परंतु ह्यात असे काहीही नाही. एक श्रध्येचा भाग तर आहेच. परंतु स्त्री मुक्ती, स्त्री बळ, विषयाचा आधार म्हणजे वटसावित्री व्रत, असेच काहीसे वाटते. स्त्री मुक्ती किंवा स्त्री बळ हे सामान्य वाक्य नाहीत. मुक्ती हि मनुष्याची एक मानसिक अवस्था आहे. आत्यन्तिक शुचिर्भूत अशी हि अवस्था ज्याची त्यानं कमवायची असते. ती कुणी कुणाला आणून देऊ शकत नाही. आमची वेड-पुराणे, शास्त्र-तर्क ह्यातले कुणीही, कुणालाही, कधीही मुक्ती किंवा बळ हे हातात आणून देत नाही. मुक्ती हि एक अनुभूती आहे. ज्याची त्याची आपली म्हणजे फक्त आपलीच कमाई आहे. ती लाखो लोकांत राहून अनुभवता येते. नाहीतर रानो-वणी जाऊनही गवसेलच ह्याची शाशवती नसते. मुनी-तपस्वी, ऋषी-मुनी, अवलिये, साधू-संत केवळ हेच त्यावाटेवरचे पंथप्रदर्शक होऊ शकतात. कर्मयोग, सांख्ययोग, हटयोग, ज्ञानयोग्, भक्तियोग हे सगळे योग त्या अनुभूतीच्या टप्प्यात पोचण्याचे फक्त मार्ग आहेत. त्यामुळे इतरांच्या मुक्तीसाठी होणाऱ्या ह्या चळवळी म्हंणजे स्वतः;च्या स्वतःच्या स्वार्थ्यावर दृष्टी ठेऊन लोकांसमोर उभे केलेले केवळ देखावे ठरतात. समाजातल्या दुरबळ घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध विचारवन्तांनी आणि सामर्थ्यशाली लोकांनी लढा जरूर द्यावा त्यावाचून समाजाचा समतोल टिकून राहणार नाही.
वृथा चर्चा :
वटसावित्रीच्या कथेकडे माणसां जर डोळसपणे पाहिलं तर ती समजून घेणे कथा नाही. विश्र्वातल्या सृजनशक्तीचा, संहारशक्तीशी झालेला हा एक सरळ सरळ संग्राम आहे. आणि त्याच परमेश्व् राच्या जीवनशक्तीन मृत्यूचा आदर करूनही त्यावर आपल्या प्रेमानं केलेली हिलोभसवाणी मात आहे. मग स्त्रीनं या शक्तीच्या मोहात पडू नये का ?
सृष्टिकर्त्या ब्रम्हदेवाची पत्नी म्हणजेच पर्यायानं त्याच्या ठायी वास करणारी त्याची सृजनशक्ती, म्हणजेच सावित्री. राजा अश्र्वपतीनं हि शक्ती प्रसन्न करून घेण्यासाठी केलेली हि अध्यात्मिक वाटचाल. आन त्याशक्तीच्या प्रसादान त्याला मूर्तरूपानं आकाराला आता आलेली स्त्री म्हण जे सावित्री. स्वाभाविकच, मृत्यूशी भिडण्याचं त्याच्या डोळ्या शी डोळा भिडविण्याचं धाडस त्याचा पाठपुरावा करून त्याला माघार घ्यायला लावण्याचं सामर्थ्य ती जन्मतः घेऊन आलेली होती. आणि त्या मृत्यूच्या देवतेचा सावित्रीने मानच राखला, आदर दिला, व त्याला नमस्कार सुद्धा करून विंनती केलेली आहे. आणि सृष्टीतील यमराजाची हे कार्य हि आवश्यकच आहे, हेच यातून दवणीत होत आहे. सृष्टीतील ठरलेल्या नियमांत सावित्रीने सुद्धा ढवळाढवळ करण्याचा अधिकार आपल्या हातात घेतलेला नाही. सत्यवानाचा मृत्यू हा अपमृत्यु होता म्हणून मृत्यूने माघार घेतली. सृजन कार्य चालू राहावं, सृष्टीचा तोल सांभाळला जावा हा अधिनियम यमालाही लागू होताच. कि आणि एखादी तप : पूतशक्ती प्रेमानं त्या संहाराच्या देवतेला समज द्यायला पुढे उभी ठाकते तेव्हा मृत्यूची देवता सुद्धा रागावण्याऐवजी आतून पाझरतेच आणि त्या बुद्धिमत्तेचा कौतुकही करते. इतके सरळ हे भव्य आहे. हे करायला सावित्री सारखी तपश्चर्या लागते. तशी पुण्याई लागते. ह्या सर्व गोष्टींची आम्ही किती खालच्या पातळीवरून चर्चा करतो !
स्त्री-पुरुष, हे पती -पत्नीचं नातं म्हणजे पुरुषप्रकृतीचं नातं होय शिव-शक्तीच नातं आहे हे साता जन्माचंच नाही तर शत-शत जन्मांच्याही पलीकडचे आहे.फक्त मनमाणसातलं सीमित नसून अनंत आहे. नात्याचा हा सृजनस्रोत अनादी काळापासूनच आहे. त्याची पूजा होत असते. मृत्यू सत्यवानाला घेऊन चाललेला असतो, आणि त्यामागु चिवटपणान त्याचा पाठपुरावा करीत जाणारी सृजनशक्ती ती सावित्री, सासऱयांची दृष्टी, शक्ती, हिरावून घेतलेले राज्य राजा अश्रप्ती साठी पुत्र आणि नंतर स्वतःसाठी पुत्रवती भव असा आशीर्वाद व वरदानाचा मांगल्य पेरीत चालली असते, हे सारण सावित्री आपल्याला अस्तवनाला वेगळं कल्पून का मागत होती? हि विचार करण्याजोगी गोष्ट नाही काय? मृत्यूवर मात करणारी सृजनशक्ती स्त्री- पुरुष ह्यातल्या एकट्या कुणाचीच नसते, तिने नेहमीच एकत्रित येऊन मृत्यूची लाट मागे रेटीत पुन्हा पुन्हा नव्यांना, सातत्यानं, आणि जोमाणं आपले निर्माण कार्य करीत जावं.
जीवनदायी व्रत :
उन्हाळा संपत आलेला असतो सारं भगभगीत होऊन गेलेलं असतं, आटलेले जलाशय, उघडेबोके डोंगर, तळमळणारी जीवनसृष्टी, केविलवाणी पशु-पक्षी, आणि मुरझलेली झाडे, उन्हाळ्याने हा:हा:कार माजविलेला वातावरणातील धगधग असे हे शिव तांडव, मनामनात विश्व् -भयाण चळचळ कापीत असतं. तप्त दाहक तेजस्वी सूर्यकिरणांचे जवलण्ट फास सृष्टीच्या गळ्याभोवती पडलेले असतात. त्यावेळी धैर्याने चकाकणारे सुद्धा त्यावेळी डळमळायला लागतात. पृथ्वी नवा खेळ मांडायला, नव्यानं सृष्टी करण्यासाठी तळमळत असते. अश्या या उन्हाळ्या-पावसाळ्याच्या जोरावर हे व्रत घरची स्त्री आचरित असते. ब्रम्हशक्ती सावित्रीची व्रत -पूजा म्हणजे त्याच शक्तीची पूजा होय. सृजनाची शक्ती अंगी बाळगणाऱ्या स्त्रीनं भावभक्तीं त्या शक्तीची पूजा करावयाची असते सौभाग्याच्या कल्पनेत एकटा कुंकवाचा धनीच सामावलेला नसतो.